मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ३५ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ३५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३५ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगती धौम्य चरित । दधीचीपासून मंत्र घेत । गजाननास ह्रदयांत ध्यात । मंत्रजप करी शमदमपर ॥१॥क्रमानें योगभूमिस्थ । मलमास लागतां । मलमासव्रत । केलें त्यानें अज्ञाननाशक पुनीत । उषःस्नान करीतसे ॥२॥विधानपूर्वक गाणेशपंचक पूजित । सदा गणपतीस स्मरत । धौम्य तो शुद्धचित्त । अमावास्येस साक्षात्कार झाला ॥३॥गणराजास पुढयांत पाहत । मुनीश्वर तो तैं हर्षित । उठोनिया प्रणाम करित । पूजलें त्यानें भक्तिभावें ॥४॥पुनः प्रणाम करून । स्तुति करीतसे हात जोडून । गणेशासी करीतसे नमन । सर्वसिद्धिप्रदायक ॥५॥भक्तांसी भवसागरांत । रक्षिसी तूं भावयुक्त । अन्य जे असती विपरीत । त्यांना शासन तूं करिसी ॥६॥धन्य मी पाहिला तुज गजानना । किती स्तवूं मीं तुज पावना । महाभागा योगेशा माझ्या मना । अत्यानंद जाहलासे ॥७॥तुझ्या दर्शनमात्रें ज्ञानयुक्त । रचिलें स्तोत्र मी विनीत । सर्वज्ञश्रेष्ठा गणेशा तुजप्रत । नमन करितों मी श्रद्धेनें ॥८॥योगशांतिदायकासी । शांतिरूपा हेरंबासी । अनामयासी ज्येष्ठासी ज्येष्ठपदप्रदात्यासी नमो नमः ॥९॥ज्येष्ठांच्या ज्येष्ठरूपासी । शक्तिरूपें नामरूपात्मकासी । त्यांत आत्म्यांत रविरूपासी । समांत विष्णुरूपा नमन ॥१०॥अव्यक्तांत महेशासी । नमन संयोगांत निजात्म्यासी । निवृत्तींत अयोगासी । कलांशानें तूंच राहसी ॥११॥योगांत शांतिरूपासी । ब्रह्नणस्पते वंदन तुजसी । आदिमध्यान्तभेदें क्रीडापरासी । सिद्धिबुद्धिपते तुज नमन ॥१२॥नानामायाप्रचालकासी । स्वानंदवासीसी भक्तरक्षण तत्परासी । कैसें स्तवूं मी तुजसी । वेद योगिजन जेथ शमले ॥१३॥तेथ त्यांनींही धरिलें मौन । मी तर असें अजाण । म्हणोनि नाथा करितों वंदन । गजानना भावभक्तीनें ॥१४॥ऐसें बोलून गणाधीशास । घाली तो साष्टांग नमस्कारास । त्याचे पाय पकडुनि सोल्हास । जयजयकार करीतसे ॥१५॥त्यास वरती उठवून । ब्रह्मपती बोले गजानन । वर माग धौम्या मीं प्रसन्न । स्तोत्रें तुझ्या हया तोषलों ॥१६॥तूं रचिलेलें हें स्तोत्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । त्यास सर्वसिद्धि लाभतील । नानापरीच्या या जगतीं ॥१७॥हें स्तोत्र भक्तिविवर्धक । योगशांतिप्रदायक । जें जें वांछील तें तें दायक । ऐसा वर असे माझा ॥१८॥गणेशाचें ऐकून वचन । धौम्य म्हणे हर्षयुक्त मन । भक्तेशा गणाधीशा विनीतमन । भक्तवत्सला त्या वेळीं ॥१९॥प्रसन्न जरी तूं नाथा अससी । तरी उत्तम भक्ति दे मजसी । तैसीच योगशांति ज्यांत रमसी । सदासर्वदा तूं देवा ॥२०॥गणनाथ तथास्तु म्हणती । नंतर अंतर्धान पावती । गणेशास ध्यात । चित्तीं धौम्य सदा करी पूजन ॥२१॥तेथ ब्राह्मण बोलावून । मंत्रोच्चार करवून । स्थापिती गणेशमूर्ति मनमोहन । पूजी तीस निरंतर ॥२२॥अकर्मकारी ते सात्त्विक । कर्मकर्ते जाणा राजस लोक । विरुद्ध कर्मकतें तामस निःशंक । ऐसें शास्त्रसंमत असे ॥२३॥शौनक म्हणें सूताप्रत । ऐसें तीन भेदयूक्त । असती मानव समस्त । शास्त्रांत असें वर्णन असे ॥२४॥ब्रह्मार्पण कर्म करिती । ते सात्त्विक जन मुक्त होती । सकास कर्में जे आचरती । ते फिरती राजस जन्ममृत्यूंत ॥२५॥तामस नरकांत जाती । शिश्नोदरपरायण जे राहती । ऐशा त्रिगुणभावांत जाती । त्रिधा गतींनी त्रिविधजन ॥२६॥तेथ तामस भावपर । ते ख्यात असे शंकर । त्यास भजती पुरुषार्थपर । महाभाग जगांत या ॥२७॥परी तामस ते नरकांत जाती । ऐसी शास्त्राची उक्ती । तरी शिवभक्त सर्व ब्रह्मभूत होती । हें कैसें संभवावें ॥२८॥सूत म्हणती उत्तम प्रश्न । सर्वांच्या उपकारक महान । जैसें सर्वज्ञा व्यास मुखांतून वचन । ऐकिलें तैसें सांगतों ॥२९॥तम म्हणजे अज्ञान । गाढ झोपेंत । असतें का ज्ञान । हया अज्ञानापासून । द्विविध सर्व उत्पन्न होतें ॥३०॥सात्विक तें आंतर स्वप्न । जागृत बाहय राजस मोहन । त्यांचें मूल स्वरूप म्हणून । शंकरास तामस म्हणती ॥३१॥क्षणोक्षणी रजःसंस्थ । अवस्था विविधात्मिका असत । सात्त्विक निर्मितो पालक ख्यात । तामस त्यात लीन करी ॥३२॥म्हणोनि शौनका हें जगत । जाहलें तीन गुणांनीं व्याप्त । गर्भाधानापासून शोभत । मरणापर्यंत हें सारे ॥३३॥कर्म अकर्मं विकर्म । त्रिगुणसंयुक्त हें मनोरम । कर्मयोगाचे हे गुण परम । कथिले तुजला विप्रेशा ॥३४॥शंभु मुख्य सुरन जाणावे । शंकरभक्त पावती शंभूप्रत सारे । आतां ऐक मलमास माहात्म्य बरवें । वैश्य होता शम नावाचा ॥३५॥मालव देशाचा तो निवासी । मलमात माहात्म्य ऐकून तयासी । गणेशभक्ति चित्तासी । उपजून करी हें उत्तम व्रत ॥३६॥मलमास लागतां उषःकालीं स्नान । करून स्मरे गजानन । त्या स्मरणानंतर कार्यपर होऊन । मनन करी गणाधिपाचें ॥३७॥एके दिवशी रात्रीं मार्गांत । वैश्यास त्या निद्रा लागत । तेव्हां त्यास भक्षिण्या येत । दहा भतें महाबळी ॥३८॥त्याच वेळीं जाग येत । शम त्या दहा भूतांस पाहत । गणनायकास मनांत । स्मरण करी आपुल्या तैं ॥३९॥म्हणे स्वातंरी देवा गणेशा । करुणानिधे परेशा । रक्षण करी आतां भक्तेशा । हया प्रेतात्म्यांच्या हातून ॥४०॥मलमासाचे सप्त दिवस उरले । जरी आत्तांच मरण आलें । तरी व्रत भग्न होऊन जे केले । ते प्रयत्न व्यर्थ होतील ॥४१॥मलमास होता समाप्त । मारवी मजला तूं जरी तें इष्ट । मीं असे सांप्रत व्रतसंस्थ । रक्षण करी दयानिघे ॥४२॥मलमास व्रत तो आचरित । हें त्या भूतांस समजत । तैं तीं सर्व भयाकुल होत । पूर्वजन्म स्मरण झालें ॥४३॥तीं रडूं लागलीं विनीत । होऊन त्या वैश्यास नमित । तें पाहून होत विस्मित । विचारी तो त्या महाबळांसी ॥४४॥कां ऐसें दुःख करतां । मज सांगा तुमचीं कथा । प्रेतें म्हणती पूर्वजन्म आतां । सांगतों तुज आमुचा ॥४५॥त्या जन्मीं होतों ब्राह्मण । परी अनाचारपरायण । म्हणून मृत्यूनंतर दारूण । यमयातना भोगिल्या ॥४६॥त्या परम दारूण यातना । यमगृहीं भोगून नाना । भूतयोनींत जन्मून जनां । पीडा देऊं लागलों ॥४७॥येथ शीतोष्णादि द्वंद्वांत । पडलोम आम्हीं दुःखयुक्त । दैवयोगें भक्षिण्या तुज सांप्रत । आलों येथें गणेशभक्त ॥४८॥तुझ्या दर्शनें स्मरण होऊन । पूर्वजन्माचें आतांपासून । मलमासव्रत पावन । आतां करी आम्हांसी ॥४९॥गणेशस्मृतिसंयुक्त । स्नान करिसी तूं सतत । एक स्नानाचें पुण्य आम्हांप्रत । देई वैश्या दयाळा ॥५०॥त्यायोगें निष्पाप होऊं । पुनर्जन्मातीत जाऊं । प्रेतात्म्याचें वचन ऐकून स्वभावू । प्रसन्न त्याचा जाहला ॥५१॥तो शमवैश्य म्हणे हर्षयुक्त । दुःखयुक्त पाहून प्रेतचित्त । मलमासव्रत मीं काय करीत । नित्य स्नान मात्र केलें मी ॥५२॥पहाटें उठून गणेशस्मरण । पूर्वक केलें मी स्नान । त्याचा महिमा अवर्णनीय म्हणून । पुराणें सप्त वर्णिती ॥५३॥एकदां केलें नामस्मरण । त्याचें पुण्य देतों तुम्हांस पावन । त्यानेंच बंधहींन होऊन । मग करा गणेशभक्ति ॥५४॥ऐसें बोलून त्यांस देत । एक स्नानाचें फळ त्या प्रेतांप्रत । मलमासांत गणेश स्मूतियुक्त । स्नानाचें एवढें फळ थोर ॥५५॥नंतर गाणेशदूत येत । त्या भूतांसी घेऊन जात । स्वानंदपुरीं नें प्रेतांस त्वरित । गणेशभक्तीत ती रमलीं ॥५६॥तेथ लंबोदरास पाहत । तेव्हां तीं होत ब्रह्मभूत । ऐसें महा आश्चर्य घडत । शौनका मलमास व्रताचें ॥५७॥ऐसे नानाजन सिद्धि पावले । विशेषें अधिक मासी भले । ढौंढमासाचें महत्त्व आगळें । वर्णन करण्यासी असमर्थ ॥५८॥परी संक्षेपें तुज कथिलें । श्रवणमात्रें जें सर्वदायक झालें । पाठकावाचका पाहिजे लाभलें । वांछित सारें हयायोगें ॥५९॥इहलौकिक फळ भोगित । अंती पावे ब्रह्मरूप उदात्त । स्वानंदलाभ तया होत । मलमास व्रताचा हा प्रभाव ॥६०॥ओमितित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते मलमासमाहात्म्यवर्णनं नाम पंचत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP