मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ३० खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ३० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३० Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत वैशाख महिमान सांगती । शौनकादि ऋषिगण तें ऐकती । विश्वावसू नामा वैश्य भारती । होता द्रविड प्रांतांत ॥१॥त्यानें वैशाख माहात्म्य ऐकिलें । मन त्याचें मुदित झालें । गणेश भक्तिपत यानें ठरविलें । व्रत हें आपणही करावें ॥२॥तो कुटुंबधारक सतत । व्यवसाय आपुला करित । वैशाखमासीं स्नान व्रत । दीपदानही केलें तयानें ॥३॥पूर्णिमा वैशाखांतली आली । रात्रीं स्वगृहा जाण्या वेळ झाली । व्यवसाय सोडून त्या वेळीं । निघाला तो विश्वावसून ॥४॥मार्गांत परी राक्षस क्रूर । आला अवचित एक उग्र । त्या वैश्यास भक्षिण्या आतुर । पातला नगरमार्गावरी ॥५॥त्यास पाहून विव्हल । विश्वावसू स्मरे गणेशास विमल । भूमीवरी पडला अबल । त्या राक्षसाच्या भयानें ॥६॥त्यास धरातलीं पडलेला । पाहून राक्षसास आठवला । आपुला पूर्वजन्म वृत्तान्त सगळा । आश्चर्य ऐसें तें घडलें ॥७॥तो रडूं लागला अवचित । आपुलें पूर्वकर्म स्मरत । विश्वावसू सावधान होत । क्षणार्धानें तदनंतर ॥८॥त्यास करी अभिवंदन । राक्षस बोले विनीत वचन । मी असे धूम्रराक्षस जाण । पूर्व जन्मींचा वैश्यसुत ॥९॥तुझ्या दर्शनमात्रें उपजलें । पूर्वजन्मीचें ज्ञान भलें । पूर्वीं विप्रकुळीं गेलें । माझें आयुष्य आनंदें ॥१०॥त्या जन्मीं सुरुचि नाम होतें । विश्वामित्र कुळीं नातें । परी पापांकडे झुकलें होतें । चित्त माझें त्या वेळीं ॥११॥मी एका शूद्रासी । पौराणिक दीक्षा दिली त्या वेळेसी । तो मासेमार कोळी प्रतिदिवशीं । आनंदानें वाची पुराण ॥१२॥ब्राह्मणांनी निंदित । कर्म तें केलें स्वधर्मदूषक सतत । मी मेल्यावर यमदूत । घेऊन गेले मज यमसदना ॥१३॥तेथ चित्रगुप्त म्हणत । नीतिविशारद जो असत । हा विप्र होता स्वधर्मरत । सदाचारयुक्त सदा ॥१४॥परी याने एका मात्स्य शूद्राप्रत । पुराणज्ञान शिकविलें मूढचित्त । अन्य ब्राह्मण यासी सांगत । परी यानें पाप तें न सोडिलें ॥१५॥तें धर्मराज क्रोधयुक्त । माझा इतिहास ऐकून म्हणत । मारा या पापकर्म्यासी बहुत । यमदूत तैसें करिती झणीं ॥१६॥पुढें कर्मफळ भोगून । मी सांप्रत हें राक्षसजीवन । वैश्यसत्तमा लाभून । दीन पतित जाहलों असे ॥१७॥सतत भूक लागून अत्यंत । भटकतों मी अहोरात्र गावांत । आज तुज पाहतां अवचित । पूर्व जन्माचें स्मरण झालें ॥१८॥आतां महामते मज तारावें । अन्यथा संसारांत मी काय करावें । दुःखावेगें देहत्यागाचें उदासभावें । करीन आणखी पातक ॥१९॥ऐसें बोलून राक्षस रडत । तेव्हां त्या विश्वावसूस दया येत । तो जाहला अति विस्मित । म्हणे धूम्रा मी काय करूं ? ॥२०॥सांग प्राज्ञा तुझा उद्धार । कोणत्या प्रकारें होणार । धूम्र म्हणे तैं तूं थोर । गणेशपूजक पुनीत ॥२१॥वैशाखांत दीपदान । ढुंढिसन्निध करिसी प्रतिदिन । त्याचें पुण्य दे मज मनापासून । त्यायोगें मुक्त होईन मीं ॥२२॥विश्वावसु म्हणे तयाप्रत । दीपदानाचें पुण्य अपार असत । गणेशाच्या पुढयांत । तें पुण्य अवघें मीं न देईन ॥२३॥तथापि एक वात लावण्याचें पुण्य । अर्पितों मी तुज एकवचन । त्यानेंच मुक्त होशील धन्य । राक्षसें तें मान्य केलें ॥२४॥विश्वावसू आपुलें वचन पाळित । एका वातीचें पुण्य देत । त्या वेळ तेथ अकस्मात । गणेशविमान अवतरलें ॥२५॥त्या विमानांतून गणेशदूत । बाहेर पडले प्रसन्नचित्त । त्या धूम्रराक्षसा घेऊन जात । स्वानंदलोकीं तत्काळ ॥२६॥आणखीही एक चरित । वैशाखमासाचें असें ज्ञात । ऐक तें विप्रा पुनीत । सर्वपापहर श्रवणपठणें ॥२७॥कोणी एक महापापी जात । चोरी करण्या गणेशमंदिरांत । वस्त्रें पळविण्या इच्छित । रात्रीच्या अंधकारांत ॥२८॥गणराजाच्या समीय जात । वैशाख महिना तो असत । दीप तेजविहीन एक पाहत । दुंढिसन्निध त्या वेळीं ॥२९॥त्यानें वात चाळविली । दीपज्योत तैं पाजळली । वस्त्र चोरण्याची इच्छा झाली । ज्ञातिदूषकाच्या मनांत ॥३०॥तेवढयांत अकस्मात । राजपुरुष कोणी येत । देवळाच्या रक्षणा त्वरित । दुष्ट चोर तो पळाला ॥३१॥त्या राजपुरुषें हाहाकार । करितां जमले लोक अपार । योजन एक पाठलाग पर । करून ताडिलें त्यास अपार ॥३२॥तो त्या भडिमारें झाला मृत । यमदूत त्यासी नेत । नानाविध यातना तो भोगित । यमदूत त्यासी गांजिती ॥३३॥यमापुढे उभे करिती । तेव्हां यम विचारी क्रुद्धमती । गणेशाच्या दीपावरती । वात तूं चाळविलीस ॥३४॥त्यायोगे तेथ प्रकाश पसरला । गणेशासमीप त्या वेळा । त्याच्या पुण्याईचा लाभला । अंश तुला रे चोरटया ॥३५॥तें पुण्य प्रथम भोगिसी । किंवा आधीं पाप फेडिशी । पापिष्ठा सांग काय इच्छिसी । तैसा निर्णय मीं करीन ॥३६॥शूद्रें प्रथम मागितलें । म्हणे पाप भोगीन मागून सगळें । यमधर्मे तैसेंचि केलें । त्या पुण्यें जन्मला वैश्यवंशात ॥३७॥धर्मंप्रिय नामें महान । नाना भोग भोगून । केलें त्यानें पदार्पण । यौवनांत क्रमानें ॥३८॥गणेशभक्तींत मग्न । केलें विशेषें दीपदान । अंतीं होऊन पापहीन । गणनायका सन्निध गेला ॥३९॥तो चोर ब्रह्मभूत होत । ऐसा संस्कार आघवे उद्धरित । वैशाखमासाचें व्रत । भुक्रिमुक्तिप्रदायक ॥४०॥हें महिमान पावन । ऐकेल किंवा वाचील एकमन । त्यास सर्वार्थ लाभून । अंतीं गणपतींत लीन होई ॥४१॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते वैशाखमासमाहात्म्ये नानाजनोद्धारवर्णनं नाम त्रिंशोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP