मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय १५ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय १५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय १५ वा Translation - भाषांतर ७५मैत्रेय क्षत्त्यासी बोलती, तैं दिती । गर्भ उदरांतचि रक्षीतसे ॥१॥जन्में त्यांच्या दु:ख न व्हावें जनांतें । इच्छा हे दितीतें एकमात्र ॥२॥परी गर्भांतचि असतां ते दैत्य । पीडा जगतास होई बहु ॥३॥ब्रह्मवीर्य काय असेल सामान्य । निस्तेज होऊन जाई भानु ॥४॥सर्वत्र जाहला अंध:कार यदा । देव चतुर्वक्त्रा प्रार्थिती तैं ॥५॥ब्रह्मदेव म्हणे भक्तसंरक्षक । हरीचें कौतुक वर्णवेना ॥७॥७६ब्रह्मा म्हणे पूर्वनिर्मित कुमार । निरिच्छ संचार करिती नित्य ॥१॥हिंडता हिंडतां गेले वैकुंठासी । तेथ सकलांसी विष्णुरुप ॥२॥केवळ निष्काम भक्तांसी तें स्थान । लाभे, भगवान वसे तेथें ॥३॥वेदान्तेंचि त्याएं आकळे स्वरुप । ‘नैश्रेयस’ तेथ रम्योद्यान ॥४॥तया मोक्षवनीं बहु कल्पवृक्ष । पुष्पें फळें नित्य तरुलागीं ॥५॥कांतेसवें विष्णुभक्त तैं विमानीं । आनंदें बैसूनि हिंडताती ॥६॥निर्मल हरिगुण त्यागूनि विषय । गाती सर्वकाल भक्त तेथें ॥७॥वासुदेव म्हणे पक्षीही तेथींचे । आनंदें हरीचे गुण गाती ॥८॥७७चंपक मालती बकुल पुन्नाग । असती परी श्रेष्ठ तुलसी तेथ ॥१॥रत्नविमानींही सलील हास्यानें । मोहित न मनें तयास्थानीं ॥२॥कमला कमजलासी सिंचून । वाटे संमार्जन करी प्रेमें ॥३॥लक्ष्मी लक्ष्मीवनीं एकदां हर्षली । श्रीहरी कुरवाळी पाहूनियां ॥४॥अर्थकामयुक्त कथा जे ऐकती । नरकीं लोटिती आपणां ते ॥५॥धर्मज्ञानासवें लाभे तत्त्वज्ञान । ऐसा नरजन्म भाग्यें लाभे ॥६॥ऐकती न गाती कथा श्रीहरीची । कंठ न दाटती मूढच ते ॥७॥वासुदेव म्हणे गुणगानीं धुंद । होती तयां लाभ वैकुंठाचा ॥८॥७८दुर्लभ हा देवांतेहे । जाती कुमर त्या ठाईं ॥१॥जातां सप्तम द्वारासी । दिसले द्वारपाळ त्यांसी ॥२॥विष्णूसम तयां रुप । वेत्रयष्टि धरिती आड ॥३॥कुमारांसी प्रतिबंध । नव्हता कदापि ठाऊक ॥४॥बालक ते दिगंबर । हंसले तया द्वारपाळ ॥५॥वासुदेव म्हणे ऐसा । मोह वैकुंठींही कैसा ॥६॥७९स्वागतार्थ ज्यांच्या धांवे भगवान । तयांचा अपमान विष्णुद्वारीं ॥१॥आरक्त नयन बोलले ते सिद्ध । यालोकीं प्रतिबंध योग्य न हा ॥२॥कपटभावानें कोणीही न एथ । य़ेई कां रे द्वैत आठवलें ॥३॥भक्त-भगवंत एकचि या लोकीं । शासन तुम्हांसी योग्य वाटे ॥४॥वेषधारी तुम्ही वंचक भासतां । मानवांच्या लोका जन्म पावा ॥५॥विप्रशाप ऐसा कठोर ऐकूनि । शरण जाऊनि प्रार्थिती त्यां ॥६॥अधोलोकीं जन्म येतांही प्रभूची । विस्मृती आम्हांसी होऊं नये ॥७॥इतुक्यांत सर्व जाणूनि श्रीहरी । येती तया स्थळीं लक्ष्मीसवें ॥८॥वासुदेव म्हणे कृपेचा सागर । वर्णावें सौंदर्य काय त्याचें ॥९॥८०अहर्निश ध्यान करिती जयाचें । कुमार तयातें अवलोकिती ॥१॥छात्रचामरांची अलौकिक शोभा । मेळा पार्षदांचा सभोंवार ॥२॥शुभ्र हंसांसम चामरें रुळती । छत्राचे हालती मौक्तिक सर ॥३॥पर्जन्यतुषार भासती ते शुभ्र । श्यामल सुंदर हंसरी मूर्ती ॥४॥द्वारपालांसवें सनत्कुमारांसी । पाही कृपादृष्टियुक्त प्रभु ॥५॥वक्षस्थलीं लक्ष्मी विलासत होती । शोभा वैकुंठासी तेणें बहु ॥६॥वासुदेव म्हणे शतकोटी कंदर्प । लाजती तें रुप पाहूनियां ॥७॥८१पीतांबरधारी नाथ वैकुंठींचा । तेज:पुंज पट्टा तयावरी ॥१॥आपादलंबिनी वनमाला कंठीं । भ्रमर भोंवतीं झंकारती ॥२॥स्कंधीं गरुडाच्या हस्त सकंकण । कमल भ्रमण अन्य हस्तें ॥३॥कर्णकुंडलांनीं विद्युल्लता लाजे । कपोलें विराजे कांती त्यांची ॥४॥सरळ नासिका मस्तकीं किरीट । झळाळे कौस्तुभ कंठामाजी ॥५॥अनुपम ऐशा सौंदर्ये लक्ष्मीचें । लावण्यचि वाटे सकलां तुच्छ ॥६॥देवानुग्रहार्थ धरिलें हें रुप । दर्शन प्रत्यक्ष परम भाग्यें ॥७॥वासुदेव म्हणे कुमारांचें पुण्य । प्रगटलें धन्य ऐशा रुपें ॥८॥८२टल लावूनि पाहती । परी पावती न तृप्ती ॥१॥पदांबुजरज:कण । तुलसीदलगंधें जाण ॥२॥संमिश्रित वायु मंद । सुटतां वृत्ति झाल्या धुंद ॥३॥कंठ सद्गदित झाले । अंगीं रोमांच ठाकले ॥४॥झाला संभ्रम तयांसी । कोठें स्थिरावे न दृष्टि ॥५॥वदनचंद्र अवलोकितां । दृष्टि पाही पदांबुजा ॥६॥अधरोष्ठावरी धांवे । तोंचि लोचनीं लांचावे ॥७॥अंतीं झांकूनि नयन । अंतरांत करिती ध्यान ॥८॥वासुदेव म्हणे भाग्य । दृष्टीचे त्या फिटले पांग ॥९॥८३तदा कुमारांनीं प्रार्थिलें प्रभूसी । पाहिलें आजचि रुप तुझें ॥१॥पितृवचनें हें पूर्वीच अंतरी । ठसलें होतें परी दिसलें अद्य ॥२॥भक्त तुझे मूर्तिमंतचि कल्याण । त्वद्गुणगायन करिती नित्य ॥३॥मोक्षही तयांसी वाटतसे तुच्छ । इंद्रचंद्रलोक काय तयां ॥४॥आजवरी पापलेशही न झालें । दूतांसी शापिलें परी अद्य ॥५॥अधोगती तेणें लाभेल आम्हांसी । नित्य जडो प्रीति परी तव ॥६॥मनभृंग होवो पादपद्मीं लीन । नित्य संकीर्तन-श्रवण घडो ॥७॥नरकही लाभो सुखें मग देवा । दर्शनाचा ठेवा लाभतां तो ॥८॥नमस्कार असो देवा, तुजप्रती । वासुदेव जोडी दोन्ही कर ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP