मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ११ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ११ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ११ वा Translation - भाषांतर ४९कोणाही द्रव्याचा अंतिम विभाग । परमाणु तयास म्हणती ज्ञाते ॥१॥सान्निध्यें तयांच्या पदार्थावबोध । स्थूल सूक्ष्म रुप द्रव्या हेंचि ॥२॥पदार्थावभुक्त स्थूल काल जाण । सूक्ष्म तोचि जाण अनुपभुक्त ॥३॥दोन परमाणु तो ‘अणु’, तीन अणु । मिळतां ‘त्रसरेणु’ म्हणती तया ॥४॥जालार्क किरणीं सूक्ष्म रज:कण । त्रसरेणु जाण तेचि बापा ॥५॥तीन त्रसरेणुगमनासी जो काल । ‘त्रुटि’ संज्ञा बोल तयालागीं ॥६॥शत त्रुटि ‘वेध’ तीन वेधें ‘लव’ । त्रिगुण जो लव ‘निमेष’ तो ॥७॥निमेष जे तीन ‘क्षण’ तो गणावा । ‘काष्ठा’ ऐशा नांवा पांच क्षण ॥८॥पंचदश काष्ठा ‘लघु’ तया नाम । पंचदश गुण लघु ‘घटि’ ॥९॥वासुदेव म्हणे ‘मुहूर्त’ द्विघटि । षट्, सप्त कीं घटी ‘प्रहर’ जाण ॥१०॥चार प्रहर तो ‘दिन’ मानवाचा । तितुकाचि साचा रजनीकाळ ॥१॥पंचदश अहोरात्री तोचि ‘पक्ष’ । कृष्ण आणि शुद्ध पक्ष दोन ॥२॥पक्षद्वयें ‘मास’ पितरांचा दिन । ‘ऋतु’ मास दोन होतां घडे ॥३॥षण्मासें ‘अयन’ दक्षिण-उत्तर । दक्षिण ते रात्र, उत्तर दिन ॥४॥ऐसें मानवांचें ‘वर्ष’ ‘अहोरात्र’ । देवांचे साचार जाणावे ते ॥५॥शतसंवत्सर आयुष्य मानवा । भ्रमणकाल हा आदित्याचा ॥६॥सूर्य, बृहस्पति, सवन, चंद्र, तारे । पंच संवत्सरें गतीनें त्या ॥७॥संवत्सर, परि, इडा अनु, वत्सर । पंच हे प्रकार जाणावे ते ॥८॥वासुदेव म्हणे भौतिकचि सूर्य । तया नमस्कार प्रेरकासी ॥९॥५१त्या त्या मानें शतायु ते देवादिक । वसती भृग्वादिक किती काळ ? ॥१॥मैत्रेय विदुराप्रति निवेदिती । संधीसवें जाती चार युगें ॥२॥द्वादश सहस्त्र अब्दें तैं देवांचीं । गणना हे शास्त्रीं कथिली असे ॥३॥सहस्त्र ते चार, तीन दोन एक । द्विगुण शताधिक अनुक्रमें ॥४॥कृतत्रेतादिकां मर्यादा काळाची । क्रिया हे तेथींची कथिली असे ॥५॥वासुदेव म्हणे चतुष्पादधर्म । प्रतियुगीं न्यून पाद एक ॥६॥५२देवांची सहस्त्र वर्षे तोचि दिन । तितुकीच जाण रात्र जेथें ॥१॥ब्रह्मदिन ऐसा सृष्टिक्रम चाले । चौदा मन्वन्तरें प्रतिदिनीं ॥२॥सहस्त्र चौकडयांहूनि अल्पाधिक । प्रति मनु देख वास करी ॥३॥परिवारासवें प्रति मनु येई । नियोजित राही काल त्याचा ॥४॥प्रतिदिनीं ऐसा सृष्टीचा विस्तार । दिनान्तीं संहार होत असे ॥५॥पुढती प्रलयीं शेषशायीं हरि । योगनिद्रा वरी आनंदानें ॥६॥द्वितीय परार्ध सांप्रत हा जाण । तेंवी ब्राह्म पाद्म थोर कल्प ॥७॥वराहावतारें कल्प हा वाराह । बंदी वासुदेव वराहा त्या ॥८॥५३द्विपरार्ध ऐसें ब्रह्ययाचें आयुष्य । निमेषचि एक अनंताचें ॥१॥आपरमाणु तो द्विपरार्धवरी । काल सत्ताधारी अहंभावें ॥२॥परमात्म्यावरी सत्ता न तयाची । व्यापकता त्याची ध्यानीं आणीं ॥३॥ब्रह्मांडकोश हा अर्धशतकोटी - । योजनें, ज्या पोटीं विस्तारला ॥४॥सभोंवती त्याच्या वेष्टणें तीं सप्त । दशगुण श्रेष्ठ प्रत्येक तें ॥५॥ब्रह्मांडकोश हा परमाणुमाजी । ऐसे कोट्यवधि कोश जेथें ॥६॥अक्षरब्रह्म तें सकलां कारण । वासुदेवा ध्यान घडो त्याचें ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP