मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ५ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ५ वा Translation - भाषांतर २६शुद्धात्मा विदुर गंगाद्वारी येई । मैत्रेयांसी पाही परमानंदें ॥१॥वंदूनि तयांसी प्रश्न करी प्रेमें । वर्तावें नरानें केंवी सांगा ॥२॥सुखार्थ प्रयत्न करिती सकळ । दु:ख तें अटळ परी तयां ॥३॥श्रीहरीकृपेचा मार्ग दावीं आम्हां । अवतारमहिमा गाई त्याचा ॥४॥निरिच्छें त्या केंवी निर्मिलें हें जग । संरक्षिलें सांग कैशापरी ॥५॥आंवरुनि विश्व स्वयें होई लीन । केंवी तें कथन करा मुने ॥६॥वासुदेव म्हणे विदुराचे प्रश्न । देऊनियां ध्यान ऐका प्रेमें ॥७॥२७एकचि तो केंवी ब्रह्मा विष्णु होई । अवतार घेई केंवी सांगा ॥१॥चरित्र तयाचें तेंवी विश्वोत्पत्ति । नारायणें कैसी केली मुने ॥२॥कर्मस्वभावही कथावे जीवांचे । कृष्णकथामृतें पुनित करा ॥३॥व्यासांनीं यास्तव रचिलें भारत । मर्म त्याचें स्पष्ट न कळे जनां ॥४॥यास्तव भ्रमरमकरंदन्यायें । मज निवेदावें कथासार ॥५॥जगत्कल्याणार्थ श्रीकृष्णचरित्र । मैत्रेया, समग्र निवेदावें ॥६॥वासुदेव म्हणे मैत्रेय योगींद्र । वदती तत्सार कथितों ऐका ॥७॥२८सृष्टयुत्पत्ति होतां दृश्यद्रष्टारुपें । भासे तोचि असे पूर्वीं एक ॥१॥एकाकी न रमे म्हणूनि कारण - । कार्यरुप जाण मायाशक्ति - ॥२॥योजूनियां, विश्व निर्मी हें लीलेनें । निर्मी निजांशानें चिदाभास ॥३॥महत्तत्व तेणें विकार पावलें । काल गुण झाले साह्य तया ॥४॥कार्य अधिभूत, कारण अध्यात्म । अधिदैव जाण कर्तारुप ॥५॥ऐसा हा त्रिविध अहंकार होई । कारण सर्वांसी पुढती तोचि ॥६॥वासुदेव म्हणे पूर्वीसम एथ । सृष्ट्युत्पत्तिवृत्त कथिलें असे ॥७॥२९अधिक जें एथें वर्णिलें तें ऐका । तत्त्वांच्या देवता अभिमानी ज्या ॥१॥संघशक्त्याभावें सामर्थ्य न त्यांसी । यास्तव प्रभूसी प्रार्थिती त्या ॥२॥देवा, नमस्कार असो तुजप्रति । शरणागतांसी छत्ररुपा ॥३॥तापत्रयतप्त जीवांसी न सौख्य । संसारीं तूं एक त्राता आम्हां ॥४॥पावना, त्वद्गुणश्रवणेंचि ज्ञान । घेईं हें वंदन जगत्पते ॥५॥अहंममत्वें त्वच्चरण दुर्लभ । भक्तही दुर्लभ पामरांसी ॥६॥वासुदेव म्हणे भक्तीनें विरक्ति । ज्ञानें घडे मुक्ति पुढती सुखें ॥७॥३०योगमार्गाहूनि भक्तिमार्ग श्रेष्ठ । योग्यां बहु कष्ट भक्तां सौख्य ॥१॥अनादि अनंता निर्मूनि आम्हांसी । कार्य जें इच्छिसी न घडे कांहीं ॥२॥कारणविभिन्न गुण आम्हांप्रति । कैसी सृष्ट्युत्पत्तिअ करणें सांग ॥३॥ज्ञानदृष्टि जरी देसील तूं आम्हां । भोगूं भोग नाना सहज तरी ॥४॥अजा अव्यया, कां आम्हां निर्मिलेंसी । रचावी ते सृष्टि केंवी कथीं ॥५॥सामर्थ्यही तैसें देईं देवदेवा । मोद वासुदेवा स्तवनें होई ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP