खंड ८ - अध्याय ५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीशिव म्हणती देवसत्तस । गणेशाचें ऐकून अभिवचन मनोरम । मुनींसहित हर्षोत्फुल्ल होऊन । मानिती असुरनाश जवळ असे ॥१॥
योग्य काळाची वाट पाहत । विघ्नपासी ते भजत । गाणापत्याप्रिय ते जगांत । मोदयुक्त भक्तितूर्ण ॥२॥
धूम्रवर्ण त्यानंतर साक्षात । एके दिनीं दैंत्यनाथाच्या स्वप्नांत । सर्वभावें रूप दावित । दैत्यनाथ तैम घाबरला ॥३॥
तो शोकमग्न प्रभातीं उठ्त । महा असुरांसी बोलावित । आपुलें स्वप्न त्यांसी सांगत । मनीं व्यग्र होऊनियां ॥४॥
शंखमुख्यांनो ऐका सांप्रत । स्वप्न पाहिलें मी भयंकर अत्यंत । धूम्रवर्ण गणेश क्रोधयुक्त । प्रकटला माझ्या पुढयांत ॥५॥
त्याच्या क्रोधांतून उत्पन्न । जाहला भीषण अग्नि पावन । त्यानें केलें सर्व नगर दहन । शस्त्रास्त्रें आपलीं कुंठित झालीं ॥६॥
मज पराक्रमविहीन । केलें त्यानें तत्क्षण । देवांसी त्यांची स्थानें देऊन । मुनिगणांसी अभय दिलें ॥७॥
या स्वप्नाचा परिणाम त्वरित । आपुलें अशुभ वर्तवित । म्हणोनि सर्वही यत्नयुक्त । दैत्यनायकहो सज्ज व्हावें ॥८॥
त्याचें तें खेडयुक्त वचन । ऐकून दैत्यनायक करिती सांत्वन । हितकारक भाव प्रसन्न । प्रकटवून म्हणती त्यासी ॥९॥
दैत्येंद्र म्हणती राजेंद्रा भय नसावें । अशुभ तुम्हांसी कैसें व्हावें । गणेशाच्या वरदानप्रभावें । निर्भय आपण असुरेश्वरा ॥१०॥
ऐसी स्वप्नें जनांसी पडती । यांत संशय नसे निश्चितीं । परी जागेपणीं ती ठरतीं । निष्फळ हें सर्वश्रुत ॥११॥
त्या स्वप्नांचें असत्यत्व ज्ञात । असे सर्वांसी सतत । तरी ह्या स्वप्नाचें भय चित्तांत । आपण कां धरिलें असे ? ॥१२॥
स्वप्नांत धनादिक लाभत । अथवा कोणाचा मृत्यु होत । तरी जागेपणीं तें सारें होत । सत्य कधीं कां सांगावें ॥१३॥
ऐशापरी समाश्वासिती । असुरेश्वरासी उत्साह देती । वार्तालाप हसून करिती । स्वप्नभीती दूर कराया ॥१४॥
तदनंतर विपेंद्रांनो ऐकावें । विघ्नपाचें चरित्र बरवें । असुर जाती खिन्नभावें । आपापल्या सदनासी ॥१५॥
त्या गणेश्वरातें पाहून । देवासी करी नारद वंदन । स्तुतिगान । हर्षभरें गाऊन । हर्षगद्‍गल जाहला ॥१७॥
आनंदाश्रू त्याच्या लोचानांतून । ओघळले ते पाहून । गणाधीश म्हणे तयास वचन । दैत्यसंदिरीं तूं जाई ॥१८॥
माझ्या आज्ञेवरून । त्या अहं असुरा सांग जाऊन । सामयुक्त कांहीं वचन । म्हणावें सुबुद्धीचा मार्ग धरी ॥१९॥
देव राहतील स्वर्गांत । मानव पृथ्वीतळावरी सुखांत । नागादींचें असुरांचें राज्य अव्याहत । राहे सदा पाताळीं ॥२०॥
आपल्या असुर नगरांत । महादैत्यांच्या समवेत । राज्य करि तूं आनंदांत । अन्यथा युद्धार्थ सज्ज व्हावें ॥२१॥
नारद त्याचें वचन मानित । अहंकारासुराजवळी जात । त्यास संदेश कथन करित । ऐकून कोपला असुरेश ॥२२॥
तो मदोन्मत्त प्रत्युत्तर । सांगे नारदा जाऊन सत्वर । विघ्नेश्वरास त्या माझें उग्र । देवांसह ठार करीन तुला ॥२३॥
तुझ्या आज्ञावश जगांत । कधींही मी न होणार निश्चित । नारद गणनाथास जाऊन सांगत । असुरेशाचें तें वचन ॥२४॥
नारदाचें वचन ऐकून । क्रोधयुक्त जाहला गजानन । अहं असुरा मारण्या तत्क्षण । शस्त्र धरी स्वकरांतत ओ ॥२५॥
तदनंतर नारद हर्षभरित । प्रणाम करून त्यास जात । तो देवांस सांगे वृत्तान्त । धूम्रवर्णाकडे ते जाती ॥२६॥
मुनींसहित ते शस्त्रयुक्त । स्तवन करून बोलत । आज्ञा करी आम्हांप्रत । धूम्रवर्णा महाभागा ॥२७॥
त्यांचें वचन ॥ ऐकून । धूम्रवर्ण बोले प्रतापवान । स्वभक्तांना त्या प्रेमेंकरून । देव देवेशहो आतां पहाव ॥२८॥
आश्चर्यंकारक माझें कार्य सांप्रत । त्या महादैत्या मारीन त्वरित । शासनाचें उल्लंघन करित । असा कोण जगीं वाचेल ॥२९॥
तुम्हीं कांहीं करूं नका । केवळ आश्चर्यवार्ता आतां ऐका । ऐसें बोलून देवादिकां । भयंकर पाश सोडिला त्यानें ॥३०॥
तें गणेशाचें शस्त्र महान । अनंतरूप घेई क्रोधून । जेथ तेथ असुरांस पकडून । कंठ त्यांचा पकडिला ॥३१॥
त्या पाशाने गळा आवळला । दैत्यगण पंचत्व पावला । हाहाकार सर्वंत्र माजला । नग रांत तेव्हां भयंकर ॥३२॥
कांहीं दैत्य त्या महादैत्यास । जाऊन सांगती वृत्तान्त खास । महाराजा येथ काय बैसलास । रणीं दैत्य बहुत मेले ॥३३॥
धूम्रवर्णाच्या पाशांनीं । त्यांचा गळा पकडूनी । त्यांनी धाडिलें यमसदनीं । दुःखयुक्त हा वृत्तान्त ॥३४॥
तेव्हां अहं असुर भयग्रस्त । म्हेण सचिवांसी पीडित । काळमुखीं पडले दैत्य बहुत । स्वप्न सत्य झालें तें ॥३५॥
दैत्येशांनो विपरीत । काळ पातला वाटे सांप्रत । तें खिन्न वचन ऐकून म्हणत । गर्व श्रेष्ठ सुत त्याचे ॥३६॥
ताता महाभागा शोकमग्न । की झालांत आपण । मायायुक्त धूम्रवर्ण । काय करील अप्रिय तुमचें ? ॥३७॥
देहधारी तो देवपक्षपाती । त्याची काय धरता भीती । त्यासी मारूं आम्हीं निश्चिती । पहा पौरुष आमुचें ॥३८॥
ऐसें बोलून ते दोघे असुर सुत । गर्व आणि श्रेष्ठ जात । युद्ध करण्यास त्वरित । प्रधानांदिकां समवेत ॥३९॥
ते शस्त्रवृष्टि घोर करिती । पाशतेजें परी जळून जाती । तेव्हां प्रधानादी भयभीत अती । पळून गेले दशदिशांत ॥४०॥
पाश तेजानें दग्ध होऊन । प्रधान जातां पळून । असुरपुत्र ते दोघे जण । पाश तोडण्या सरसावले ॥४१॥
खड्‍गधारी पुढें जात । जरी पाशतेजें दग्ध होत । पाश हातांत पकडित । महावीर्यवन्त दोघे ॥४२॥
त्या पाशानें आवळिले । त्यांचे श्वास रुद्ध झाले । घुसमटून संग्रामीं पडले । महर्षीनो त्या वेळीं ॥४३॥
तदनंतर हाहारव माजून । दैत्य सारे भयग्रस्तमन । दशदिशांत गेले पळून । कांहीं परतले राज्यसदनीं ॥४४॥
अहंकारास ते सांगती । रणांगणीं मिळाली वीरगती । पुत्रांस तुमच्या सांप्रती । दुःखपूर्ण वृत्तान्त हा ॥४५॥
त्यांचें वचन ऐकून । महा असुर पडला मूर्च्छा येऊन । सर्वांनी केला सावधान । शोक करी भयग्रस्त तैं ॥४६॥
परी धैर्य धरून जात । युद्ध करण्या रणांत । अस्त्रे विविध तो सोडित । सहा उज्वला पाश तोडण्या ॥४७॥
परी पाशाच्या तेजानें दग्ध । झालीं शस्त्रें विशद । तेव्हां भयभीत होऊन विद्ध । अहं विचार करी स्वमानसीं ॥४८॥
माझें हें अमोध अस्त्र झालें । निष्फळ पाशतेजें आगळे । आश्चर्य हें काय घडलें । विपरीत आज नकळे मज ॥४९॥
म्हणोनि माघार घेत । शेष दैत्यांसवें परत जात । स्वगृहीं जाऊन स्वगुरूस आणवित । त्याचा सल्ला विचारिल ॥५०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते अहंकारपराजयो नाम पंचमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP