मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय १४ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय १४ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय १४ वा Translation - भाषांतर ७०परीक्षितीलागीं बोलताती शुक । क्षत्ता मैत्रेयांस प्रश्न करी ॥१॥हिरण्याक्षवध वराहानें केला । कारण मजला निवेदा तें ॥२॥मैत्रेय कथिती देवांसी विरंची । कथीं कथा तेचि परिसा आतां ॥३॥मरीचीचा पुत्र महर्षि कश्यप । दिति कन्या, दक्ष अर्पी तया ॥४॥सपत्नीचे पुत्र पाहूनियां दिति । प्रार्थी कश्यपांसी अपत्यार्थ ॥५॥सायं होमामाजी मुनि तदा मग्न । दिति म्हणे प्राण व्याकुळ हे ॥६॥आम्हां त्रयोदश कन्यांसी दक्षानें । अर्पिलें प्रेमानें तुम्हांप्रति ॥७॥कृतार्थ कांहींसी केलें मुनिराया । हेतु पुरवाया अद्य माझा ॥८॥वासुदेव म्हणे कामाकुल कांता । पाहूनि कश्यपा खेद वाटे ॥९॥७१बेभान कांतेसी पाहूनि कश्यप । चिंती हा प्रदोषकाळ टळो ॥१॥गौरवें कांतेसी बोलला कां मन । साशंकित जाण करिसी ऐसें ॥२॥पूर्ण तव इच्छा करीन सकळ । कांताचि आधार पुरुषाप्रति ॥३॥उल्लंघी सागर नाबाडी नौकेनें । गृहस्थ पत्नीनें कृतार्थ तैं ॥४॥त्रिविध पुरुषार्थसाधक हे कांता । भार संसाराचा तिच्या शिरीं ॥५॥इंद्रियविजय कांतेच्या साह्यानें । इतरांसी जाणें अशक्य तें ॥६॥फिटती न कदा कांतेचे उपकार । तव इच्छा सर्व पुरवीन मी ॥७॥परी अशुभ ही वेळ प्रिय कांते । धैर्य अंतरीं तें धरीं कांहीं ॥८॥वासुदेव म्हणे कश्यप कारण । निवेदिती ध्यान द्यावें आतां ॥९॥७२प्रिये, सायंकाळी अनुचरांसवें । हिंडती हें घ्यावें ध्यानीं शिव ॥१॥तीक्ष्ण दृष्टि त्यांची सूर्य चंद्र नेत्र । स्वभावहि उग्र ध्यानीं असो ॥२॥सर्वसाक्षीसी त्या नसे भेदभाव । मनीं आप्तभाव न धरीं त्याचा ॥३॥सर्वत्र तो सम जाणूनि स्वधर्म । चिंतूनियां काम आंवरावा ॥४॥परोपरी ऐसा करितांही बोध । राहिली न लाज दितीलागीं ॥५॥दैवदुर्विलास जाणूनियां मुनि । कामना पुरवूनि खिन्न झाले ॥६॥वासुदेव म्हणे इच्छा श्रीहरीची । अटळचि ऐसी ज्ञात्यांतेंही ॥७॥७३पश्चात्तापदग्ध पुढती ते दिति । शरण कश्यपासी विनयें येई ॥१॥म्हणे शंकराचा जाहला अपराध । परी गर्भपात होऊं नये न॥२॥गायत्री जपूनि मुनि नित्यकर्म - । आटोपूनि, जाण वदति ऐका ॥३॥वेळ अमंगळ, चित्तही चंचळ । अवमान थोर शंकराचा ॥४॥आज्ञाभंग माझा, अपराध चार । कांते, ऐसे घोर केलेसी त्वां ॥५॥यास्तव त्रैलोक्यपीडक पुत्रांसी । कांते जन्म देसी स्पष्टचि हें ॥६॥वधील तयांसी विष्णु भगवान । अवतार घेऊन भक्तांस्तव ॥७॥वासुदेव म्हणे पतीचें वचन । दिति परिसून प्रार्थीतसे ॥८॥७४मुने, विप्रशापें नाश न पुत्रांचा । होवो हीच इच्छा पुरवा माझी ॥१॥शापदग्धाची न कोणी कींव करी । नरकवास जरी लाभला त्या ॥२॥ऐकूनि कश्यप बोलले दितीसी । पश्चात्ताप चित्तीं तुजसी झाला ॥३॥उदेला विवेक विष्णूपरी श्रद्धा । आदर शिवाचा दाविलासी ॥४॥तेणें तुज पौत्र होईल विवेके । प्रिय श्रीहरीसी प्राणाहूनि ॥५॥विश्वनाथतोषें तुष्ट होई विश्व । पौत्र तुझा प्रिय सकलां तेणें ॥६॥वासुदेव म्हणे संतोष दितीसी । ऐकूनि पतीची कृपावाणी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP