मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय १९ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय १९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय १९ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक प्रार्थिती सूतास । महिन्यांचें चरित आम्हांस । सर्वार्थकोविदा अतिसुरस । मलमासाचेंही वर्णन करावे ॥१॥सूत सांगे ब्रह्मांगातून । संवत्सर प्रतापवान । बारा महिन्यांचें समुत्पन्न । जाहलें पूर्वीं मुनींनो ॥२॥छायेपासून मलमास । उत्पन्न झाला हा विश्वास । शुभप्रद ऐसें सर्वं मास । गणपाचें ध्यान करिती ॥३॥संवत्सर सर्व महिन्यांसहित । तपश्चर्या आचरित । तेव्हां गणाधीश प्रकटत । भक्तजनप्रिय त्यांसमोर ॥४॥त्या संवत्सरास समाधिमग्नास । गजानन बोले वचनास । माग संवत्सरा वरास । मासांसहित ह्रदयेप्सित ॥५॥गणेशवचनास ऐकून । संवत्सर जागृत होऊन । उठून करी वंदन । भक्तिभावें गणेशासी ॥६॥महिन्यांसह पूजित । यथाविधि उपचारें विनीतचित्त । पुनरपि प्रणाम करित । विघ्नेशास स्तवी कर जोडोनी ॥७॥धूम्रवर्णासी वक्रतुंडासी । हेरंबासी परेशासी । विघ्नेशासी शूर्पकर्णासी । सर्वपूज्या तुज नमन असो ॥८॥परमात्म्यासी लंबोदरासी । सर्वादिकपूज्यासी सुपात्रासी । अनाथांच्या नाथासी । त्रिगुणरूपा तुज नमन असो ॥९॥गुणहीनासी गणेशासी । आदिमध्यांतसंस्थासी । आदिमध्यांतविवर्जितासी । गणचालका नमन तुला ॥१०॥ब्रह्मपतीसी ब्रह्मिष्ठासी । ब्रह्मासी ब्रह्मभूतासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । सिद्धिबुद्धिमया तुज नमन ॥११॥सिद्धिबुद्धिपतीसी । सर्वेशासी अनंतविभवासी । अनंतमायाप्रचारकासी । मायिका मोहदात्या नमन तुला ॥१२॥शांतियोगमयासी । शांतियोगाधारकासी । शांतियोगप्रदात्यासी । योगेशा तुज नमन असो ॥१३॥गणाधीशा चिंतामणिस्वरूपा स्तवन । किती स्तुती करावी विनम्रमन । वेद योगी आदि मौन । तुझ्या स्तवनीं धरितात ॥१४॥तयांसीही जें न जमलें । तें मज पामरा अशक्य झालें । परी अंतीं तुज नमिलें । आतां तुष्ट हो गणनाथा ॥१५॥स्वकार्यांचा वर देऊन । सिद्धिद सुखद तीं करून । भक्ति दृढ दे आम्हां लागून । तुझ्या चरणीं गजानना ॥१६॥सर्व भयावें दूर करी । स्वभावज वीर्य करवी विघ्नारी । मासादिकांत जें उद्धरी । साधुचरनादींचें पूजन ॥१७॥ऐसें बोलून वंदन । महिन्यांसहित करून । संवत्सर मूक होता वचन । गणाधीश म्हणे तयासी ॥१८॥त्या स्तोत्रानें संतोषित । म्हणे जें जें तुमचें वांछित । मासांतर संवत्सरा तें फलयुक्त । होईल जाणा निःसंशय ॥१९॥सूर्याच्या संयुक्त रहाल । बारा देहधर व्हाल । कर्मांचें फलदाते विमल । विशेषें तुम्हीं व्हाल सगळे ॥२०॥ब्रह्मार्पण जें कर्मं करिती । नर जें मासांनो जगतीं । सलोकता तयांप्रती । अंतीं मिळेल ऐसें जाणा ॥२१॥यथायोग्य विभागें जगांत । व्हाल तुम्हीं साक्षी मोहवर्जित । आदित्य ज्यास त्यागित । तो अधिक मास होईल ॥२२॥अधिक मासा तूं ख्यात । होशील मल नामें पुण्यवंत । तुझ्या कालावधींत करित । कर्में ती सारी सफल होतीं ॥२३॥त्यांसी नाना भावांचें फल देईन । तुमचें स्तोत्र हें पावन । पाठकां वाचकां सिद्धिसंपन्न । करील हें स्तोत्र भावपर ॥२४॥कालिदोषभव पाप होत । काल उल्लंघनादिक नष्ट क्षणांत । भुक्तिमुक्ति अंतीं लाभत । स्तोत्राच्या या प्रभावें ॥२५॥ऐसें बोलून अंतर्धान । पावले गजनल्लभ गजानन । संवत्सर प्रसन्न होऊन । स्वकार्यमग्न जाहला ॥२६॥महिनेही स्वकार्ययुक्त । जाहले ह्रदष्ट अत्यंत । कालभावधर समस्त । कर्म साक्षी नरांचें ॥२७॥ऐसें हें महिन्यांसहित । संवत्सराचें चरित । वाचील वा ऐकेल जो जगांत । तयास सुख लाभेल ॥२८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धुम्रवर्णचरिते समासवत्सरचरितं नामैकौनविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP