मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय २४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगत । भारद्वाज कुळीचा द्विज वसत । साधु नामें तो ख्यांत तो ख्यात । गणेशभजनीं निरत सदा ॥१॥
तो एकदा भक्तियुक्त । भरद्वाज मुनिमुख्यास भेटत । प्रणाम करून त्यास विचारित । विनयपूर्वक त्या वेळीं ॥२॥
गणेशप्राप्तीस्तव सांगावा । स्वामी मजला उपाय बरवा । जेणें मजला व्हावा । प्रत्यक्ष दृष्टान्त गणाधीशाचा ॥३॥
भरद्वाज त्याला सांगत । मार्गशीर्ष व्रत करितां अद्‍भुत । होशील गणनाथाचा प्रिय अत्यंत । विधियुक्त तें तुज सांगतो ॥४॥
गणेशपंचकयुत । तें व्रत साधूस सांगत । तोही त्यास विनयें नमित । उत्तम व्रत स्वीकारी तें ॥५॥
उपोषणपर राहून । तोषविला त्यानें गजानन । समाप्ति दिवशीं स्वयं विघ्नप तोषून । द्विजरूपें प्रकटला ॥६॥
त्याच्या आश्रमांत जाऊन । महाभागास त्या म्हणे वचन । पूजा संपतां प्रसन्न मन । म्हणे मज भोजन दे तृप्तिकर ॥७॥
त्याचें तें वचन ऐकून । प्रणाम करून करी पूजन । भोजन वाढी भक्तियुक्त मन । नानारसमय त्यासमयी ॥८॥
तें सर्व अन्न सेवून । तरीही होता क्षुधित ब्राह्मण । देई तृप्तिकर भोजन । अन्यथा विमुख जाईन मीं ॥९॥
तें ऐकून अति विस्मित । विचार करी तो साधु मनांत । शंभरास पुरेल इतुकें आत्तापर्यंत । भक्षिलें अन्न या द्विजानें ॥१०॥
तोपि हा तृप्तिहीन । काय करावे आतां प्रयत्न । माझी परीक्षा घेण्या आला गजानन । द्विजरूपें कीं कळेंना ॥११॥
पुराणांत महाविप्र सांगती । एक दूवेंनें गणेशाची तृप्ती । झाली यांत संशय चित्तीं । अल्पही तो असेना ॥१२॥
म्हणून या विप्रासी वाढीन । दूर्वासहित मी भोजन । ऐसा विचार मनीं करून । दुर्वायुक्त पायस केलें ॥१३॥
गणेशाय ह्रदयीं ध्यात । पायस घेऊनियां करांत । दूर्वायुक्त अन्न तें देत । भक्तिभावें तयासी ॥१४॥
तेव्हां तो ब्राह्मण तृप्त । होऊनिया अति हर्षित । म्हणे विप्रा तुज ज्ञात । भक्ति रहस्य गणेशाचें ॥१५॥
त्यायोगें मजला तृप्त । तूं निःसंशय केलेंस सांप्रत । वर माग महाभागा वांछित । देईन मीं तो विनयप्रसन्न ॥१६॥
तेव्हां साधू म्हणे तयाप्रत । जरी तूं वर देण्यास इच्छित । तरी मज दाखवी स्वरूप पुनीत । गणेशा तूं सत्वरी ॥१७॥
माझ्या महद्‍भाग्यें आलास । देवां तूं वर मज देण्यास । त्याचें वचन ऐकून तयास । गणपानें निजरूप दाखविलें ॥१८॥
त्यास पाहून हर्षित । साधु विप्र जाहला गुणान्वित । प्रणाम करून त्यास पूजित । हात जोडून स्तवन करी ॥१९॥
गणेशभक्तिसंयुक्त तो स्तवित । महायश साधु श्रद्धायुत । हेरंबा त्रिनेत्रदेवा नमित । परमात्म्या मी गजानना ॥२०॥
अनाकारासी साकारासी । लंबोदरासी वीरासी । शूर्पकर्णासी ढुंढीसी । परेशा गणेशा नमन तुला ॥२१॥
अनादीसी स्वानंदवासीसी । भक्तभावस्वरूपासी । भक्तेशासी सुभक्तितुष्टासी । सर्वाकारासी नमन असो ॥२२॥
सर्वदिपूज्यासी परमात्म्यासी । ब्रह्मेशासी गणपालकासी । निराकारासी सर्व पूज्यासी । परमप्रिया तुज नमन ॥२३॥
विघ्नेशासी महाविघ्नहारीसी । समस्तांच्या मातापित्यासी । तत्त्वरूपासी ब्रह्मयासी । विष्णूसी शंकरासी नमन ॥२४॥
शक्तीसी सूर्यंरूपासी । इंद्रासी वायुरूपासी । चंद्रासी वरुणासी यमासी । अग्नीसी कुबेरासी नमन ॥२५॥
नैऋतासी धराधरासी । नरासी पशुरूपासी । नागासुरासी चराचरमयासी । चराचरविवर्जिता तुज नमन ॥२६॥
समासी सहज स्वसंवेद्यासी । योगासी शांतिनाथासी । शांतिदासी गजाननासी । किती स्तुति करावी मीं ॥२७॥
योगाकार तूं गणाधीश । माझी शक्ति अल्प मीं परवश । धन्य पावुनी दर्शनास । आज तुझा अंघ्रियु गांचें ॥२८॥
वर देई गणेशा पावन । तुझी भक्ति दृढ होऊन । व्हावें भक्तियुक्त मन । ऐसें बोलून स्तुती करी ॥२९॥
साधु विप्रास त्या म्हणत । गणेशभक्तिप्रिय प्रसन्नचित्त । माझी भक्ति तुझ्या मनांत । दृढ होईल उत्कट रूपें ॥३०॥
जें जें मनीं तुझ्या इच्छित । तें तें सफळ होईल निच्छित । तूं रचिलेलें हें स्तोत्र पुनीत भक्तिवर्धक होईल ॥३१॥
महाभागा पाठकास । तैसेंचि हें स्तोत्र श्रोत्यास । सर्वसिद्धिप्रद सुरस । होईल माझ्या कृपाप्रसादें ॥३२॥
नाना कार्यें सिद्ध होऊन । अंतीं होईल स्वानंदसाधन । ऐसें बोलून अंतर्धान । पावला गणेश ब्रह्मनायक ॥३३॥
साधु ब्राह्मण त्यास ध्यात । तेथेंच राहिला आनंदरत । ऐसें नाना जन लाभत । मार्गशीर्षव्रतें सिद्धि ॥३४॥
मार्गंशीर्ष व्रत होत । श्रवणें पठणें पठणें सिद्धिप्रद जगांत । याविषयीं चरित्र अद्‍भुत । अन्यही एक सांगतो ॥३५॥
एक कैवर्तक शंबु नामें ज्ञात । तो हें मार्गशीर्ष माहात्म्य ऐकत । मार्गंशीर्ष महिना येतां करित । प्रारंभ तोही व्रताचा ॥३६॥
गणेशासी करून नमन । करी व्रताचें पालन । नित्य कुटुंबाचें पोषण । आनंदानें करीतसे ॥३७॥
पौष मासांत तो मरत । त्यास गणेशदून सत्वरीं नेत । जेव्हां स्वानंदलोकांत । तेव्हां पाही विघ्नेश्वरासी ॥३८॥
त्यास पाहुन ब्रह्मभूत । जाहला दर्शनें कृतार्थ । ऐसें हें मार्गशीर्ष व्रत । केलें त्यानें अल्पांशानें ॥३९॥
तरीही ब्रह्मभूत तो होत । ऐसे नानाजन सिद्धि लाभत । इहलोकीं अखिल भोग भोगित । अंतीं स्वानंद लोकीं जाती ॥४०॥
ऐसें हें फळ लाभत । जरी किंचित्‍ विनय पाळित । तरी जे करिती विधियुक्त । त्यास केवढें फळ लाभेल ? ॥४१॥
मार्गंशीर्ष महिन्यांत । जो नर हें नित्य वाचित । अथवा व्रतमाहात्म्य ऐक्त । सिद्धियुक्त तो निरंतर ॥४२॥
मुनिसत्तमा लेशमात्र कथिले । मार्गशीर्ष मासाचें व्रत तुज लाभलें । आणखी काय ऐकण्या झालें । आतुर तुझें मानस सांग ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीगजाननार्पंणमस्तु । महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते मार्गंशीर्षंमासमाहा त्म्यसाधुचरितवर्णंनं नाम चतुर्विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पंणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP