मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय २४ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय २४ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय २४ वा Translation - भाषांतर १२४विदुरा, यापरी कांतेचें वचन । ऐकूनि कर्दम वदले तिज ॥१॥प्रिये, खेद ऐसा करुं नको मनीं । कांता जे सद्गुणी तिज न दु:ख ॥२॥व्रत नियमादि पाळीं तूं ऐसेच । पुत्र जगन्नाथ तुजसी जाण ॥३॥घेऊनि अवतार करील उपदेश । छेदील समस्त हृदयग्रंथी ॥४॥पतिवचनें ती करी आराधन । विश्वास ठेऊन पतीवरी ॥५॥दीर्घकाल ऐसा लोटतां श्रीहरी । जन्मले उदरीं दयामय ॥६॥वासुदेव म्हणे येऊनियां ब्रह्मा । बोलला वचना ऐका काय ॥७॥१२५सर्वज्ञ विरंची बोले कर्दमासी । संतुष्ट मजसी केलेंसी तूं ॥१॥पितृआज्ञा पाळी पुत्र तोचि धन्य । करीं कन्यादान ऋषींप्रती ॥२॥मरीच्यादि कोणकोणा अनुरुप । इतुकेंचि मात्र पाहीं यत्नें ॥३॥पत्नीच्या उदरीं पातला श्रीहरी । कृतार्थ जाहली देवहूती ॥४॥सुलक्षणी बाळ सांख्यशास्त्रवेत्ता । श्रेष्ठ लौकिकाचा ‘कपिल’ नामें ॥५॥वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । ब्रह्मा स्वस्थळातें निघूनि जाई ॥६॥१२६मरीचातें ‘कला’ अत्रीसी ‘अनसूया’ । ‘हविर्भू’ पुलस्त्या, पुलाहा ‘गति’ ॥१॥‘श्रद्धा’ अंगिरातें ‘क्रिया’ ते ऋतूसी । अर्पी ‘अरुंधती’ वसिष्ठातें ॥२॥भृगुलागीं ‘ख्याती’ अथर्वणा ‘शांति’ । कर्दम तो अर्पी परमानंदें ॥३॥विरंचीवचनें कन्या ऐशारीती । अर्पूनियां चित्तीं तुष्ट झाला ॥४॥वासुदेव म्हणे कांतांसवें मुनि । अपुलाल्या स्थानीं निघूनि गेले ॥५॥१२७पुढती एकांतीं कर्दम, पुत्रासी । प्रार्थी देवा, तूंचि सकल कर्ता ॥१॥देवा, पूर्वकर्मे तापविनाशार्थ । दीर्घकाल कष्ट पडती जनीं ॥२॥अनेक जन्मही कष्टतां कोणासी । प्रभो, तव प्राप्ति सुलभ नसे ॥३॥ऐसेंहि असूनि अनुग्रह ऐसा । आम्हावरी साचा केलासी तूं ॥४॥षड्गुणैश्वर्य तें लोळे तुझ्यापायीं । अन्य मज नाहीं इच्छा आतां ॥५॥वासुदेव म्हणे संन्यासें भ्रमण । करीन कर्दम म्हणे आतां ॥६॥१२८बाळ म्हणे मुने, ज्ञानाचा उपदेश । करावया सत्य जन्मलों मी ॥१॥यास्तव संन्यास घेईं वा न घेईं । नित्य लक्ष ठेवीं मजमाजी ॥२॥बोलतों मी जें जें होतसे तें सत्य । जन्मूनियां सत्य वचन केलें ॥३॥लिंगदेहचि हा जन्मासी कारण । होतां आत्मज्ञान सुटका त्याची ॥४॥ज्ञान तें पूर्वीचें लुप्त झालें आजि । पुन: स्थापनेसी पातलों तें ॥५॥मुने मम भक्ति करुनि हो मुक्ति । मातेसी उपदेश करीन हा ॥६॥तेणें ती कृतार्थ निश्चयें । वासुदेव भावें गुण गाई ॥७॥१२९कपिलवचनें आनंदला मुनि । प्रेमें त्या घालूनि प्रदक्षिणा ॥१॥वंदूनि वनांत गेला आनंदानें । कंठिला सुखानें मुनिमार्ग ॥२॥ब्रह्मरुपीं चित्त करुनियां लीन । ईशप्रेमें ज्ञानरुप होई ॥३॥अहं मम भाव त्यागूनि ईश्वर । पाहिला सर्वत्र कर्दमानें ॥४॥क्षुधा, तृषा, शोक, मोह, जरा, मृत्यु । टाळूनियां हेतु पूर्ण त्याचे ॥५॥वासुदेव म्हणे पूर्णावस्था ऐसी । लाभे कर्दमासी भावबळें ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP