मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय १६ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय १६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय १६ वा Translation - भाषांतर ८४ब्रह्मा म्हणे विष्णु बोले कुमारांसी । क्षमा मजप्रति करा प्रेमें ॥१॥सेवकांची चूक बाधे धन्याप्रति । कुष्ठ जैं त्वचेसी बाधा करी ॥२॥कीर्तिनाश तेणें होतसे धन्याचा । लौकिक हा माझा तुम्हांयोगें ॥३॥विरोधितां तुम्हां स्वबाहू छेदीन । इतरांतें कोण पुशी मग ॥४॥पादरज:स्पर्शे भस्म होती पापें । ऐसें भाग्य मातें विप्रांमुळें ॥५॥अव्हेरितांही हे सेवी मज लक्ष्मी । प्रभाव हा जनीं ब्राह्मणांचा ॥६॥अग्नि ब्राह्मण हीं मुखें माझी दोन । तयांमाजी जाण विप्र श्रेष्ठ ॥७॥मधुरान्नें विप्र, संतोषतां पुण्य - । जोडे, यज्ञाहून भक्तांप्रति ॥८॥वासुदेव म्हणे प्रेम ब्राह्मणांचें । पहा केवढें हें भगवंतासी ॥९॥८५द्वाररक्षकांचा काय दोष ऐसें । न गणावें मातें विप्र वंद्य ॥१॥गोब्राह्मण तैं निराश्रितां माजी । सर्वकाळ माझी वसती असे ॥२॥प्रसंगीं तयांचा होतां अपराध । मानावा तो सह्य सकल जनीं ॥३॥क्रुद्धही विप्रासी जाई जो शरण । मानितों पूजन माझेंचि तें ॥४॥ऐसें असूनीही अपमान ऐसा । केला तयां शिक्षा योग्यचि हे ॥५॥परी शाप त्यांचा संपूनि त्वरित । स्वस्थळीं येवोत पार्षद हे ॥६॥ऐसा अनुग्रह करा मजवरी । कुमारांसी हरी विनवीतसे ॥७॥वासुदेव म्हणे दासांस्तव हरी । नम्रता स्वीकारी पहा केंवी ॥८॥८६गूढ अभिप्राय भाषण प्रभूचें । ऐकूनि मुनींतें तोष वाटे ॥१॥जोडोनि ते कर म्हणती विश्वेशा । आधार जगाचा तूंचि एक ॥२॥लोकशिक्षणार्थ विप्रांचा सन्मान । करिसी तूं धर्म मूर्तिमंत ॥३॥तुलसीमालास्थ भ्रमरांचें स्थान । लाभण्यासी यत्न करी लक्ष्मी ॥४॥ऐसा तुजवरी ब्राह्मणानुग्रह । म्हणसी हें नवल वाटे आम्हां ॥५॥तप, शौच, दया, मुख्य या पादांनीं । विप्रार्थ अवनी रक्षितोसी ॥६॥वेदमार्गसंरक्षणार्थ विप्रातें । महत्त्व तूं ऐसें देसी देवा ॥७॥द्वारपाळातें वा आमुतें शासन । करिसील मान्य तेंचिअ आम्हां ॥८॥वासुदेव म्हणे सत्यप्रिय हरि । जीवावरि करी नृपा मज ॥९॥८७देव म्हणे ऐसा नका करुं खेद । देवविला शाप मीचि तयां ॥१॥दैत्य होऊनि हे नित्य माझा द्वेष । करुनि हा लोक पावतील ॥२॥ऐकूनि ते गेले वंदूनि कुमार । द्वारपालां धीर देई प्रभु ॥३॥म्हणे युद्धार्थ हा योजिला उपाय । तुम्हांविण कार्य शक्य नसे ॥४॥क्षणभरी तरी युद्धइच्छा माझी । पुरवील ऐशी शक्ति कोणा ॥५॥यास्तव शत्रुत्व तुम्हांसी व्हावया । प्रकार या ठायां घडला ऐसा ॥६॥वासुदेव म्हणे कर्ता करविता । एकचि अच्युता, तूं या जनीं ॥७॥८८अन्य एक गोष्ट कथी नारायण । योगनिद्रामग्न एकदां मी ॥१॥असतां लक्ष्मीसी अडवितां द्वारीं । क्रोधे ती बोलली हेंचि तुम्हां ॥२॥शब्दासम तिच्या विप्र हे पातले । देऊनियां गेल्स शाप ऐसा ॥३॥ब्रह्मा देवांप्रति म्हणे ते पार्षद । दितिगर्भूस्थित तेज:पुंज ॥४॥निग्रह तयांचा शक्य न मजसी । दया ईश्वरासी येई जरी ॥५॥तरीच हें विघ्न हरील तो हरी । दया आम्हांवरी होवो त्याची ॥६॥वासुदेव म्हणे समर्थही ऐसे । पराधीन कैसे पहा होती ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP