मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय २५ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय २५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २५ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक तदनंतर प्रार्थित । महाभागा सूता सांप्रत । माघमासव्रत अद्भुत । गणेश प्रीतिवर्धक जें ॥१॥तें सांगावें आम्हांप्रत । कथा या अति माधुर्ययुक्त । ऐकतां तृप्त न होत । आमुचें चित्त कदापिही ॥२॥सर्वसिद्धिप्रद अपूर्व असत । गणेशाच्या हया कथा समस्त । ऐकून शौनकाचें वचन विनीत । सूत सांगे तयासी ॥३॥प्रल्हादाचा पुत्र तेजयुक्त । दैत्यपालक बळवंत । विरोचन नामें ख्यात । राक्षसांचा शिरोमणी ॥४॥तो शुक्राचार्यासमीय जाऊन । तया मुनिसत्तमा करी वंदन । दुःखभरें बोले वचन । निःश्वास सोडून असुरेशा ॥५॥दैत्य सारे देवजित । स्वामी असतो भयसंत्रस्त । पाताळांत तें राहत । हितप्रद मज उपदेश करा ॥६॥शुक्र तेव्हां सांगत । आकृष्णेन इत्यादि मंत्रें सूर्याप्रत । आराधी त्यानें तुजप्रत । सामर्थ्य अपूर्व लाभेल ॥७॥तूं दानवपालक होशील । तो ऐकून उपदेश विमल । महाबाहू विरोचन अमल । करी तप त्याप्रमाणें ॥८॥रवीचें करून ध्यान । देई विशेषें अर्घ्यदान । उपस्थानपर होऊन । आराधना करी सर्वदा ॥९॥दिव्यवर्षसहस्त्रान्ती होत । स्तविता प्रसन्न तयाप्रत । वर देण्या प्रकटत । विरोचनाच्या आश्रमांत ॥१०॥त्यास आलेला पाहून । विरोचन करी नमन । पूजोनियां करी स्तवन । देवेशाचें अथर्वशीर्षें ॥११॥तेव्हां संतुष्ट भानू म्हणत । भक्तवरप्रद तयाप्रत । वर माग महादैत्या मनेप्सित । देईन मीं तो या क्षणीं ॥१२॥विरोचन तेव्हां मागत । मज न यावें मरण जगांत । कोणाच्याही हस्तें सतत । ऐसें करी दिवाकरा ॥१३॥चराचराचें राज्य देई । त्रैलोक्यांत बलात्मता तीही देई । तें ऐकतां विस्मित होई । सविता परी वचनबद्ध ॥१४॥आपला मुकुट परम तयास देऊन । म्हणे वचन मनोरम । जगदीश्वर तो भक्ताभिराम । विरोचनासी प्रेमानें ॥१५॥हा मुकुट धारण करी । मृत्यूचें भय होईल नित्य दूरी । दुसर्याचा हात स्पर्श न करी । मस्तकासी तुझ्या कदापी ॥१६॥ऐसें तूं नित्य रहावें । परहस्त मस्तकीं न यावें । ऐसें करी सावधानभावें । अन्यथा तसें होतां मरशील ॥१७॥जरी परक्याचा हात डोक्यावर । तुझ्या येईल तैं मरण उग्र । मुकुटहीन स्थितींत तुझ्यावर । संकट ओढवेल निश्चित ॥१८॥म्हणोनी राही सावधान । त्रैलोक्य राज्य तुज दिलें दान । जें जें वांछित तुझें मन । तें तें सफल होईल ॥१९॥ऐसें बोलून अन्तर्धान । सर्वार्थज्ञ पावला सूर्यनारायण । प्रसन्नात्मा विरोचन । गेला आपुल्या गृहासी ॥२०॥तदनंतर शुक्राचार्य । दैत्यांचा जो आचार्य । तो बसती तयास राज्यावर । दैत्येश म्हणोनी अभिषेकोनी ॥२१॥दैत्यांच्या संगें तो जिंकित । महाबळ धरणी समस्त । नंतर शेषास जिंकून जात । पाताळ लोकही वश केला ॥२२॥त्यापुढें अमरावतीस जात । देवेंद्रासही तो जिंकित । तेथून विकुंठलोकांत । विष्णूसवें युद्ध करी ॥२३॥विष्णु विरोचनांचें रण । चालालें बहुत दिन दारूण । परी अंतीं विष्णूस जिंकून । हर्षित झाला विरोचन ॥२४॥विष्णुसहित देव समस्त । पळाले तैं वनांत । दैत्य स्वर्गाचें सुख भोगित । ऐसें कृत्य विरोचनाचें ॥२५॥तदनंतर दैत्य वीरांस । वैकुंठादि लोकांसी उच्चपदास । देऊनिया स्वनगरास । परतले अन्य दैत्यवृंदासंसें ॥२६॥तदनंतर तो दैत्यपयुक्त । नाना विध भोग भोगित । पापयुक्त स्त्रीमासांत लोलुप होत । ऐसा गेला बहुत काळ ॥२७॥तदनंतर त्या दैत्येशास सांगत । अन्य दैत्य उपाय अद्भुत । म्हणती देवांचा नाश सतत । कर्मवर्णाश्रम खंडिता ॥२८॥आसुरकर्मं सर्वत्र करवावें । यज्ञकर्मांदि सारें उधळावें । तें विरोचनास सर्व भावें । आवडलें उपदेश वचन ॥२९॥त्यानें तैसी आज्ञा वंदिली । असुर लोकांची पोळी पिकली । त्यांनीं यज्ञस्थानें भ्रष्ट केलीं । वर्णांश्रम व्यवस्थ दवडून ॥३०॥तेव्हां त्रैलोक्यीं हाहाकार । करिती मुनिजन दुखपर । ऐसा जाता काळ भयंकर । देवांस स्वाहाकार न मिळे ॥३१॥देवांस घडलें उपोषण । तेव्हां मुनिजन जाती शरण । केशवास विनीतमन । प्रर्थिती वधार्य असुरेशाच्या ॥३२॥तो देवेश विष्णूही खिन्न । सोडी निःश्वास दुःखितमन । दैत्यनाशाचा उपाय नाठवून । कुंठित झाली मति त्याची ॥३३॥तदनंतर होण्य़ा दुःखमुक्ति । विघ्नेश्वराम आठवी चित्तीं । गणेशकृपेनें तेथ येती । देवल मुनी त्या वेळीं ॥३४॥त्यास प्रणास करून । देव विचारिती विनीतमन । कार्यसिद्धीचा उपाय नूतन । विरोचनाच्या वधार्थ ॥३५॥तेव्हां देवल हर्षिल । म्हणे समीप माघ मास असत । पुण्यप्रद त्या मासांत । गणेशाचें व्रत करा ॥३६॥स्नान व्रत माघ मासांत । पूजन गणेशाचें भक्तियुक्त । करितां पावाल ईप्सित । ऐसें सांगती देवल योगी ॥३७॥माघभव विधि सांगती । गणेशपंचक वर्णन करिती । व्रत उपदेशून योगी जाती । स्वच्छंदानें तदनंतर ॥३८॥केशवादी गणेश भजनांत । जाहलें माघमासीं रत । त्या मासाचें गणेशव्रत । यथाविधान करिती तैं ॥३९॥तें संपूर्ण होतां व्रत । आकाशवाणी तेथ होत । विष्णू तूं स्त्रीवेष घेऊन त्वरित । ठार मारावें त्या दैत्यासी ॥४०॥गणेशास मनीं स्मरून । जाई युद्ध करण्या एकनिष्ठमन । तरी तो महादैत्य विरोचन । स्वाधीन होईल त्वरित तुझ्या ॥४१॥तें ऐकून अतिहर्षित । गणनायका स्तविती देव समस्त । तदनंतर ते पाठवित । विष्णूस विरोचनाकडे ॥४२॥महाविष्णो त्या दैत्याप्रत । जाई शीघ्र आतां बळयुक्त । चराचरासी हर्षयुक्त । करी आतां जनार्दना ॥४३॥त्यांची प्रार्थना ऐकून । मनीं प्रार्थितसे तत्क्षण । गजाननाचें ध्यान करून । स्वीरूप त्यानें घेतलें ॥४४॥त्या स्त्रीरूपें तेथ गेला । जेथ दैत्याधिप होता विराजला । प्रफुल्ल वृक्षांनी बहरला । बगीचा मोहक ऐसा तेथ ॥४५॥नारायणास त्या वेषांत । दैत्य जेव्हां पाहत । तेव्हां ते मुग्ध होऊन विचारित । कोठून आलीस महाभागे ॥४६॥मोहित होऊन विनययुक्त । म्हणती कोण तूं सुंदरी वर्तत । कोणाची तूं नांव काय असत । कां आलीस सांग आम्हां ॥४७॥महाभागे आज्ञा करावी । आम्हांसी दास पदवी द्यावी । तव चरणांची सेवा सांगावी । शुचिस्मिते वामाक्षी ॥४८॥ऐसें त्यांचें ऐकून वचन । ती सुरूपा म्हणे स्मित करून । हावभाव समायुक्त प्रसन्न । मोहकारक बोल ऐसे ॥४९॥मीं स्वच्छंद विहारिणी । सर्व जगताची स्वामिनी । अद्यापि अविवाहित असोनी । निर्भय फिरतसे सर्वंत्र ॥५०॥मीं असें सर्व विख्यात । स्त्रीरत्न अवघ्या विश्वांत । जो कोणी विश्वनायक विख्यात । त्यास पति मीं वरीन ॥५१॥अन्य कोणाकडे न जाईन । दैत्यांनी हा माझा पण । तिचें तें ऐकून वचन । दैत्य दानव क्षुब्ध झालें ॥५२॥कांहीं विरोचनास भेटती । प्रणाम करून त्यास कथिती । समस्त वृत्तान्त यथामती । तोही भुलला तो ऐकून ॥५३॥महायोहयुक्त होऊन । गणेशमायेनें युक्त भ्रांतमन । त्या मोहिनीजवळी जाऊन । तिज पाहता जाहला ॥५४॥त्या महादैत्याचें आगमन । होतां विष्णू हर्षितमन । स्मरतसे चित्तीं भावयुक्त प्रसन्न । गणपतीस त्या वेळीं ॥५५॥तेव्हां गणेश साक्षत । त्या दोघांच्या ह्रदयीं प्रकटत । बुद्धिभेद त्यांचा कथित । विरोचन मोहभ्रन्त झाला ॥५६॥मोहिनीरूप विष्णूसमीप । गेला मनांत धरून पाप । विनययुत तिजला तो मद्यप । कर जोडून प्रार्थितसे ॥५७॥विरोचन म्हणे त्या नारीप्रत । ब्रह्मा विष्णु महेशादि विनीत । चराचर माझ्या अंकित । ब्रह्मांडाचा नाथ असे मीं ॥५८॥हे भामिनी परी तुज पाहून । प्रसन्न आकृष्ट होऊन । तुझ्या आज्ञेंत राहीन । सुंदरी मीं निरंतर ॥५९॥माझी पत्नी होऊन । भूषवी तूं माझें सदन । ऐसें त्याचें ऐकून वचन । तेव्हां मोहिनी त्यास म्हणे ॥६०॥अरे असुरेंद्रा मीं तुझें वचन । मानितें शिरोधार्य प्रसन्न । परी माझ्या आज्ञेंत राहून । सदैव सेवा करी माझी ॥६१॥जरी माझी आज्ञा न पाळिसी । तरी तूं माझा अपराधी होसी । त्यागीन तत्क्षणीं मीं तुजसी । विरोचनें अट मान्य केली ॥६२॥तिचें वचन मानून । स्वगृहीं गेला तिज घेऊन । तिच्या अंकित मोहून । सदैव राहूं लागला ॥६३॥नाना चातुर्यभावें मोहवित । मोहिनीरूप विष्णू अत्यंत । ती जैसें सांगत । तैसा वागे तो खलदानव ॥६४॥एकदां ती मोहिनी म्हणत । आज अभ्यंग स्नान घालीन तुम्हांप्रत । माझ्या हस्तें प्रियकरा संमत । तुजला हें आहेना ? ॥६५॥अभ्य़ंग स्नान करून । तदनंतर करी भोजन । तदनंतर स्पर्शी मज मी अधीन । सदैव तुझ्याच दैत्येंद्रा ॥६६॥आजवरी तूं संयम । पाळिलास मनोरम । आतां पुरविन तुझा काम । प्रथम अभ्यंगस्नान करी ॥६७॥गणेशमायेनें होऊन भ्रांत । तो तिचें वचन स्वीकारित । सुवासिक तेलांनीं मर्दित । विरोचनाचें अंग ती ॥६८॥डोक्यावरी तेल घालण्यास । उतरविलें तिनें त्याच्या मुकुटास । मर्दन करी मस्तकास । स्वकरांनी ती मोहिनी ॥६९॥परी तिच्या जैं करस्पर्श होत । तैं त्याचें शिर होत चूर्णित । शतधाविदीर्ण तें वर्तत । मोहिनी हर्षित जाहली ॥७०॥जय लंबोदर म्हणत । मोहिनी अंतर्धान पावत । विरोचनास पाहून मृत । दैत्य पळाले रसातळीं ॥७१॥देवर्षींसहित जात । विष्णू तेव्हां स्वलोकांत । स्वधर्मप्रवण करित । माधव तेव्हां सर्व जनांसी ॥७२॥ऐश्यापरी माघव्रत आचरित । गणेशाचें तैं होत । दैत्यवध कार्यांत यशयुक्त । विष्णू महा बळवंत ॥७३॥त्रैलोक्यविजयी विरोचन । मृत्यु पावला मोहून । ऐसें हे अद्भुत आख्यान । ऐकतां वाचतां सुखें मिळतीं ॥७४॥निरंतर ऐहिक सुखें लाभून । अंतीं गणेश सायुज्य पावन । ऐसें हें माट व्रताचें महिमान । भक्तांसी सदा कल्याण ॥७५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते माघमासमाहात्म्ये विरोचनवधो नाम पंचविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP