मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ११ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ११ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ११ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिव सांगती विप्रांप्रत । एकदां मी कैलासीं स्थित । गिरिजेच्या सान्निध्यांत । गणेशासी भजत होतो ॥१॥तैसें मज भजतांना पाहत । नंदी तेव्हां मज म्हणत । शिवा तूं सर्वरूप प्रकीर्तित । सर्वस्वी सर्वांना फलदाता ॥२॥तूं कर्मांचा कर्मधारक । योग्यांचा योगनाथ पावक । योगसिद्धींचा तूं दायक । तुझ्याहून श्रेष्ठ कोण असे ॥३॥तरी तूं गजाननासी । कैसा हो भजत अससी । वेद शिवसुत ऐसें ज्यासी । वर्णिती त्यास कसे पूजिता ॥४॥तूं स्वामी तो तुमचा सुत । तरी स्वसुतास कैसें भजत । ईश हें तुझें नांव ख्यात । सर्वांचा स्वामी तूं सदाशिव ॥५॥तुझा ईश न ज्ञात । वेदांतही तूं एकच सर्वभावन उक्त । जनांस मोहविण्या भजत । बहुधा तुम्हीं गणनाथासी ॥६॥शैव रहस्य गुप्त ठेवावें । ऐसें वाचून सवेभावें । पार्वतीसह तूं भक्तिभावें । हें पूजेचें नाटक करिशी ॥७॥तरी स्वामी ऐसें वृथा न करावें । गणेशभजन मोहभावें । शैवासी मोहद जें व्हावें । व्यभिचारप्रद देवा ॥८॥मुद्गल सांगती दक्षाप्रत । नंदीचें वाक्य ऐकून म्हणत । सदाशिव हर्षोत्फुल्लनयन धीरोदात्त । महापाशुपतासी त्या ॥९॥नंदी तूं माझा पक्षपाती । गणेशासी न जाणसी निश्चिती । मीं गणरूप ही वेदोक्ती । विचक्षणा आठवावी ॥१०॥गणे हें समूहरूप अनंत । त्या महात्म्याचें वर्तत । मी ईशसमूहाचा गण असत । गणपतीचा प्रख्यात ॥११॥गणेश एकमेव सत्य विश्वांत । त्याचे अन्य सर्व गण ज्ञात । ब्रह्माकार विश्वाकार असत । ब्रह्मेशाचें त्या मानदा ॥१२॥विद्या नानाविध स्मृत । ज्ञानप्रकाशक त्या असत । त्या सर्वही उत्पन्न होत । विद्याधीश मीं असें ॥१३॥ऐसें वेदवादी सांगती । योगविद्येचा आश्रय स्वचित्तीं । घेऊन गणेश भावभक्ती । सत्यार्थें मीं प्रकट करीन ॥१४॥समाधिज जें परब्रह्म । तेंच पुत्र ऐसें अभिराम । ख्यात झालें गणेश म्हणून । माझें पुत्रत्व पावला ॥१५॥विद्येनें ज्ञानानें युक्त । विष्णु शंकर जे अमर असत । ते विद्याधिप न ज्ञात । माझे शिष्य यांत न संशय ॥१६॥त्यांनीं योगबलानें प्रकट केला । गणेश समाधिज सुत भला । तो त्यांचा तैसाचि योग्यांचा झाला । सुत ऐसें तूं जाणावें ॥१७॥मीं आधीं ब्रह्मसाक्षात्कार । गुरूविण अनुभविला थोर । विद्याबळानें विश्वंभर । म्हणून मुख्य गुरु मीं ॥१८॥म्हणून गणनायक शिवसुत । ऐसें वेद सांगतात । विष्णु आदि मुख्य सुरेश्वर न ख्यात । गणेशपिता म्हणोनी ॥१९॥म्हणोनी मीं त्या ब्रह्मेशास । योगरूपा ब्रह्मवंदितास । भजतों दास मीं स्वामीस । न मोहविण्या अन्यातें ॥२०॥शिवाचें ऐकून वचन । नंदिकेश्वर विस्मितमन । महादेवा सर्वज्ञा नमून । पुनरपि विनवी नम्रभावें ॥२१॥गणेश आमुचा कुलदेव । यांत संशय नसे सर्वथैव । विभो त्याचें ज्ञान अभिनव । मंत्र विधि आदि मज सांगा ॥२२॥शिव तदनंतर सांगती । चित्त पंचविध असे जगतीं । बुद्धी परम ती म्हणतीं । सिद्धि नानाभ्रांतिकरी ॥२३॥ऐश्वर्यमयी ती ह्रदयांत । सदैव सिद्धिबुद्धि मध्यांत । गणेशाचें बिंब पायायुत । बिंबभाव त्यागें गणेशरूप ॥२४॥सरस चित्त त्यागून । योगिवंद्य तूं होशील पावन । एकाक्षरविधानें करून । योगसाधनांनी भज त्यासी ॥२५॥ऐसें सांगून त्यास देत । एकाक्षर मंत्र अद्भुत । विधिपूर्वक तो स्वीकारित । वनांत जाऊन तप करी ॥२६॥निराहार राहून आराधित । द्विरदाननासी नंदी ध्यानयुक्त । समाधियोगें विशेषें युक्त । शंभर वर्षें ऐसीं गेलीं ॥२७॥तेव्हां तो योगींद्र झाला गणेश वर देण्या प्रकटला । आश्रमांत पाहून गणनाथाला । हर्षभरित नंदिकेश्वर ॥२८॥उठून प्रणाम करित । भावभक्तीनें पूजित । स्तोत्र गाई भावयुक्त । आश्चर्य तेव्हां एक पाही ॥२९॥गणेशाच्या डावीकडे स्थित । पार्वतीस तैं पाहत । तें पाहून अति विस्मित । गणेशकृपेनें ज्ञान झालें ॥३०॥त्यायोगें गणेशाचें सर्वकार्यजात । जाहलें तयासी ज्ञात । तेव्हां तो नंदिकेश विचार करित । बाह्मरूपधर हा महादेव ॥३१॥गिरिजेचा पति ख्यात । पंचमुखादि चिन्हांनी युक्त । त्रिनेत्र नरदेहयुक्त । भिन्नभाव प्रदर्शक ॥३२॥आनंदात्मरूपा पार्वतीख्यात । विष्णुपिणी ती असती । शिवदेवमयी उक्तीज्ञात । तिचा आत्मा शिव असे ॥३३॥गजाकार स्वयं शंभु वर्तत । ऐक्यभोगपरायण सतत । अर्धागीं प्रकृति असत । त्यायोगें अर्धनारीनटेंश्वर तो ॥३४॥नरकुंजरयोगें प्राप्त । गणेशाकारता तयाप्रत । शिव तो ब्रह्ममय साक्षात । गिरिजेनें युक्त असे ॥३५॥योगमायामयी रम्या स्थित । गणेशांकावरी ती पुनीत । पार्वती पार्वतीनाथ विलसत । स्वयं गणेश त्या समयीं ॥३६॥तोच वरदानार्थ उपस्थित । शिवचित्तमय तो प्रख्यात । त्यास प्रणास करून स्तवित । रोमंचित कृतांजली ॥३७॥गणेशासी शांतिप्रदासी । शांतिरूपासी शांतिधरासी । नरांच्या ह्रदयस्थितासी । नागह्रदयस्थिता नमन ॥३८॥हेरंबासी सिद्दिबुद्धिविहारासी । स्वानंदरूपासी चौरोशवाहनासी । पार्वतीपतीसी शिवचित्तगासी । लक्ष्मीपते तुज नमन ॥३९॥विष्णूचित्तस्थमूर्तीसी । संज्ञापतीसी भानुह्रदयस्थितासी । आदिशक्तिपतीसी । शक्ति चित्तग मूर्तीसी नमन ॥४०॥सावित्रीपतीसी गायत्रीपतीसी । ब्रह्मह्रदय खेळकासी । ओंकार चित्तवासीसी । शचीपते तुज नमन ॥४१॥इंद्रचित्तग मूर्तीसी । स्वाहापतीसी परेशासी । अग्निह्रदयस्थितासी । नररूपासी नमन तुला ॥४२॥भिन्नसौख्य प्रचारकासी । सर्वत्र भिन्नभावासी । निर्गुणासी कुंजराकार मूर्तीसी । निर्गुणस्थितासी नमन असो ॥४३॥सर्वत्र अभेदसौख्यासी । नरकुंजररूपासी । योगाकारासी योगपतींसी । पूर्णयोगस्वरूपा नमन असो ॥४४॥धन्य मी कृतकृत्य प्रसन्न । पाहिला आज गजानन । ब्रह्मेशा किती करूं स्तवन । वरदा तुजला नमन असो ॥४५॥ऐसी स्तुती करून । प्रेमभरें करी नमन । ह्यास भक्तवत्सल म्हणे वचन । नंदीशा वर माग महाभागा ॥४६॥तुझ्या तपानें मीं तुष्ट पुरवीन तुझें सर्व इष्ट । तूं रचिलेलें स्तोत्र अद्भुत । भुक्तिमुक्तिप्रद सर्वदा ॥४७॥पाठका श्रोत्यांस सर्वसिद्धिकर । होईल हें सर्वदा स्तोत्र । तेव्हां म्हणे नंदिकेश्वर । तुझी दृढ भक्ति देई मजला ॥४८॥मज गाणपत्य करी विनत । स्वामी सदैव तव भक्तिरत । विघ्नेशपरायणा तुझ्या भक्तांत । अग्रस्थान मिळो मजला ॥४९॥मी जेथ तप आचरिलें । तें स्थान क्षेत्र व्हावें भलें । गणाधीशानें तस्थाऽतु म्हटलें । अंतर्धान पावे तदनंतर ॥५०॥तदनंतर ब्राह्मणहस्तें स्थापित । गणेशमूर्ति त्या क्षेत्रांत । नंदिकेश भक्तियुक्त । पूजन करी मनोभावें ॥५१॥पार्वतीगणप ऐसें नाम ठेविती । महर्षि त्याचें पूजन करिती । सर्वसिद्धिकर तें जगतीं । प्रख्यात जाहलें सर्वांसी ॥५२॥तदनंतर नंदी शंकराप्रत । जाऊन सांगे तो वृत्तांत । महायोगींद्र मुख्य वसत । शिवसान्निध्यांत आनंदे ॥५३॥हें अंबिकाविघ्नेश चरित । कथिलें तुज पुनीत । धूम्रवर्णाश्रम हा गणेश असत । सर्व सिद्धिप्रद सर्वेश ॥५४॥जो हें चरित्र वाचील । अथवा श्रद्धेनें ऐकेल । त्यास भुक्ति मुक्ति लाभेल । अंतीं स्वानंदलोक लाभे ॥५५॥ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णंचरिते पार्वतीगणेशचरितं नामैका दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP