मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ९ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ९ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सनकादि श्रीशिवास म्हणती । कुरूक्षेत्राची ऐकिली ख्याती । महादेवा धूम्रवर्णाचें जगतीं । प्रमुख क्षेत्र तें सर्ववरद ॥१॥त्याचें माहात्म्या आम्हांसी । सांगावें संतोषप्रद जें जगासी । शिव सांगती तेव्हां त्यासी । अवर्णनीय त्याचा महिमा ॥२॥हिमाचल प्रांतीं ऐशान्य दिशेंत । धूम्रवर्णाचें हें क्षेत्र ख्यात । त्याचें माहात्म्य संक्षेपें सांप्रत । सांगतों ऐका एकचित्तें ॥३॥देवर्षी केला स्थापन । धूम्रवर्ण शुंडादंडमुख श्रीमान । चतुर्बांहुधारक त्रिनेत्र महान । एकदंत परशुधारी ॥४॥तेथ अहंकार असुर भजत । गणेशासी भक्तियुक्त । त्या गणेशाच्या वामांगीं विलसत । सिद्धि सर्वपियंकरी ॥५॥दक्षिणांगीं बुद्धि असत । मूषक शोभत त्याच्या पुढयांत । त्या क्षेत्राचा विस्तार ज्ञात । दशयोजनें चतुरस्त्र ॥६॥धूम्रवर्णाच्या पुढयांत । मुद्गल मुख्य भक्त वर्तत । शुकादी भजती स्तुति गात । पाठीं पार्षद प्रमोदमोदकादी ॥७॥त्यांच्या हातांत शस्त्रें असतीं । ते धूम्रवर्णास सेविती । प्रयागादी तीर्थें वामांगीं वर्ततीं । काशी मुख्य क्षेत्रें त्यास भजती ॥८॥दक्षिणांगी अमरवर । शंभु विष्णु मख्यादि सुरवर । शस्त्रांसहित सपरिवार । गणनायका नित्य भजती ॥९॥शेषादी नागराज पर्वत । हेममुख्य तेथ पूजित । गंधर्व चारणसिद्ध आराधित । वसु तैसे मनू तेथें ॥१०॥आदित्य रूद्र विद्याधर । अप्सरादी तेथ वसती थोर । द्विरदाननासी भक्तिपर । भजती या क्षेत्रांत सारे ॥११॥जें जें श्रेष्ठतम त्रिलोकांत । तें तें येथ असे स्थित । धूम्रवर्णाच्या सेवेंत रत । भक्तिभावें समन्वित सदा ॥१२॥त्याचीं स्थानें असंख्य़ असती । त्यांची अशक्य असे गणती । परी संक्षेपें मीं तुम्हांप्रती । कथिलीं कांहीं महर्षींनो ॥१३॥येथ जे महासिद्धिप्रद । क्षेत्र असे पुनीत विशद । त्यांत स्नान । त्यास विघ्नप सुखद । महत्त्वपूर्ण स्थान हें ॥१४॥येथ करितां स्नान । वांछित लाभून सर्व जन । अंतीं मोक्षपदाचा सन्मान । त्यास लाभे निःसंदेह ॥१५॥विष्णुमुख्य देवगण । कश्यपादी महर्षी प्रसन्न । तेथ प्रहृष्ट होऊन । स्नान करिती नित्य नेमें ॥१६॥अन्य क्षेत्रस्थ नागादी येत । या क्षेत्रांत स्नान करित । अनेक जन निवास करित । येथ स्नानाथं आनंदें ॥१७॥शिव विष्णु मुख्यांची असती । तीर्थें तेथ पवित्र अती । त्यांत स्नान करतां प्राप्ती । होते त्या त्या पदांची ॥१८॥तेथ धूम्रवर्णाचें घेतां दर्शन । ईप्सित लाभें धन्य जन । यात्रा करिती भक्त जन । लाभती धर्मार्थकाममोक्ष ॥१९॥भाद्रपद शुक्त चतुर्थी दिनीं । धूम्रवर्ण मूर्ति देवऋषीनीं । पूर्वीं स्थापिली मध्याह्रीं । म्हणोनि तिथि ही परम पावन ॥२०॥या तिथीस वार्षिक उत्सव । यात्रापर करिती सदैव । परस्परांस बोधभाव । सांगती ते गजाननाचा ॥२१॥शंकर महर्षी आदियुक्त । रोमांचांनी तेव्हां होत । गाणेश जे तेथ जात । तेही हर्षभरित होती ॥२२॥यात्रापूर्ण करून जाती । ते सारे स्वस्थानाप्रती । धूम्रवर्णास मनीं स्मरती । भक्तिभावें सर्वदा ॥२३॥अंतीं स्वानंदलोकांत । ते सर्वही जाती निश्चित । शैव वैष्णवादी क्रममार्गें जात । स्वानंदलोकीं शेवटीं ॥२४॥जे या क्षेत्रांत पावती निधन । ते स्वानंद लोकीं जाऊन । ब्रह्म रूपक गाणप होऊन । सदैव सुखी निवसतात ॥२५॥धूम्रवर्णक्षेत्राचें महिमान । विस्तारें सांगण्या अशक्य म्हणून । कथिलें यथामति अल्प प्रमाण । मुनिसत्तमहो ऐकावें ॥२६॥जेवढीं गणेशक्षेत्रें ब्रह्माडांत । ब्रह्मभूतमय असत । तीं तीं सारीं चतुःपदमय वर्तत । धर्मंअर्थंकाममोक्षपर ॥२७॥पाचवें जें ब्रह्माकार । क्षेत्र तें गणपतीचें थोर । ऐसें हें क्षेत्र उदार । माहात्म्ययुक्त धूम्रवर्णाचें ॥२८॥हें माहात्म्य जो ऐकत । अथवा स्वयं वाचीत । अन्यांस वाचून दाखवित । त्यास सर्वार्थ लाभेल ॥२९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते धूम्रमहिमावर्णंनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP