स्कंध ३ रा - अध्याय ८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


N/A३६
प्रशंसूनि मुनि बोलले क्षत्त्यासी । पल्लव भक्तीसी आणिसी तूं ॥१॥
सुखार्थचि यत्न करुनिही लोक । पावताती दु:ख सकळ जनीं ॥२॥
लाभार्थ तयांच्या ऐकें भागवत । शेष, कुमारांस वदला पूर्वी ॥३॥
सांख्यायनांप्रति कथिती कुमार । गुरु पराशर पुशिती तयां ॥४॥
पुलस्त्यवरानें गुरु पुराणज्ञ । पराशरें ज्ञान कथिलें मज ॥५॥
वासुदेव म्हणे श्रद्धा विनयादि । सद्गुणें क्षत्त्यासी कथिती मुनि ॥६॥

३७
प्रलयान्तकालीं नाभीकमलस्थ । ब्रह्मा अंतरिक्ष मात्र पाही ॥१॥
कळेना तयासी कोण मी हें काय । शोधार्थ तो जाय कमळामाजी ॥२॥
शत वर्षे शोध घेतांही न अंत । तप कमलस्थ पुढती करी ॥३॥
तपानें अंतरीं प्रगटला हरी । वर्णू केवी तरी रुप त्याचें ॥४॥
मृणालगौर त्या शेषावरी निद्रा । अंध:कार सारा दूर होई ॥५॥
किरीट कुंडलें मनोहर हास्य । शोभा अलौकिक काय वर्णूं ॥६॥
चंदनवृक्ष कीं पर्वत तो दुजा । सहस्त्र फणांचा डौल भारी ॥७॥
वासुदेव म्हणे तयाचे स्तवन । करी चतुरानन प्रेमभावें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP