मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय २७ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय २७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय २७ वा Translation - भाषांतर N/A१४९मुनि म्हणे माते, प्रतिबिंब जळीं । हालतां तत्काळीं बिंब हाले ॥१॥ऐसे भासे परी सूर्य स्थिर जैसा । देह दु:खें तैसा जीव दु:खी ॥२॥भास हा सकळ निश्चल ईश्वर । सदा निर्विकार क्रियाहीन ॥३॥जीवेश्वरभेद नित्य धरीं ध्यानीं । ईश्वरचि मनीं समजें जीव ॥४॥अहंभावें तया देहाचा अभिमान । देहदु:खे जाण तेणें तया ॥५॥उत्तम, मध्यम, कनिष्ठादि देह । पावतसे जीव असूनि ईश ॥६॥जागृतीवांचूनि ज्ञातेही स्वप्नांत । भयशोकादिक पावताती ॥७॥जीव हा तैसाचि विषयलंपट । होऊनियां कष्ट भोगितसे ॥८॥वासुदेव म्हणे भक्तिज्ञानादिकें । स्वाधीन चित्तातें करुनि घ्यावें ॥९॥१५०मुनि मातेप्रति साधनें कथिती । सवैराग्य भक्ति उपजे जेणें ॥१॥यम-नियमादि आचरावा योग । ईश्वरीं विश्वास दृढ व्हावा ॥२॥अव्यभिचारिणी भक्ति तया ठायीं । ठेऊनि, ऐकावी कथा त्याची ॥३॥सर्वभूतीं सम ठेवूनियां दृष्टि । द्वेष न कदापि वसो चित्तीं ॥४॥अनासक्ति ब्रह्मचर्य तेंवी मौन । व्रतें स्वीकारुन कर्मे व्हावीं ॥५॥वासुदेव म्हणे ईश्वरार्थ कर्म । करावें हा धर्म म्हणती मुनि ॥६॥१५१यदृच्छालाभेंचि असावें संतुष्ट । सेवावें परिमित अन्न सदा ॥१॥ईश्वरचिंतनीं असावें निमग्न । विविक्त होऊन निर्विकार ॥२॥अभीष्ट चिंतावें सदा सकलांचें । त्यजावें ‘मी’ ‘माझे’ महायत्नें ॥३॥सर्वकाळ धैर्य-दयायुक्त व्हावें । अंतरीं ठसावे बोध तेणें ॥४॥अवस्थानिवृत्ति, भेदभाव नष्ट । प्रतिबिंबें बिंबबोध होई ॥५॥ऐशा बोधें ब्रह्मस्वरुपाची प्राप्ति । देहादि उपाधी जया नसे ॥६॥वासुदेव म्हणे आदिकारण तें । प्रकृतीसी ज्याचें अधिष्ठान ॥७॥१५२प्रतिबिंबें बिंबबोध घडे । माते, कथितों तें ऐकें आतां ॥१॥प्रतिबिंबाचें तें तेज भित्तीवरी । पाहूनियां जळीं दृष्टी जाई ॥२॥ प्रतिबिंब ते पाहूनि सूर्याचें । दर्शन नरातें सुलभ होई ॥३॥तेंवी पंचभूतें मन, बुध्यादिक । अहंकारबिंब तयांमाजी ॥४॥आत्मप्रतिबिंब अहंकारामाजी । तेणें आत्मप्राप्ति होत असे ॥५॥वासुदेव म्हणे आत्मानुभवाची । वाट ऐशारीति दावियेली ॥६॥१५३माते, निद्रेमाजी अहमादि सर्व । पावती विलय आत्मा जागा ॥१॥तदा स्पष्ट भास न होई तयाचा । सर्व साधनांचा लय तेथें ॥२॥द्रव्यलोभ्याचें तें द्रव्य नष्ट होतां । आत्मनाश जैसा वाटे तया ॥३॥प्रागट्यसाधनें इंद्रियादि नष्ट - । होतां, सुषुप्तींत प्रगटे न तो ॥४॥अहंकारादिकां तोचि प्रकाशक । करितां हा विवेक बोध त्याचा ॥५॥वासुदेव म्हणे ऐकूनि या बोधा । प्रश्न करी माता तोचि ऐका ॥६॥१५४कपिला, यापरी होईलही ज्ञान । प्रकृतीचें भान न सुटे परी ॥१॥प्रकृति पुरुष परस्पराधीन । सोडिती कदा न एकमेकां ॥२॥गंधाप्रति भूमि रसासी उदक । न सोडिती देख परस्परां ॥३॥नित्य संबंध हा सुटल्यावांचूनि । मोक्षाची या जनीं आशा नसे ॥४॥अकर्ताही आत्मा प्रकृतीच्या गुणें । संसारबंधनें बद्ध होई ॥५॥ज्ञानें जरी तया स्वरुपाबोध । प्रकृतिसंबंध न सुटेचि कीं ॥६॥कारण तें नित्य यास्तव कपिला । उपाय कथावा संकटीं या ॥७॥वासुदेव म्हणे मातेचा हा प्रश्न । आनंद ऐकून कपिलांप्रति ॥८॥१५५मुनि म्हणे माते, केवळ प्रकृति - । संबंध जीवासी न करी बद्ध ॥१॥मानूनि आवडे आसक्ति धरितां । बंध, ते सुटतां भय नसे ॥२॥साधनशैथिल्यें पुनरपि भय । यास्तव उपाय व्हावे नित्य ॥३॥स्वधर्माचरण व्हावें ईश्वरार्थ । राग द्वेषलिप्त होऊं नये ॥४॥दृढभावें नित्य श्रवण लीलांचे । करुनि ईशातें घ्यावें मनीं ॥५॥प्रकृति पुरुष विवेक करावा । योग आचरावा करुनि तप ॥६॥वासुदेव म्हणे ऐशापरी मुनि । रमावें साधनीं म्हणती नित्य ॥७॥१५६अरणीपासूनि उद्भवतां अग्नि । अरणीसी जाळूनि तेज पावे ॥१॥प्रकृतिज्ञानचि तेंवी प्रकृतीची - । आसक्ति जीवाची दूर करी ॥२॥तेणें स्वप्नदु:ख सुटे जागृताचें । तैसेंचि ज्ञात्यातें न उरे भय ॥३॥बहुतां जन्मींच्या साधनांचे फळ । वैराग्य प्रबळ लाभतसे ॥४॥इहपरभोगइच्छा नुरे तेणें । चित्त ईशप्रेमें भरुनि जाई ॥५॥ईशानुग्रहेंचि संशयनिरास । होऊनि, आनंद नित्य लाभे ॥६॥वासुदेव म्हणे मोक्षश्री लाभतां । जन्ममरणाचा फेरा चुके ॥७॥१५७लिंगदेहासवें देहादि सकल । यापरी समूळ नष्ट होती ॥१॥मग संसाराचें भय तें शिवेना । मार्गी परी नाना असती विघ्नें ॥२॥योगबळें चित्तस्थैर्य तें लाभतां । सिद्धींचें साधका विघ्न मोठें ॥३॥मोहजाळीं तया गुंततां फिरुन । साधकासी जन्ममरणफेरा ॥४॥विजयानंद तैं होई मृत्युतेंही । जिंकिला योगीही हर्षे म्हणे ॥५॥वासुदेव म्हणे खेळांत रंगतां । पदर मातेचा सुटूनि जाई ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP