मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय २० खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय २० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २० Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगती । तदनंतर बहुत काळ करिती । उपासना सहा महिने भावभक्ती । निराहार राहूनिया ॥१॥ते सर्वें गणेशास भजती । भक्तिभावें संतुष्ट करिती । कार्तिक मार्गशीर्ष माघ असती । वैशाख श्रावण आश्विन मास ॥२॥गणेशाच्या ध्यानांत तत्पर । दहा वर्षें करिती तप उग्र । विघ्नेश प्रकटती तैं उदार । वर देण्यासी तयांना ॥३॥संपूजित प्रेमें सुत । तो वरदायक त्यास म्हणत । मागा वर जे मनोवांछित । सहा महिने ते तेव्हां नमिती ॥४॥गणेशास प्रणिपात करून । आनंदित चित्तांत होऊन । भक्तीने मान वाकवून । विघ्नेशीसी प्रार्थिती ॥५॥सर्वेशा वर देण्या आलास । तरी ऐसा वर देई आम्हांस । आमच्या कालावधीत कार्य करणारास । बहुत पट फळ लाभवें ॥६॥त्यायोगें आमची वेळ येता । लोक विशेषें यत्न करता । दाखवतीत सत्कर्मांची महत्ता । अधिक जेणें वाढेल ॥७॥तुझ्या भक्तीचें आलय सतत । आम्हांसी करी देवा जगांत । गणनायका तुझे दास दोषवर्जित । कर्मापासून जे जाणती ॥८॥श्रीगणेश तेव्हां त्यांस सांगत । अन्य महिन्यांत सत्कर्म करित । जन त्यायोगें फळ लाभत । त्याहून दसपट अधिक फळ तुमच्यांत ॥९॥अन्य महिन्यांहून दसपद फळ । मार्गशीर्षात करिता कर्म अमल । त्याहून दशाधिक फळ । वैशाखमासीं करितां तैं ॥१०॥वैशाखाहून दसपट कार्तिकांत । कार्तिकाहून माघांत । माघाहून अधिकमासांत । दसपट फळ वाढत असे ॥११॥त्याहून अधिक ढौंढ मासांत । ऐसा श्रेष्ठताक्रम असत । तपानुसार व्हाल जगांत । श्रेष्ठ तुम्हीं मासांनो ॥१२॥अधिकमासाचा देव असे । मी ढुंढिराज जात संशय नसे । ढौंढ मास नांवें ख्यात होतसे । तो महिना यापुढें सांप्रत ॥१३॥असा चिन्हानें युक्त । श्रावण मास प्रिय मज असत । नाना सिद्धिप्रद निश्चित । अनुष्ठानकर्त्या मानवांसी ॥१४॥श्रावणांत नाना यत्नपरायण । भाद्रपदांत चार दिन जाण । उपोषणयुक्त करी पूजन । तोषवावे मजसी सदा ॥१५॥प्रतिपदेस प्रारंभ करून । चतुर्थीस ब्रत पूर्ण होऊन । त्या रात्री करावें जागरण । पंचमीस पारणा करावी ॥१६॥ब्राह्मण भोजन यथाशक्ति । घालून द्यावी तयांप्रती । विपुल दक्षिणा देतां चित्ती । सर्व सुखें मिळतील ॥१७॥अंतीं स्वानंदलोक प्राप्ती । मुख्य पाचा मासांत स्नान करिती । सर्वभावें विशेषें अनुष्ठान करिती । श्रावणांत त्याचें अधिक महत्त्वा ॥१८॥ऐशियापरी तुम्ही मास । महाभाग व्हाल पात्र पूजेस । सत्कर्म करिती त्या जनांस । वरदान ऐसें माझें असे ॥१९॥तदनंतर पावले अन्तर्धान । भक्तवत्सल गजानन । मासही हर्षभरित मन स्वकार्यरत जाहले तैं ॥२०॥हे मासचरित्र वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यास मासांचें पुण्यफळ लाभेल । गाणेश होईल तो ख्यात ॥२१॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते मलमासादिमासेभ्यो वरप्रदांन नाम विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP