मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ३ रा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ३ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ३ रा Translation - भाषांतर १७रामासवें कृष्ण गेला मथुरेसी । वधिलें कंसासी पराक्रमें ॥१॥माता-पित्यालागीं आनंदित केलें । सांदीपनी झाले गुरु त्यांचे ॥२॥धनुर्विद्या वेदवेदांगनिपुण । होती, जाण अल्प यत्नें ॥३॥मृत पुत्र देती आणूनि गुरुसी । सांदीपनी ऋषि तदा तुष्ट ॥४॥पुढती जाहलें रुक्मिणीहरण । सत्येस्तव पण जिंकियेला ॥५॥अपमानक्रुद्ध नृपाळ युद्धासी । येतां जिंकी त्यांसी लीलामात्रें ॥६॥वासुदेव म्हणे सत्येसवें कृष्ण । हर्षित होऊन सदनीं येई ॥७॥१८अदितिमातेचा कुंडलापहार । करी भौमसुर एकावेळीं ॥१॥प्रार्थितां इंद्रानें भामेसवें कृष्ण । दैत्यासी वधून कार्य साधी ॥२॥भामेस्तव तदा पारिजातवृक्ष । आणितां शचीस क्रोध येई ॥३॥कांतावचे इंद्र कृष्णावरी येई । फजित तो होई परी अंतीं ॥४॥भौमासुरपुत्रा अर्पूनियां राज्य । षोडश सहस्त्र कन्यामुक्ति ॥५॥करुनि, तयांसी नेई द्वारकेतें । भिन्न भिन्न रुपें वरिलें तयां- ॥६॥अलौकिक ऐसा दाविला प्रभाव । होती दशपुत्र प्रत्येकीसी ॥७॥वासुदेव म्हणे ईश्वरावांचून । लीला ऐशा कोण करुं शके ॥८॥१९यवन शाल्य ते जरासंधादिक । जिंकूनि भक्तांस रक्षियेलें ॥१॥पांडवांनिमित्त क्षत्रियसंहार । करुनि भूभार हरिला बहु ॥२॥भक्तांचाचि जय, करुनि हें सिद्ध । अर्पियेलें राज्य पांडवांसी ॥३॥उत्तरेचा गर्भ रक्षूनि संकटी । गेला द्वारकेसी अत्यानंदें ॥४॥पद्मपत्र जळीं तैसा अनासक्त । राहूनि समस्त विषय भोगी ॥५॥पुढती यादवां होईअ विप्रशाप । प्रभास तीर्थास करिती दानें ॥६॥वासुदेव म्हणे कृष्ण भगवान । अतर्क्यचि जाण खेळ करी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP