मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ३८ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ३८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३८ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ विभांड जाजलीस प्रार्थित । बल्लाळेश चरित सांगा मजप्रत । बल्लाळ नाम कैसें लाभत । शुभप्रद श्रीगणेशा ॥१॥कोणी स्थापिला हा देव । पालीसमीप दिव्य भाव । योगीशा सर्व सिद्धिकर अपूर्व । चरित्र हें मज सांगा ॥२॥जाजलि म्हणे सिंधुदेशांत । पल्ली नामक कुटी असत । तेथ कल्याण नामा राहत । वैश्य एक धर्मनिष्ठ ॥३॥त्याची पत्नी इंदुमती । महाभाग्यवंत दयाळू अती । पुत्रास नांव ठेविती । बल्लाळ असें प्रेमानें ॥४॥पुत्राच्या अकराव्या दिवशीं ठेविती । बल्लाळ नाम अतिभक्ती । बल्लाळाची बाल्यापासून मती । जडली गणनाथावरी ॥५॥तो सदैव ध्यानयुक्त । त्यासी भूक तहानेची न भ्रांत । परी मातापिता त्या देत । खाऊंपिऊं योग्य वेळीं ॥६॥स्मरण करी बाल बल्लाळ । गणपतीचें नित्य रसाळ । नाम मनीं आठवी सबळ । कधींही तो रडत नसे ॥७॥दुधाची भूक लागून । तो ना करी कधी रुदन । मातापिता लक्ष ठेवून । दूध तयास पाजिती ॥८॥नंतर तो बल्लाळ रांगू लागत । जमिनीवरी बांधी सतत । गणेशमूर्ति भावयुक्त । धुळीनेच त्याची पूजा करी ॥९॥धुळीचे षोडशोपचार अर्पित । दुडुदुडु चाले घरांत । जय विघ्नेश ऐसा करित । जयघोष सदा मुखानें ॥१०॥नंतर कांहीं काल गेला । बल्लाळ आतां मोठा झाला । मित्रपरिवार जमला । परी खेळ गणेशपूजेचा ॥११॥तेथतेथ गणेश मूर्ती । स्थापूनिया यथामती । सारे बालक पूजिती । विघ्नेशासी आदरानें ॥१२॥तो बालकांसी शिकवित । वेळ न घालवा अन्य खेळांत । ते सर्व नाशिवंत । सदैव पूजा गणेशासी ॥१३॥त्यानेंच होईल सदा हित । ते सारे मित्र त्याचे ऐकत । ऐसा बहुत काळ लोटत । तैं एक विघ्न निर्माण झालें ॥१४॥भक्तिविघात लोक करिती । मृण्मयमूर्तीवरी पाय देती । तेव्हां दुःखें विचार करून चित्तीं । खेळती गावाबाहेर ॥१५॥जेथ होता एक पर्वत । तेथ सर्व मुलें जमत । वैश्यपुत्र बल्लाळ स्थापित । तेथ एक पाषाण ॥१६॥त्या सुन्दर पाषाणास पूजिती । वन्यमालाफुलांनीं भावभक्ती । फळें त्यासी नैवेद्यार्थ अर्पिति । त्रिकाल पूजन मुलें करिती ॥१७॥रात्रीं स्वगृहीं परतती । जेवून रात्रीं झोपी जाती । बल्लाळ तो गाणपत्यमती । होता महान गणेशभक्त ॥१८॥पुनरपि प्रातःकाळीं उठून । बालकांसहित पर्वती जाऊन । गणेशास भक्तियुक्त पूजून । दिवसभरी करी भक्ती ॥१९॥हें कळतां लोक समस्त । आपापल्या बालकां ताडित । म्हणती त्यांस क्रोधयुक्त । न खातांपितां कुठें जातां ? ॥२०॥अरे रात्रीं एकदां जेऊन । काय करतां संपूर्ण दिन । आनंदांत असता निमग्न । सांगा कोण तुमचा नेता ? ॥२१॥ऐसें पालक विचारिती । तव तीं बालकें सांगतीं । बल्लाळाच्या सर्व कृती । आम्हीं त्याच्या मागून जातों ॥२२॥त्याच्यासह पर्वंतावर जाऊन । आम्हीं करितों गणेशभजन । तैसेंच त्याचें पूजन । वन्यपुष्पफळांनी ॥२३॥तें ऐकून क्रोधयुक्त । नगरवासी जन समस्त । आपुल्या पुत्रांस धमकी देत । जाऊं नका बल्लाळसगें ॥२४॥तरीही तीं मुलें न ऐकती । बल्लाळाच्या सहित जाती । सर्वही गणेशभजनीं रंगती । नानाछंदे तीं गाती ॥२५॥तें समजता अधिकचि चिडून । नगरवासी सांगती जाऊन । कल्याणासी सर्व वर्तमान । बल्लाळाचें न घाबरतां ॥२६॥नागर म्हणती तुमचा सुत । जातो आमुच्या मुलांसहित । नित्य पर्वतावरी वनांत । उपोषण करी दिवसभरी ॥२७॥रात्रीं सारी परततीं । एक वेळ अवघी जेवती । अवघीं कृश झालीं किती । ही करणी दुष्ट बल्लाळची ॥२८॥आज उद्या वा मरतील । शिकवावें स्वसुता आतां सबळ । नाना प्रयत्न करूनही बाळ । आमुचें ना ऐकती ॥२९॥त्यांसी आम्हीं ताडिलें । परो ते एक न ऐकले । तुझ्या बल्लाळाच्या अधीन झाले । त्याची मोहिनी सर्वांवरी ॥३०॥त्यांचें गार्हाणें ऐकून । कल्याण वैश्या क्रोध येऊन । त्या सर्वांस निरोप देऊन । श्रीघ्र गेला वनांत ॥३१॥हातांत मोठी काठी घेऊन । मारण्या स्वसुता क्रोधयुक्त मन । गेला त्वरित जेथ स्थान । बालकांचें पूजेचें ॥३२॥तेथ सर्व मुलें जमलीं होतीं । गणेशभक्तींत दंग चित्तीं । गवत लाकूडादींनी बांधितीं । देवालय ती गणेशाचें ॥३३॥तेथ मूर्ति स्थापिली होती । गणेशाची मोहक अती । जरी साधीच ती होती । भावभक्तीचें बळ होते ॥३४॥कोणी प्रदक्षिणा घालिती । कोणी बालक ध्यान करिती । कोणी नाम संकीर्तन करिती । कांहीं सांगतीं पुराण ॥३५॥कांहीं पुराण ऐकतीं । क्रांहीं तपश्चर्या करिती । नाना छंदें कोणी गातीं । गणेशगुणांचें गायन ॥३६॥गणेशाच्या पुढयांत । बल्लाळ होता ध्यानस्थित । त्यास पाहून क्रोधयुक्त । देवालय फोडिलें कल्याणानें ॥३७॥एक दांडा मारून । छोटें मंदिर केलें भग्न । त्याचा राग पाहून । पळून गेलीं सर्व मुलें ॥३८॥परी बल्लाळ एकला न हालत । तैसाच बैसला ध्यानांत । त्या महाभक्तास पकडित । मारी कल्याण दांडुक्यानें ॥३९॥यमासम तो पितो । स्वसुतास मारी निष्ठुरत । उपजून त्याचिया चित्ता । क्रोधांध तो जाहला ॥४०॥सर्वांगावरून रुधिर । वाहूं लागला त्याचा पूर । तथापि गणेशध्यान एकाग्र । सोडिलें नाहीं बल्लाळानें ॥४१॥गणेशाचें ह्रदयांत चिंतन । मार खाई न सोडी मौन । तेव्हां कल्याणें देव उचलून । फेकून दिला दूरवरी ॥४२॥गणेशाची मूर्ति फेकित । तदनंतर वेलींचे पाश घालित । त्यांनीं स्वसुतास बांधित । हातपायांत दुढ बंध ॥४३॥परी देहत्यागाअचा निश्चय । करी बल्लाळ निर्भय । तेव्हां क्रोधपर निर्दय । बोले कल्याण तयासी ॥४४॥अरे बल्लाळ मज न मानिसी । नित्य देवपूजामग्न होसी । त्याचें हें फळ लाभलें तुजसी । खा मार आतां पुनरपी ॥४५॥अरे सारे नगरजन । मज सांगती तुझें वर्तन । त्यांची मुलें बिघडवून । काय मिळविलें सांग तूं ॥४६॥ते मज गार्हाणीं सांगती । पुत्रास मार द्यावा म्हणती । तुझ्यासम पुत्र लाभून जगतीं । सर्वत्र निंदा होत माझी ॥४७॥पूर्वी होतों वंध्य पुत्रहीन । तेव्हां होतों आनंदमग्न । परी तुजसम पुत्र लाभून । दुःखपूर्ण जीवन झालें ॥४८॥म्हणून देहाचा त्याग करून । आतां विघ्नेश्वरासमीप करी गमन । तो देव सर्व शुभवर्तंमान । करील तुझें निःसंशय ॥४९॥ऐसें बोलून तो पापी नगरांत । परततां होय अद्भुत । विघ्न उद्भवलें अवचित । कोड सर्वांगावरी फुटलें ॥५०॥कल्याणास ऐकूं न येत । पोक आलें तो वाकून चालत । मूक किडयांनी युक्त । देह त्याचा जाहला ॥५१॥तेव्हां अति दुःख होऊन । वैश्य कल्याण दीन वदन । पत्नी त्यास तैसा पाहून । शोक अत्यंत करूं लागली ॥५२॥ती पतीस विचारित । हया अवस्थेचें कारण न कळत । परी तो बधीर न ऐकूं शकत । प्रश्न आपुल्या कान्तेचा ॥५३॥मुका झाला न बोले वचन । खुणा करी दीन होऊन । तेव्हां नगरजन सारे जमून । भयचकित सारे सांगती ॥५४॥आम्हीं बल्लाळाची तक्रार केली । त्यानें शेटजींची वृत्ति खवळली । त्यांनीं बल्लाळाची दशा केली । मारमारूनी भयंकर ॥५५॥वनांत जाऊन गणेश मंदिर । फोडून फेकिली मूर्ति सुंदर । हातपाय बांधून उग्र । ताडन केलें बल्लाळासी ॥५६॥तेव्हां ती माता अति । दुःखित । होऊन गेली वनांत । जन सारे जाती भयचकित । पाहण्या बल्लाळ भक्तास ॥५७॥इंदुमती बल्लाळमाता रडत । पुत्रची चिंता मनांत । पतीच्या करून अवस्थेनें पीडित । आक्रोश करी मोठयाने ॥५८॥पुढें काय जाहला वृत्तान्त । त्याचें वर्णन पुढील अध्यायांत । बल्लाळ आख्यान भावयुक्त । वाचितां सुख लाभेल ॥५९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते कल्याणदुर्गतिवर्णनं नामाष्टत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP