मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ४९ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ४९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ४९ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणे सूताप्रत । शंकर सनकादिकांचा संवाद सांप्रद सांप्रद । सर्वसिद्धिकर परम पुनीत । सांग कृपया आम्हांसी ॥१॥नाना अवतारयुक्त । धूम्रवर्णाचें असे चरित । ऐकून सनकादिक विचारित । काय प्रश्न योगसिद्धयर्थ ॥२॥सूत तेव्हां सांगत । धूम्रवर्णावताराचें चरित । राक्षसवधासहित ऐकत । विचारिती तैं द्विज ह्रष्टरोम ॥३॥सनकादिक शंकरास म्हणत । नाना अवतारसंयुक्त । ऐकून माहात्म्य उदात्त । धूम्रवर्णाचें संतुष्ट आहों ॥४॥आतां सर्वेशा योगप्राप्ति । होण्यास उपाय सुलभ रीती । सांगावा योगिनायका आम्हांप्रती । सुखकर जो शीघ्र सुगम ॥५॥श्रीशिव सनकादिकां म्हणत । गणेशह्रदय सांगेन सांप्रत । सर्वसिद्धिप्रदायक शांतिप्रद होत । साधकासी शीघ्र जें ॥६॥एकदा मी गणनाथाच्या ध्यानांत । बैसलों होतों भावयुक्त । तेथ श्रेष्ठ नदी गंगा मजप्रत । ऐसा प्रश्न करिती झाली ॥७॥शंकरा सांग मजप्रत । कोणाचें ध्यान तूम नित्य करित । तें जाणण्या मीं इच्छित । तुझ्याहून अधिक श्रेष्ठ कोण ॥८॥तेव्हां मीं तिजला म्हणत । गणेश देवदेवेश वर्तत । ब्रह्मब्रह्मेश साक्षात । त्याचें ध्यान करितों मी ॥९॥आदरें सर्व भावज्ञ पूजित । कुलदेव सनातन गणेश ज्ञात । त्याचें ह्रदय जें गुप्त । तें तुज सांगेन सर्वप्रद ॥१०॥सर्वज्ञें तें तुज कळेल । तैं तूं त्यास जाणशील । मीही अज्ञानावृत दुर्बल । तपश्चर्यामग्न होतों ॥११॥तेथ तपःप्रभावें पाहिला । ह्रदयांत गजानन देव भला । त्याच्या दर्शनमात्रें मजला । स्फूर्ति प्राप्त झाली प्रिये ॥१२॥गणेश्वरास जाणून । योगिवंद्य मी झालों पावन । तें गणेशह्रदय शोभन । सांगतों तुज ऐक आतां ॥१३॥गाणेशयोगांत निपुण । तूंही होशील महान । या गणेशह्र्दय स्तोत्रमंत्राचा पावन । शंभु ऋषि जाणावा ॥१४॥नाना छंदांत याची रचना । गणेश देवता शोभना । गंहें बीज माना । ज्ञानात्मिक शक्तिसिद्धक नाद ॥१५॥श्रीगणपति प्रीत्यर्थ करावा । अभीष्टसिद्धयर्थ जप बरवा । ऐसा याचा विनियोग व्हावा । आतां सांगतों षडंगन्यास ॥१६॥ॐ गं हया एकाक्षरें करावा । करण्यास षडंगन्यास तो ध्यावा । देव गजानन जो भवा । पार करण्या सामर्थ्य देई ॥१७॥सिंदूरासम ज्याचे तीन नयन । पृथुतर जठर रक्त वसन । पाशांकुश भग्नदंत धारण । अभयमुद्रा धारण करी ॥१८॥सिद्धिबुद्धीनेम प्रशिष्ट । ऐसा जो गजानन एकदंत । नाना भूषणें जो विलसत । निजजन सुखद गणेश ॥१९॥नाभीवरी शेष रुळत । ऐश्या त्या गणेशाचें चिंतन करित । ऐसें ध्यान करून पूजित । मानसोपचारें भक्त तैं ॥२०॥किंचित् मूलमंत्र जपून । गणेशह्रदय म्हणावें एकमन । एकवीस नांवें गणेशाचीं पावन । अर्थानुसंधानें जपावें ॥२१॥ॐ गणेश एकदंत । चिंतामणि विनायक प्रख्यात । ढुंडिराज मयूरेश लंबोदर पुनीत । गजानन हेरंब वक्रतुंड ॥२२॥ज्येष्ठराज निजस्थित । आशापूर वरद सर्वश्रुत । विकत धरणीधर ज्ञात । सिद्धिबुद्धिपति ब्रह्मणस्पति ॥२३॥ मांगल्येश सर्वपूज्य असत । विघ्नांचा नायक जो ख्यात । ऐश्या त्या देवास वंदित । हेंच ह्रदय गणेशाचें ॥२४॥गंगा त्यावर प्रार्थित । हया एकवीस नांवांचा अर्थ । सदाशिवा सांगावा मजप्रत । जेणें गणेशह्रदय कळेल ॥२५॥करूणानिधीस त्या ऐसें विनवीत । तेव्हां श्रीशिव तिज सांगत । गकाररूपें विविध चराचर वर्तत । णकारग ब्रह्म परात्पर ॥२६॥हया दोन अक्षरांत । त्या गणेशाचे गण संस्थित । त्या गणेशास मीं नमित । परमश्रेष्ठ एकदेवासी ॥२७॥मायास्वरूप सदैव वाचक । दंत मायिकरूप धारक । त्यांच्या योगें एकदंत बुद्धिस्थित । जनभक्तिलालसी नमितों ॥२८॥चित्त प्रकाशक विविधांत स्थित । लेपादि विवर्जित नमित । भोगविहीन भोगकार असत । त्या चिंतामणीस नित्य नमितों मी ॥२९॥विनायकासी नायकवर्जितासी । विशेषें ईश्वरात्म्याच्या नायकासी । प्रिये मीं त्या निरंकुशासि । सर्वदासी प्रणास करितों ॥३०॥सदात्मकासी भावयुत चित्तासी । नमितों सादर मी त्यासी । वेदपुराणें महेश्वरादिक तयासी । देव मानव शोधिती ॥३१॥नाग असुर योगेश्वर ढुंढिती । ब्रह्मगण जंतू शोधिती । म्हणोनि ढुंढी तयासी म्हणती । प्रणास माझा तयासी ॥३२॥मायार्थवाच्य मयूरभाव । नाना भ्रमार्थ करितो देव । म्हणून मयूरेश नांव । नमितों त्या मायापतीसी ॥३३॥ज्याज्या उदरांतून प्रसूत । हें विश्व तैसी ब्रह्में जठरांत । पुनरपि होती संस्थित । अनंतरूप जठर त्याचें ॥३४॥म्हणोनि लंबोदर म्हणती । तयासी माझी नित्य प्रणती । गळयाच्या खाली जगाची स्थिती । गजात्मक ब्रह्मशिर ॥३५॥त्यांच्या योगें गजानन म्हणत । तयास माझें प्रणाम सतत । दीनार्थवाच्य हे अक्षर वर्तत । जगताचें तें प्रतीक ॥३६॥रंब शब्द निगमांत । असे ब्रह्मार्थवाचक ख्यात । उभयतांचा पालक ज्ञात । तया हेरंबा नित्य प्रणाम ॥३७॥विश्वात्मक ज्याचें शरीर एक । म्हणून वक्त्र परमात्मरूपैक । तुंड तेथे विलसत । त्यांच्या योगें वक्रतुंड ॥३८॥त्या वक्रतुंडास नित्य नमन । मातापिता हा जगतांचा महान । त्याचे मातापिता कोणी नसून । श्रेष्ठ हा ज्येष्ठराज असे ॥३९॥ऐसें म्हणती शास्त्र निगम । तयासी माझा प्रणाम । नाना चतुःस्थ निजस्वरूप मनोरम । स्वानंदनाथा त्या नमितों मी ॥४०॥पूर्णाची पूर्ण समाधिरूप वर्तत । स्थिति ती स्वानंद ख्यात । मनोरथ चराचराचे पुरवित । म्हणोनि आशाप्रपूरक तो ॥४१॥तयासी माझें नित्य नमन । वरप्रभावें विश्व स्थापून । ब्रह्मविहारी हा पावन । म्हणून वरप्र्द वरद हा ॥४२॥विप्रमुख हयासी वरद म्हणती । तयासी माझी नित्य प्रणती । मायामय सर्व हें जगतीं । मिथ्यास्वरूप भ्रमदायक ॥४३॥त्याहून परतर । ब्रह्म वर्णिती । सत्य हा परेश विकट ख्याती । त्यास नमितसें मीं भावभक्ति । धरणीधर आदिभूता नमन ॥४४॥चित्ताच्या पृथ्वी नानाविध । योगिजन सांगती विशद । त्यांचा धारक एकच योगद । म्हणोनि धरणीधर नाम ॥४५॥विश्वात्मिका ब्रह्ममयी बुद्धि । विमोहप्रदा ती सिद्धि । त्यांच्या योगें खेळे योगादि । योगनाथ तो सिद्धिबुद्धि ॥४६॥तयास करितों मी नमन । असत्य सत् साम्य तुरीय वर्तन । नैज्यगनिवृत्तिरूपें रचून । खेळ करी जो स्वयं सदा ॥४७॥योगमय जो विलसत । त्यास मी सदा वंदित । ब्रह्मणस्पति नाम सार्थ । मांगल्य पतीसी माझें नमन ॥४८॥अमंगल हें विश्व असत । तें योगसंयोगयुत प्रणश्वर वर्तत । त्याहून परता मंगलरूप युक्त । म्हणोनि शांतिप्रद मांगल्यपति ॥४९॥सर्वत्र मान्य जो असत । आदिपूज्य शुभाशुभ कार्यांत । सकलांचा प्रकाशक श्रेष्ठ । त्याहून पूजनीय अन्य नसे ॥५०॥आदिसंमत तो सर्वपूज्य ख्यात । तयासी मीं नित्य वंदित । भुक्ति मुक्ति जो देत । तुष्ट होतां भक्तिप्रिय ॥५१॥जो निज विघ्नहर्ता । भक्ति हीनासी । विघ्नकर्ता । म्हणोनि विघ्नराज जगता । प्रणाम माझा नित्य त्याला ॥५२॥नांवांच आर्थ तुजप्रत । प्रिये गंगे सांगितला समस्त । विघ्नेश्वराचें परम रहस्य वर्तत । एकवीस नामें गणेशह्रदयांत ॥५३॥हीं एकवीस जो जाणून जपत । तो ब्रह्ममय इहलोकांत । गंगा त्यावरी प्रार्थित । गणेशनामांचें ह्रदय कथिलें ॥५४॥तें ब्रह्मप्रद असत । परी मज त्याचा अनुभद नसत । म्हणोनि शंकरा सांग समस्त । तंत्र ह्या गणेशह्रदयाचें ॥५५॥शंकर गंगेसी सांगत । मंत्र घेऊन विधियुक्त । पुरश्चरणमार्गें भज तैं उचित । ज्ञान तुजला होईल ॥५६॥मंत्रराजाचें ह्रदय सांगतो । संक्षेपें तुज विशद करितों । मंत्र हाच गणेश असतो । ते उभभिन्न नसती ॥५७॥गकार ब्रह्मदेव । अकार तो विष्णुदेव । बिंदु जाणावा शिव । सूर्व अनुनासिक संज्ञेंत ॥५८॥त्यांचा संधि ती महाशक्ति । हाच मंत्र योगी म्हणती । देवता गणनाथ जगतीं । संयोग करी तयांचा ॥५९॥त्यांपासून ॐ कारमय उत्पन्न । विश्वप्रिये पूर्वी हा महान । म्हणून ओंकारयुक्त प्रसन्न । गणेश एकाक्षर मंत्र ॥६०॥तार म्हणजे ओंकार । षड्विध तो ख्यात थोर । अकार उकार मकार । नाद बिंदू उभयही ॥६१॥शून्याते जाण महामायिक । त्यांतील भेद ऐक । शून्य देहिस्वरूप साशंक । बिंदु देह ऐसा ख्यात ॥६२॥त्या उभययोगें चतुर्विध विश्व । स्थूलादि भेदकर भव । ऐसा मंत्रराज सर्वभव । गजाननाचा तूं जाणत ॥६३॥शास्त्रोक्त विधानें न्यासादि करून । तदनंतर गणेशपूजन । पूजनानंतर जप विचक्षण । भक्तानें हा करावा ॥६४॥जपाचा दशांश होम करावा । आगमविधि अनुसरावा । त्याच्या दशांश तर्पण देवा । गणपासी करावा ॥६५॥त्याच्या दशांश मार्जन । त्याच्या दशांश विप्रभोजन । ऐसें हें पंचांग पावन । यथाविधि त्वरित करितां फलद ॥६६॥म्हणोनि तूं मंत्रराजाचें पंचक । आचरण करी निःशक । ऐसें बोलून मंत्र पावक । विधिपूर्वंक देत तयासी ॥६७॥मजला प्रणाम करून । गंगा गेली निघून । करण्या तपश्चर्या महान । विधिपूर्वक तदनंतर ॥६८॥मयूरेशा समीप जात । गंगा उत्तम तप आचरित । मंत्रध्यानपरायण करित । पुरश्चरण एक सरित्श्रेष्ठा ॥६९॥ तेव्हां गणेश प्रसन्न । प्रकटला वर देण्या उत्सुकमन । भक्तवत्सलाच्या कृपें करून । तिच्या ह्रदयांत ध्यान स्फुरलें ॥७०॥त्या एकवीस नामांचा जप करित । त्यायोगे अर्थज्ञा ती होत । हर्षयुक्त होऊन वास करित । तेथेंचि ती गंगादेवी ॥७१॥नित्य भक्तिसमायुक्त । गणनायकासी ती भजत । हें वृत्त ऐकून विचारित । सनकादिक शिवासी ॥७२॥ब्रह्मभूता नदीश्रेष्ठ भजत । मयूरेशा कैसी तें न समजत । त्याचें कारण आम्हांप्रत । सांग नाथा नमन तुला ॥७३॥शिव म्हणती ब्रह्मभूत जन । भजतसे सदा प्रसन्न । नवधा भक्तिभावें गजानन । तत्पर होऊन महर्षींनो ॥७४॥पुत्रकलत्र जननी जनक । मित्र गण द्रव्य सखा एक । वृत्तिज विद्यायुक्त स्वर्ग परैक । मोक्ष तूंच गुरो मजला ॥७५॥विघ्नपती हाच सर्व असत । परात्पर गुरू सर्वांप्रत । सांसर्गिक मायिक वाचिक आचरत । मानसज कर्म त्याच्यासाठीं ॥७६॥ज्ञान ह्रदयस्थ जें असत । तेंही विघ्नेश्वरास समर्पित । योगाकारें विघ्नेश होत । एक असून अनेकाश्रित ॥७७॥तो विविध भोग भोग्त । शुभअशुभ समाश्रित । मी नर नसून साक्षात । गणनायक खेळतों ॥७८॥स्वामिसेवक भावानें तर । ब्रह्मांत हा ब्रह्म श्रेष्ठ । ऐशा विधीनें विप्र भजत । गणनायका योगबळें ॥७९॥योगी शुक मुख्यादि सतत । मुद्गलादि महर्षि सेवित । हें सर्व कथिलें गुप्त । गणपतीचें ह्रदय येथें ॥८०॥ह्या ह्रदयाच्या साहाय्यें तोषवावा । विघ्नेश महर्षींनो ध्यावा । जैसें देहेंद्रियांत ह्रदय ठेवा । मुख्य असे सर्वांसी ॥८१॥त्या ह्रदयांत गणनायक राहत । जीवस्वरूपें विलसत । तैसें हें गणेशह्रदय ज्ञात । त्यांत राहतो योगपती ॥८२॥तो ब्रह्मनायक साक्षात । हया गणेशह्रदयस्तोत्रें तोषवित । जो नरोत्तम गजाननास विनत । तो भोगितो सकल भोग ॥८३॥नंतर योगमय होत । ऐसें माझें वचन ऐकती ब्रह्मयुत । तदनंतर मज नमून जात । सर्वही सनकादि तपोवनांत ॥८४॥एकाक्षर मंत्राचें पंचक सेवून । गणेशह्रदय जाणून । ते सारे गाणपत्य महान । जाहले नंतर सर्वदा ॥८५॥नित्य गणेशह्रदय जपती । भक्तियुक्त ते हिंडती । स्वेच्छेनें करती भ्रमंती । म्हणोनि तू सेवी गणेशह्रदय ॥८६॥ऐसें करिता सेवन । गाणपत्य मुख्य होशील सुजाण । मुद्गल म्हणती ऐसें वचन । बोलून महानाग शेषा मंत्र देती ॥८७॥यथासांग मंत्र एकाक्षर । शेष करी त्याचा स्वीकार । शंकरास प्रणाम करून सत्वर । साधिता झाला हा मंत्र ॥८८॥तो यथान्याय साधून । जाहला तो ह्रदयज्ञ । नित्य ह्र्दयें करी स्तवन । त्या द्विरदानन देवाचें ॥८९॥गणेशह्रदय पुण्यकारक । जो नर ऐकेल वा वाचील हें पावक । त्यास इच्छित सारें सुखदायक । मिळून अंतीं ब्रह्मभूतत्व ॥९०॥जो नर हें नित्य वाचित । गणेशाचें ह्रदय पुनीत । तो गणेशचि स्वयं होत । त्याच्या दर्शनें सिद्धि लाभे ॥९१॥पुत्रपौत्र कलत्रादि लाभत । जो हें श्रद्धेनें वाचील त्याप्रत । धनधान्य सुविपुल प्राप्त । आरोग्य अचल श्रीसंपत्ति ॥९२॥एकवीस दिवस एकवीस वेळ वाचित । गणपतीचें चिंतन करित । त्यास ईप्सित सर्व लाभत । असाध्यही साध्य होय ॥९३॥राजबंधनांतून होत मुक्त । त्रिकाळ पाठ करिता भक्तियुक्त । मारण उच्चारणादि विधि नष्ट । वश्य मोहादि शत्रूंचे ॥९४॥परकृत्याचा प्रणाश होत । संग्रामांत जय लाभत । वीरश्री संयुक्त होत । याचे पाठें न दुर्लभ कांहीं ॥९५॥विद्या आयुष्य यश प्रज्ञा लाभत । अंगहीनास अंग प्राप्त । जें जें चिंती तें तें प्राप्त । होतसे निश्चित मर्त्यासी ॥९६॥यासदृश अन्य कांहीं नसत । शीघ्र सिद्धिकर जगांत । क्षाक्षात गणपतीनें सांगितलें असत । तें तुज निवेदिलें ब्रह्मदेवा ॥९७॥गणेशभक्तिहीनासी । दुर्विनीतासी विद्वेषकासी हें गणराजह्र्दय देऊ नये भलत्यासी । युक्त जो त्यासीच द्यावें ॥९८॥गणेशभक्तियुक्तास । साधूस प्रयन्त करणारास । द्यावें तेणें विघ्नेशास । प्रेम वाटून प्रसन्न तो ॥९९॥महासिद्धिप्रद हें ह्रदय तुजप्रत । सांगितलें दक्षा अदभुत । आतां काय ऐकण्या चित्तांत । इच्छा तुझ्या सांग असे ॥१००॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनपिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते गणेशह्रदयकथनं नामैकोनपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP