मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय १७ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय १७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय १७ वा Translation - भाषांतर ८९ब्रह्मदेववाक्य ऐकूनियां देव । होऊनि निर्भय निघूनि जाती ॥१॥शतरर्षे ऐसीं लोटतां दुश्चिन्हें । भीम दिव्य क्रमें सकल होती ॥२॥पातला प्रलय ऐसें वाटे जनां । जन्मले आश्रमामाजी दैत्य ॥३॥क्षणक्षणा वृद्धि पावूनि वाढले । आकार लाभले पर्वताचा ॥४॥हिरण्याक्ष एक हिरण्यकशिपु । नामें देवरिपु लाधले हीं ॥५॥ब्रह्मस्वरें झाले अजिंक्य ते जनीं । गांजिली अवनी स्वसामध्यें ॥६॥वासुदेव म्हणे जाई हिरण्याक्ष । वरुणलोकास युद्धेच्छेनें ॥७॥९०जलक्रीडा करी सागरीं तो दैत्य । गढूळ उदक करी त्याचें ॥१॥विभावरी नामें वरुणनगरीं । जाऊनियां करी चेष्टा बहु ॥२॥प्रत्यक्ष वरुणसभेमाजी जाई । आव्हान त्या देई युद्धास्तव ॥३॥क्रुद्धही वरूण जाणूणियां काल । राहिला निश्चल संयमानें ॥४॥म्हणे हिरण्याक्षा, आतां आम्ही वृद्ध । विष्णूसवें युद्ध करीं शौर्ये ॥५॥युद्धेच्छा तो पूर्ण करील बा तुझी । मांस कोल्हींकुत्रीं भक्षितील ॥६॥वासुदेव म्हणे अनुकूल काल । लाभतां गोपाल स्मरे ज्ञाता ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP