मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय ३३ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय ३३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३३ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढें सांगती । गणेशप्राप्तीची इच्छा चित्तीं । गालव विश्वामित्रास विनंती । तदुपायार्थ करता झाला ॥१॥तो म्हणे त्या मुनिश्रेष्ठास । इच्छितों विघ्नेशाच्या दर्शनास । उपाय सांगावा विशेष । तुमची आज्ञा पाळीन मीं ॥२॥तैसें आचरण करीन । विश्वामित्र तैं बोले वचन । श्रावणमासाचें आगमन । सांप्र्त होणार गालवा ॥३॥ह्या सौख्यप्रद महिन्यांत । अनुष्ठान करी गणेशभावयुक्त । तरी गणेशास निश्चित । सिद्धियोगें श्रावणव्रताच्या ॥४॥ऐसें बोलून त्यास देत । एकाक्षरमंत्र पुनीत । त्यासी प्रणाम करून जपत । गालव तो मंत्र श्रद्धेनें ॥५॥श्रावणांत गणेशाचें ध्यान । पुरश्चरणाची करून । जपिला मंत्रराज यथाविधान । दुग्धाहार करोनी ॥६॥गणेशासी तोषवित । सदा त्याच्या ध्यानीं रत । त्याचेंच चिंतन जो करित । गालव भक्त एकनिष्ठ ॥७॥अमावास्येच्या दिनीं प्रकटत । भक्तिभावें तेथ निमंत्रित । सिद्धिबुद्धींच्या सहित । सिंहारूढ होऊनियां ॥८॥त्याचें होतांचि दर्शन । गालव प्रेममग्न होऊन । त्वरित वरती उठून । प्रणाम करून पूजी तयासी ॥९॥पुनः प्रणाम करित । सर्वेशास विघ्ननायका त्या स्तवित । आनंदाश्रू त्याच्या नयनांत । दाटले गणाध्यक्षदर्शनानें ॥१०॥गालव सर्वसिद्धिप्रदायक स्तवित । होऊनियां मनीं मुदित । अमेयमायामयरूपा वंदित । मायाविहीना परमपरा मीं ॥११॥योगासी योगेशासी । सुयोगदात्यासी विघ्नेश्वरासी । अचिंत्यरूपधारकासी । विघ्नेशासी नमो नमः ॥१२॥सिंहगासी चतुर्भाहुधारकासी । सुरूपीसी स्वानंदपतीसी । स्वानंदनगरस्थितासी । अनंतविभवा तुज नमन ॥१३॥हेरंबासी लंबोदरासी । देवासी देवदेवेशरूपासी । असुरनिहंत्यासी असुरासी । ब्रह्मरूपा तुज नमन ॥१४॥सिद्धिबुद्धिविलासकरासी । ब्रह्माकारशरीरासी । एकदंतासी सगुणासी । निर्गुणा गुणात्म्या तुज वंदन ॥१५॥सदा शांतिप्रदात्यासी । धूम्रवर्णासी पाशांकुशधारकासी । एकदंतासी प्रभयप्रधारकासी । नाभिशेषा सर्वादिपूज्या नमन ॥१६॥स्ववूं कैसें मी तुजला । वेदसंघही मूक झाला । तुझ्या यथार्थ स्तुतीला । करूं शके ऐसा कोण ? ॥१७॥म्हणून नमनमात्रें प्रसन्न । होई विघ्नपा तूं भक्तैकमन । सूत म्हणे ऐसें स्तवून । नाचूं लागला प्रेमानें ॥१८॥म्हणे मी धन्य कृतकृत्य झालों । गणेशकृपेसी पात्र झालों । उद्धरून भवसागर गेलों । पुनः पुनः ऐसें म्हणे ॥१९॥त्यास गणाधीश बोले वचन । माग गालवा वरदान । श्रावणव्रतें तुझ्या प्रसन्न । देईन जें मागशील ॥२०॥तूं रचिलेलें हें स्तोत्र । सर्वार्थप्रद पवित्र । पाठका श्रोत्यासी सर्वत्र । माझी भक्ती वाढवील ॥२१॥धनधान्यप्रद भुक्तिमुक्तिद । आरोग्यादिकर ब्रह्मश्रद्धाप्रद । ऐसें बोलून गणेश विशद । थांबला ऐकण्या हृद्गत त्याचें ॥२२॥गालव त्यास करी वंदन । जोडोनिया दोन्ही कर प्रसन्न । म्हणे भक्ति दे तुझी पावन । गाणपत्य करी मजला ॥२३॥शांतिप्रद योग मज प्राप्त । व्हावा ऐसें मीं मागत । अन्य कांहीं नको मजप्रत । गजानना विघ्नेशा ॥२४॥तस्थाऽतु म्हणून अंतर्धान । पावला देव गजानन । गालव खेदयुक्तमन । जाहला वियोगें गणपाच्या ॥२५॥तदनंतर विश्वामित्रा समीप जात । वंदूत त्यास सांगे वृत्तान्त । तोही ऐकून हर्षभरित । म्हणे धन्य तूं गालवा ॥२६॥तूं कृतकृत्य मान्य अससी । गणेशदर्शन लाधलासी । सच्छिष्य तूं पुत्रा मजसी । तारिलें या भवार्णवीं ॥२७॥ऐसी प्रशंसा करित । विश्वामित्र गालव संमानित । पित्यास नमून जात । स्वच्छंदें तदनंतर तो गालव ॥२८॥सदा गणपतीस भजत । भक्तिभावें अनन्यचित्त । गालव योगिवंद्य प्रख्यात । परमार्थवेत्ता जाहला ॥२९॥गणेश भक्तिलालस रमत । समस्त गणेश क्षेत्रांत । अंतीं मयूरक्षेत्रांस । निवास करून तोषलासे ॥३०॥तेथेंच राहून गणनाथास भजत । भावभक्तियुक्तचित्त । क्षेत्रसंन्यासविप्र पूजित । तदा गालवा गणेशप्रियासी ॥३१॥तो त्यांसी गणेशकथा सांगत । विविध परींच्या पुनीत । ऐसें हें गालवमाहात्म्य असत । ऐकतां वाचितां सिद्धिप्रद ॥३२॥दुसरेंही एक आख्यान । ऐकतां होईल मन प्रसन्न । महाराष्ट्रांत एक अंत्यज जन । दैवयोगें मुक्त झाला ॥३३॥त्यानें श्रावण महिमा ऐकिला । द्विजमुखांतून एकदां भला । गणनाथावरी जडला । भाव त्याच्या चित्ताचा ॥३४॥श्रावण मास लागतां आचरित । श्रावणमासाचें गणेश व्रत । स्नान करून नित्य जात । देवालयाबाहेरी ॥३५॥नित्य तेथून करी नमन । भक्तिभावपूर्वमन । तदनंतर कुटुंब पोषण । करण्या व्यवसाय करी आपुला ॥३६॥विविध कामें जनांची करित । द्रव्यप्राप्तिस्तव तो सतत । श्रीवणमास होतां समाप्त । मरण पावला तो दैवयोगें ॥३७॥तेव्हां त्यास गाणप नेती । दूत ते आपुल्या लोकाप्रती । मार्गीं त्याच्या शरीरावरती । जो वारा वाहत होता ॥३८॥त्या वार्याचा स्पर्श होऊन । पाच चोरांची बुद्धि पालटून । ते पापकर्मपरायण । परस्परांशी बोलती ॥३९॥आपण नित्य पापें करितों । चोर्या बहुविधही करूनी देतों । लोकांसी दुख अपरिमित तरी तो । देव शिक्ष करील ॥४०॥आपुली काय गती होईल । पाणीजनां नरक निळेल । यमयातना दुस्सह प्रबळ । भोगाव्या लागती निःसंशये ॥४१॥तेव्हां आपणा सर्वां नरकवास । घडणार नित्य हें निश्चित कुवास । तरी यापुढें चोरीच्या व्यवसायास । सोडून देऊं आपण सारे ॥४२॥ऐसा निश्चय करून । ते वनीं चालले मार्गातून । तों तेथ अवचित ब्राह्मण । तापसी दहा त्यांना दिसले ॥४३॥त्यांस पाहून गाईंसहित । पापी ते चोर होत मुदित । खड्ग घेऊन धावत । ठार त्या द्विजां मारावया ॥४४॥ते चोर निश्चय विसरले । तैं ते ब्रह्मण विनवूं लागले । अरे चोरांनो कायकेलें । आम्ही तुमचें नुकसान ? ॥४५॥शस्त्र घेऊन करांत । तुम्ही पांच जण आलांत । गाई सहित । आम्हांस सांप्रत । सोडा विनवितों तुम्हांसी ॥४६॥आमची हत्या करूं नका । प्राज्ञहो आम्हां ब्राह्मणा छळूं नका । ब्रह्महत्येच्या सम पातका । घेऊं नका आपल्यावरी ॥४७॥ त्यांचें तें ऐकून वचन । खड्ग खालीं । पापाचें भय वाटून । आपुलें नियमन करिती तदा ॥४८॥त्या द्विजांसी विचारिती । आम्हांस सांगावें सांप्रती । ब्रह्महत्याभव पापास किती । घोर शासन देव करितो ॥४९॥त्याच्या यातना किती होती । कोणत्या उपायानें होत क्षती । आम्हीं पापें करितों जगतीं । जन्मापासून सदा सर्वदा ॥५०॥नानाविध पापें केली आजवरी । आमुचा व्यवसाय असे चोरी । तरी आतां आम्हांवरी । दया करा ब्राह्मणोत्तमांनो ॥५१॥चोरांचें हें ऐकून वचन । ब्राह्मण । विस्मित होऊन । भयभीत मनीं कथिती वचन । लोकोद्धारपरायण ते ॥५२॥पश्चात्तापानें नष्ट होतीं । चोरश्रेष्ठहो या जगतीं । यापुढें पापें या जगतीं । करूं नका निश्चयानें ॥५३॥श्रावणांत गणनाथास पुजावें । ब्रह्मनायकास त्या स्मरावें । त्याचें व्रत आचरावें । तेणें पापमुक्त व्हाल ॥५४॥तदनंतर ते महाभागा सांगती । श्रावण व्रताची महती । गोधन घेऊन जाती । आपुल्या आश्रमा परतोनी ॥५५॥पुढें श्रावण मास लागला । तैं चोरांनीं निश्चय केला । स्वगृहीं परतून गणेश व्रताला । करिती ते दृष निश्चयें ॥५६॥प्रातःकाळीं स्नान करून । नमिती भावबळें गजानन । प्रदक्षिणा प्रहर एक घालून । एकभुक्त ते राहती ॥५७॥सर्वही चोर ब्रह्मचर्य पाळिती । श्रावणमास व्रत करिती । त्यायोगें साधू होऊन जगतीं । भोगिलें त्यांनीं अनंत भोग ॥५८॥अंतीं स्वानंदलोकीं गेले । ऐसे बहुत जन या व्रतें उद्धरले । त्यांचें चरित्र पूर्णत्वें झालें । वर्णन करण्या असंभव ॥५९॥किंचित नियम जे आचरती । त्यांची जर ही गती । संपूर्ण व्रत आचरती । त्यांना केवढें सुख लाभे ॥६०॥कोणी हें व्रतमाहात्म्य वाचित । अथवा श्रद्धेनें ऐकत । त्यास ऐहिक पारलौकिक सुख लाभत । अंतीं लाभे गणेशपद ॥६१॥ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते श्रावणमासमाहात्म्यवर्णनं नाम त्रयत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP