मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय २२ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय २२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २२ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगे शौनकादिकांप्रत । ब्राह्मण कोणी कर्णाट देशांत । अत्रि गोत्रज राहत । सर्वप्रिय नांव त्याचें ॥१॥तो कार्तिक व्रत आचरित । प्रातःस्नान सदा करित । तदनंतर गणेशपूजनरत । नियमानें तो सर्वकाळ ॥२॥गाणपत्यप्रिय असत । सदा गणेशभक्तींत आसक्त । तैसाच क्षत्रिय एक पुनीत । भीम नामा कुणी होता ॥३॥तो नित्य स्नान करून । शमीस करी जलसिंचन । प्रदक्षिणा घाली भक्तियुक्त मन । दुसरा एक कैवर्तक होता ॥४॥तो पूजितसे मंदारकासी । तैसा मेघप्रिय करी प्रदक्षिणेसी । पुष्पवाह वैश्य गोसेवेसी । करी गणपतीस ध्याऊन ॥५॥शूद्र श्यामल नाम असत । ती दीपदान करी कार्तिक व्रतांत । गणेशप्रीतिस्तव करित । नित्य स्नानव्रत कार्तिक मासीं ॥६॥महाबाहुनामक अन्य वैश्य आचरित । ब्रह्मणभोजनाचें व्रत । पद्मनामा कारुक नमित । स्नान करून नित्य नेमें ॥७॥महीपाल नामें शूद्र घेत । नित्यनेमें गणेशतीर्थ कार्तिकांत । भक्तिभावें तो भजत । गणनायकास कार्तिक मासीं ॥८॥ऐसे नाना जन करून स्नान । गणेश प्रीतिस्तव व्रत महान । कार्तिक व्रत आचरून । गणेशासी पूजिती ॥९॥रोगापासून ते मुक्त । वंध्यत्वादि दोष त्यांचे जात । कार्तिकमासव्रत पूर्ण होता लाभत । धनधान्य ते सारें ॥१०॥अंतीं स्वानंदलोक प्राप्ति । गणेशासी ते नमिती । ब्रह्मभूत ते होती । कार्तिकव्रताच्या पुण्यानें ॥११॥म्हणून कार्तिक व्रत । आचरावें भक्तियुक्त । गणेशप्रीति तेणें लाभत । सर्वंसिद्धि गणेशभक्त ॥१२॥नियमें करितां भक्ति । त्यासम अन्य नसे रीती । कांहीं नियम आचरितां जगतीं । गणेश वश होतसे ॥१३॥नियमानें अल्प जें करिती । कोटि गुण त्याची महती । कार्तिक महिन्यांत स्नानाची ख्याति । विघ्नेशसेवेंत जाणावी ॥१४॥गणपप्रिय पंचक करित । कार्तिकांत तो गणेशप्रिय होत । यांत संशय कांहीं नसत । दान होमादिक कार्यें करावीं ॥१५॥तीं सारीं कार्तिक मासांत । अनंत पुण्यप्रद होतात । गणनाथास जीं अर्पित कर्मज फलें तीं यशदायी ॥१६॥बहुत काय सांगावें । कार्तिकी स्नान व्रत नियमें करावें । एकदा जरी भक्तिभावें । अक्षय फलप्रद तें होई ॥१७॥ऐसें हें कार्तिक मास चरित । कथिलें तुज परम पुनीत । गणेशलोकप्रद सुखद जगांत । इह परलोकीं हितावह ॥१८॥जो नर भक्तीनें वाचित । अथवा जो भक्तीनें ऐकत । त्याच्या वासना पूर्ण होत । अंतीं गणपतिप्रिय होई ॥१९॥अन्य देवनिष्ठ जे भक्त । ते जरी कार्तिकव्रत आचरित । तरी तेही इह्लोकसुख भोगित । अंतीं होय मुक्तिलाभ ॥२०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते कार्तिकमासमाहात्म्ये नानानियमनिरूपणं नामं द्वाविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP