मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय १८ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय १८ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय १८ वा Translation - भाषांतर ९१ऐकूनिही, विष्णु हरील प्राणासी । लवही न चित्तीं भय दैत्या ॥१॥शोधार्थ विष्णूच्या करी धडपड । भेटतां नारद कळलें वृत्त ॥२॥रसातळीं तदा जाई तो क्रोधानें । वराहरुपानें दिसला विष्णु ॥३॥तयालागीं क्रोधें म्हणे हे वनचरा । येसी कासयाला सागरीं या ॥४॥कासया हे पृथ्वी नेसी उचलूनि । जा त्वरें टाकूनि आमुची ही ॥५॥अधमा, हा वेष ओळखितों तव । वैरी मम देव रक्षिसी त्यां ॥६॥योगमायाश्रमें वधिसी दैत्यांतें । वरा मम देव मातें गवसलासी ॥७॥गदाघातें शिर फोडीन तत्काळ । अनाथ होतील देव, मुनि ॥८॥शोकहीन तदा होतील बांधव । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥९॥९२ऐकूनि ते कटु शब्द । वराहासी येई क्रोध ॥१॥कांपे थरथरां पृथ्वी । म्हणूनि प्रथम येई वरी ॥२॥अर्पी तिज निज तेज । करी पूर्वस्थानस्थित ॥३॥दैत्य मागोमाग येई । अंध क्रोधानें तो होई ॥४॥करी अपशब्दवर्षाव । अंगावरीं घेई धांव ॥५॥भूमिउद्धार पाहूनि । पुष्पें वर्पिलीं देवांनीं ॥६॥हिरण्याक्ष भडके तदा । घेई स्कंधावरी गदा ॥७॥वासुदेव म्हणे आतां । पाही वराह त्या दैत्या ॥८॥९३उपहासें बोले वराह तयासी । शोधितों तुजसी ग्रामसिंहा ॥१॥दैवहीना, मृत्युद्वारीं ठेपलासी । तेणें भ्रष्ट मति जाहलीसे ॥२॥व्यर्थ वल्गनांसी कोण घाली भीक । घेऊनि समक्ष पृथ्वी गेलों ॥३॥भित्रा, निर्लज्जही वदलासी परी । ठाकलों समोरी युद्धास्तव ॥४॥एकमेव वीर ऐसी तव ख्याति । तुज बलवंतासी वैर केलें ॥५॥अंत त्याचा आतां करणें मज प्राप्त । जिंकूनियां मज रक्षीं दैत्यां ॥६॥करीं आतां सत्य आपुलें वचन । वासुदेव गान पुढती करी ॥७॥९४डिंवचिल्या सर्पासम दैत्य क्रुद्ध । दीर्घ श्वासोच्छ्वास सोडीतसे ॥१॥महा क्रोधें गदा हाणिली प्रभूसी । चुकवी सहजचि प्रभु स्वयें ॥२॥पुढती एकमेक आघात करिती । वार चुकविती परस्पर ॥३॥एकाचि स्त्रीस्तव महायोद्धे जेंवी । लढताती तेंवी लढती वीर ॥४॥गदाघातें देह ठेंचूनियां जाती । अधिकचि होती क्रुद्ध तदा ॥५॥दोघेही निपुण दोघे अति दक्ष । गदाही उत्कृष्ट दोघांप्रति ॥६॥वासुदेव म्हणे युद्ध तें पहाया तया ठाया ब्रह्मयादिक ॥७॥९५पाहूनि दैत्याचें कौशल्य विरंची । वराहप्रभूसी विनवीतसे ॥१॥म्हणे देवा, दैत्य उन्मत्त हा जाणा । गांजीतसे जनां सर्वकाल ॥२॥याच्यासम वीर कोणीही न अन्य । भयाकुल जन तेणें बहु ॥३॥बालक सर्पासी करी बहु क्रीडा । तेंवी वेळ ऐसा व्यर्थ जाई ॥४॥सायंकाळ होतां दैत्य अनावर । यालागीं सत्वर मार्ग योजा ॥५॥संपेल हा आतां अभिजित् मुहूर्त । स्मरा पूर्वशाप देवदेवा ॥६॥वासुदेव म्हणे प्रार्थना प्रभूसी । ब्रह्मदेव ऐसी भावें करी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP