मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ३२ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ३२ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ३२ वा Translation - भाषांतर १८८मुनि म्हणे माते, काम्यकर्मफल । कथितों सकल घेईं ध्यानीं ॥१॥चारा घालूनियां दुग्ध जैं धेनूचें । काढावें हें तैसें काम्यकर्म ॥२॥चारा दुग्ध, चारा दुग्ध, ऐसें चक्र । कामनापूर्वक कर्म तेंवी ॥३॥त्यजूनियां यज्ञ भागवतधर्म । पाळूनि, नियम करी बहु ॥४॥चंद्रलोकही त्या लाभेल त्या पुण्यें । पुण्यक्षयें येणें फिरुनि घडे ॥५॥द्रव्य देऊनियां वस्तु संपादितां । संबंध तयाचा सुटे जेंवी ॥६॥दैनंदिन होतां प्रलय जे नष्ट । ऐसे पुण्यलोक काम्यकर्मे ॥७॥वासुदेव म्हणे अनासक्त कर्म । करितां न जन्म-मरण पुन्हां ॥८॥१८७अभेद भक्ति ते मूर्तिमंत मुक्ति । अनासक्त भक्ति करी ब्रह्मा ॥१॥परी सृष्टीकर्ता ऐसा अभिमान । न सुटेचि जाण अंतरींचा ॥२॥तेणें पुन: सृष्टि निर्माणसमयीं । विरंचीही येई पुनर्जन्मा ॥३॥अधिकारस्थित तैसेचि ते ऋषि । अभिमानें घेती पुनर्जन्म ॥४॥विरंचीआदिकां जेथ ऐसी स्थिति । काय इतरांची क्षति तेथ ॥५॥वासुदेव म्हणे आतां काम्यकर्म । मातेसी कथन करिती मुनि ॥६॥१८८फलकामास्तव कथिलीं तीं काम्य । न करावीं जाण ऐसें नसे ॥१॥उपयोग इच्छा धरुनियां मनीं । रमती काम्यकर्मी त्यजूनि देवा ॥२॥अर्थकार्यास्तव आचरिती धर्म । नामसंकीर्तन नावडे त्यां ॥।३॥विष्टाचि जयांसी रुचे त्यां मधुरान्न । अर्पियचि जाण तैसेंचि हें ॥४॥ईशकथामृत टाकूनियां गोष्टी - । प्रापंचिक त्यांसी रुचती बहु ॥५॥सत्य सत्य माते, दुर्दैवी ते जन । श्रीहरीचे गुण रुचती न ज्यां ॥६॥वासुदेत म्हणे संकीर्तनीं दंग । तयासी श्रीरंग मुक्त करी ॥७॥१८९षोडश संस्कारें पितृलोकप्राप्ति । पुनरपि त्यासी स्वकुळीं जन्म ॥१॥पुण्यक्षयें होई तयासी पतन । ऐसें काम्यकर्म धोका देई ॥२॥माते, यास्तव तूं निष्काम भजन । करुनियां मन स्थिर करीं ॥३॥तेणें इंद्रियांचा खटोटोप संपे । दृश्यद्रष्टाऐक्यें परमानंद ॥४॥परब्रह्म तेंचि उपनिषदोक्त । परमात्मा योगशास्त्रीं नाम ॥५॥सांख्याचा पुरुष भक्तां भगवंत । सकळही मार्ग वैराग्याचे ॥६॥वासुदेव म्हणे प्रपंच हा मिथ्या । बोध कपिलांचा मातेप्रति ॥७॥१९०अनासक्त चित्तें आचरावा योग । भक्ति अंतरांत धरुनि माते ॥१॥निर्गुण ज्ञान कीं निष्काम ते भक्ति । योग्यता तयाची एक असे ॥२॥रुप, रस, गंध, स्पशादिकें जेंवी । साक्षात्कार होईअ पदार्थांचा ॥३॥भिन्न भिन्न मार्गे तैसाचि ईश्वर । देई साक्षात्कार साधकासी ॥४॥सगुण ते त्रिधा तैसीच निर्गुण । चतुर्विध जाण भक्ति ऐसी ॥५॥कालगतीही ते निवेदिली तुज । अतर्क्य सामर्थ्य कालाचें त्या ॥६॥वासुदेव म्हणे स्वस्वरुपभ्रम । संसारनिमग्न जीवाप्रति ॥७॥१९१दुरभिमानी दुष्ट उद्धत दुष्कर्मा । गूढतत्त्वज्ञाना अपात्र तो ॥१॥यास्तव तें कदा न कथावें त्यासी । लोभी भक्तद्वेषी तोही त्याज्य ॥२॥विषयनिमग्न अपात्रचि एथ । निवेदितों पात्र कोण तेंही ॥३॥आस्तिक्य, नम्रता, तत्त्वज्ञाननिष्ठा । भगवंतीं ज्याचा प्रेमभावे ॥४॥निर्मत्सर सदा सेवी गुरुजनां । वैराग्यही जाणा विषयांचें ज्या ॥५॥तोचि उपदेशपात्र या विषयीं । श्रवणाचें पाहीं श्रेष्ठ फल ॥६॥पठणही याचे सद्गतिदायक । वासुदेव चित्त द्यावें म्हणे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP