मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय २७ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय २७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २७ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक विनवी सूतासी । वैशाखाचें माहात्म्य आम्हांसी । तैसेची श्रावण माहात्म्यासी । मलमास महिमाही सांगावा ॥१॥सूता तूं सर्वांर्थकोविद । सांग सारें आम्हां विशद । तेव्हां सूत सांगे सौख्यप्रद । वैशाखव्रताचें महिमान ॥२॥वृत्रासुर महादैत्य जिंकित । त्रैलोक्यासी महा बळवंत । कर्मखंडन मार्गें वांच्छित । देवांस नष्ट करावया ॥३॥तेव्हां देवगण सारे भयभीत । स्वगुरूसी शरण जात । उपोषणपरायण ते प्रार्थिंत । त्यास म्हणे बृहस्पती ॥४॥उदारधी तो महातेज युक्त । इंद्रादि देवगणा सांगत । करावें तुम्हीं वैशाख व्रत । तेणें सामर्थ्य लाभल ॥५॥त्या व्रताच्या प्रभावानें सुरनायक । दधीचीच्या अस्थींचे पावक । वज्र लाभून ठार करील निःशंक । महासुरा त्या वृत्रासी ॥६॥सुरर्षी तें ऐकून नमिती । तदनंतर वनांतरीं जाती । गुप्तरूपें आचरती । वैशाखव्रत आनंदानें ॥७॥गाणेश पंचकातें नित्य सेविती । गणेशाचें ध्यान करिती । स्मरणपूर्वक पूजिती । परम भाविक ते सारे ॥८॥वैशाखी पौर्णिमेच्या दिनीं । रात्री पाहती ते स्वप्नीं । सर्व सुखावह गणराज भक्ताभिमानी । पूजिती भाव भक्तीनें ॥९॥ती मूर्ति त्यांस म्हणत । मी प्रवेशून इंद्रदेहांत । मारीन त्या महासुरास । निश्चित । वरदान हें माझें असे ॥१०॥अमर मुनी सारे जागृत । होऊन स्वप्न आठवित । ते सारे जाहले विस्मित । परस्परांसी सांगती ॥११॥सर्वांसी पडलें तेच स्वप्न । तदनंतर देवनायक वर आठवून । क्रोधसमायुक्त करी गमन । दधीचीच्या आश्रमाप्रती ॥१२॥देवंसहित तेथ जाऊन । त्या दधीतीसी प्रार्थूंन । त्याच्या अस्थींचें वज्र करून । युद्धास गेला देवराज ॥१३॥त्या समयीं वृत्रासुरा आव्हान । देऊन करी युद्ध दारून । वज्र मुनिअस्थीचें वापरून । वृत्रासुरा जर्जर केलें ॥१४॥दैत्यांसहित वृत्र लढत । इंद्र अमरगणांसह झुंजत । त्या वृत्रासुरास मारित । तेव्हां पळाले दैत्य सारे ॥१५॥ते पाताळ लोकांत गेले । देवेंद्रापुढें नमले । देव सारे आनंदले । गणपतीसी नमिती तैं ॥१६॥बदरी अरण्य देशस्थ गणेशास । स्तविती ते भावसुरस । देवर्षींचें स्तोत्र त्या समयास । गणनायका प्रिय झालें ॥१७॥परमात्म्यासी गणांच्या पतीसी । गणात्म्यासी परेशासी । अनंतमायाखेळकर्त्यासी । ब्रह्मेशा तुज नमो नमः ॥१८॥महाविघ्ननाशासी । महात्म्यासी विघ्नेशासी । सुभक्तांच्या पालकासी । हेरंबा तुज नमन असो ॥१९॥महादीनपालकासी । ढुंढीसी लंबोदरदेवासी । देवदेवेशासी अनाथासी । प्रणाथा तुज नमन असो ॥२०॥नाथ हीनासी नाथनाथासी । वक्रतुंडासी परात्परतमासी । योगशांति प्रदात्यासी । योगपते तुज नमन असो ॥२१॥योगासी सगुणासी निर्गुणासी । सुगुणनिर्गुणवर्जितासी । अनंतमायेनें संचारकर्त्यासी । मायाहीना तुज नमन असो ॥२२॥मायिका मोहकर्त्यासी । मूषकवाहनासी मूषकध्वजासी । सिद्धिबुद्धिपते तुजसी स्वानंदस्था । आमुचें नमन असो ॥२३॥गणाध्यक्षा किती करावे स्तवन । शांतिरूप परात्पर तूं पावन । वेदादीही धरिती मौन । शास्त्रवेते योगोजनही ॥२४॥ऐसें बोलून करिती नमन । देवर्षी नंतर करिती गमन । आपुल्या स्थानीं परतून । हर्षयुक्त सारे चित्तांत्त॥२५॥वर्णाश्रमयुक्त जन । जाहले विगतज्वर पावन । देवर्षींसी हविर्भाग लाभून । आनंदी आनंद झाला ॥२६॥ऐशापरी हें वैशाखव्रत । प्रभावें त्याच्या देवेंद्र वृत्रासी मारित । देवमुनी सुखी होत । ऐसीचि अन्य कथा असे ॥२७॥गार्ग्यवंशज द्विज पुनीत । शिवदत्त नामा गणेशभक्त । नित्य गणनायकासी भजत । शास्त्रधर्मानुसारें ॥२८॥भार्यापुत्रसमन्वित । अग्निहोत्र तो नित्य करित । होता अत्यंत तेजयुक्त । एकदा गर्ग तेथ आले ॥२९॥योगींद्र ते येती सदनांत । जाहला मुदित शिवदत्त । सर्वार्थ कोविद त्यांस पूजित । महाभागा गर्गासी ॥३०॥आपुल्या सुतास तो पाहत । नित्य जो होता सेवारत । विनयशाली मनीं वांछित । मुक्ति सुख सर्वदा ॥३१॥तें पाहून गर्ग तोषला । आपुल्या पुत्रास म्हणाला । अरे शिवदत्ता सांग बाळा । काय तूं मनीं वांछितोसी ॥३२॥जें जें तुझ्या मनांत । तें तें पुरवीन समस्त । शीलप्रभावें तुझ्या संतुष्ट । यांत संशय कांहीं नसे ॥३३॥त्याचें तें ऐकून वचन । शिवदत्त करांजली जोडून । तयास प्रणाम करून । सुखप्रद वचन बोलला ॥३४॥योगींद्रसत्तमा जरी तूं प्रसन्न । वेदरहस्य जें गुहय शोभन । तें सांगून करी पावन । कृतकृत्य मजलागी ॥३५॥गर्ग म्हणे तयाप्रत । चौर्यांशी लक्ष योनींत । मानवयोनि श्रेष्ठ वर्तत । विशेष सुज्ञ जरी त्यांत जाहला ॥३६॥धर्मार्थकाममोक्षांची पात्रता । त्या सुज्ञास लाभे तत्त्वता । त्यांतही ब्राह्मण वर्णांत जन्मतां । श्रेष्ठता परम लाभते ॥३७॥ऐसें शास्त्रसंमत मत । सर्वकर्माधिकार तैं लाभत । त्या स्वधर्मशास्त्रज्ञांत । तपयुक्त अधिक श्रेष्ठ जाणा ॥३८॥त्या तपस्व्यांत ज्ञानी महाश्रेष्ठ । सर्वत्र आत्मदर्शन तयाप्रत । त्यांतही योगी अधिक श्रेष्ठ । गाणपत्य योगी श्रेष्ठतम ॥३९॥जन्मो कोणत्याही वर्णांत । गाणपत्य अधिक संमत । गणेशयोगी श्रेष्ठ सर्वांत । ऐसें सांगे वेदवाणी ॥४०॥ऐसें हें वेदान्तसंभूत । सार तुज सांगितलें समस्त । म्हाणोनि भजावें गणेशाप्रत । तेणें कृतकृत्य होशील ॥४१॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णंचरिते वैशाखमासमाहात्म्ये शिवदत्तबोधो नाम सप्तविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP