मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ३१ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ३१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३१ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत म्हणे आतां ऐकावें । श्रावणाचें माहात्म्य बरवें । सुखप्रद जें व्हावें । गणनाथास प्रिय म्हणोनी ॥१॥तें संक्षेपानें सांगतों । वर्णन करण्या मोद होतो । विष्णु तोच राम होतो । दशरथाचा पुत्र प्रतापी ॥२॥तो दाशरथि राम सभेंत । येतां एकदां विप्र जमत । त्यांची पूजा करून विचारित । आगमन कारण त्यांना ॥३॥ते तेव्हां त्यास म्हणती । लवणासुर माजला अती । त्याचा वध करी ही विनंती । तुजला करण्या येथ आलों ॥४॥त्यांची विनंती मान्य करित । राघव त्यांसी विचारित । त्या दुर्जंयावरी जय लाभत । ऐसा उपाय मज सांगावा ॥५॥तेव्हां ते द्विज त्यास म्हणती । गणेशावरी अभिषेक भावभक्ती । गणेशसूक्तांचा घोष करिती । ते जन विजयी होतात ॥६॥तैसें तूं करिता लाभेल । विजय तुजलाही बहुबळ । मासात श्रावणमास मुख्य विमल । सांप्रत सुरू होईल ॥७॥हा मास विघ्नेशास अत्यंत । आवडता असे निश्चित । करितां हे श्रावणव्रत । संतुष्ट तो होईल ॥८॥ऐसें बोलून तयास सांगत । श्रावणव्रताचा विधी समस्त । तेव्हां तो शत्रूघ्न भजत । गणेशासी भक्तीनें ॥९॥उपोषण तो आचरित । दुग्धपानावरी जगत । अभिषेक करून तोषवित । विघ्नपासी स्वभक्तीनें ॥१०॥श्रावणमासव्रत करून । गणेशासी नमून । ब्राह्मनासह राघव शत्रूघ्न । लवणराक्षसासन्निध गेला ॥११॥त्रिशूलानें विहीन असत । ऐश्या त्या लवणासुराम रोधित । गणेश्वरास स्मरून मारित । दुष्टास त्या शरघातानें ॥१२॥त्यांचे युद्ध अति भयंकर । चाललें तेथ समय उग्र शत्रूघ्नानें खड्गप्रहार । करून तोडिलें मस्तक त्याचें ॥१३॥तेव्हां देवगण पुष्पवृष्टि । करिती त्यांच्या मनीं तुष्टी । शत्रुघ्नावरी परी तो समदृष्टि । जय हेरंब जयघोष करी ॥१४॥ब्राह्मण त्यासी पूजिती । द्विजश्रेष्ठा करून प्रणती । त्या मथुरेसी भावभक्ती । आवासस्थान त्यानें केलें ॥१५॥ऐसा काहीं काळ जात । तेव्हां स्वपुत्रास तेथ स्थापित । मथुर सोडून भक्तपरायण परतत । रामचंद्राजवळी तो ॥१६॥ऐश्यापरी श्रावणमासांत । गणेंशाचें माहात्म्य ख्यात । अनुष्ठानाचें फल ज्ञात । सर्वसिद्धिप्रदायक ॥१७॥दुसरीही एक कथा स्मरत । तीही तुज सांगेन सांप्रत । जालंधरवधास्तव आचरित । शिवशंकर व्रत तेव्हां ॥१८॥जालंधर दैत्यानें जिंकलें । हें सर्व चराचर पीडिले । त्रैलोक्याधिपतिपाद प्राप्त केलें । वरदानप्रभावें त्यानें ॥१९॥आसुर कर्म सर्वत्र करवित । दैत्यांसी सर्वत्र पाठवित । न स्वाहा न स्वधा मिळत । भूमिमंडळीं कोठेंही ॥२०॥ऐसा बहुत काळ उलटत । तैं जालंधर जाहला मदोन्मत । पार्वतीस पकडण्या जात । युद्ध हो तेव्हां देवदैत्यांचें ॥२१॥दैत्य जाहले पराजित । पळून गेले दशदिशांत । जालंधर तैं अतिकुपित । शस्त्र घेऊन लढूं गेला ॥२२॥शंभूस जेव्हां तो जिंकित । अन्य सुरसंघ भयभीत । पळून जातां अंतर्धान पावत । महाशक्ति त्या वेळीं ॥२३॥तेव्हां तो असुर अति विस्मित । स्वगृहास परतत । तेथ अतिविव्हाल दुःखित । कामबाणांनी पीडित तैं ॥२४॥जगदंबिकेस पाठवित । कामाग्नि त्याचा चेतत । नाना शीतल जलस्पर्शात । त्यास समाधान न मिळालें ॥२५॥देवगण समस्त लपले । पर्वतगुहेंत भयें राहिले । जालधंरनाशार्थ करूं लागले । विचार निश्चित उपायाचा ॥२६॥तेव्हां बृहस्पति म्हणत । शकरादि सुरेंद्राप्रत । गणनाथ अनुष्ठान श्रावणांत । करावें तुम्हीं प्रियदेवहो ॥२७॥त्याचें वचन मान्य करून । शंभु आदि देव तत्क्षण । गुरूसहित करिती पूजन । गणेशाचें दूर्बांदींनीं ॥२८॥रात्रंदिवस ते भजत । एकचित्तें एकदन्त । श्रावण होता समाप्त । भाद्रपदांत यात्रा करिती ॥२९॥पंचवीस पारणा करिती । गजाननास प्रणिपात भक्ती । तेव्हां आकाशवाणी तयाप्रती । माहादैत्यास मारण्या जावें ॥३०॥तें दिव्यवचन ऐकून । शंकर करी युद्ध दारुण । महाघोर जालंधराचें हनन । केलेंत्यानें त्रिशूलघातें ॥३१॥गजाननास स्मरे चित्तांत । तैं तो महासुर शिवदेहांत । तत्काल विलय पावत । देवमुनिजन करिती स्तुती ॥३२॥जालंधर महादैत्यास जिंकित । देवादीस स्वस्थानीं स्थापित । सदाशिव वर्णाश्रम आयोजित । लोक सारे धर्म पाळिती ॥३३॥नित्य श्रावण मासांत । अनुष्ठान करी भावयुक्त । एकनिष्ठपणें सेवित । शंभू गणनायकासी ॥३४॥नित्य ध्यानपर होऊन । त्याचेंच करी तो चिंतन । ऐसें हें श्रावण मास महिमान । सांगितलें जें प्रभावी ॥३५॥या व्रताच्या प्रभावें जिंकित । शंभु जालंधर असुरा मारित । जो हें वाची अथवा ऐकत । त्यास लाभ पुरुषार्थाचा ॥३६॥इहलोकीं सौख्य भोगून । अंतीं मुक्त होऊन । स्वानंद साम्राज्य लाभून । धन्य होई उपासक ॥३७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते श्रावणमासमाहात्म्ये जालंधरवधो नामैकत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP