मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय २० वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय २० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय २० वा Translation - भाषांतर १०१शौनक सूतासी, विदुर मैत्रेय- । संवाद, श्रद्धेय पुशिती प्रेमें ॥१॥मैत्रेयासी क्षत्ता म्हणे सृष्ट्युत्पत्ति। केली कैशा रीति निवेदा तें ॥२॥मरीच्यादिकांची मैथुनसृष्टि ती । मानसी तें कथीं पुण्यवंता ॥३॥एकेकाची भिन्न अथवा संयुक्त । सृष्टि तेंही स्पष्ट निवेदावें ॥४॥मुनि म्हणे जीवप्राक्तन, ईशेच्छा । काल तीन ऐशा कारणांनीं ॥५॥प्रेरित प्रकृति महत्तत्त्वा जन्मे । सृष्टि यथाक्रमें पुढती होई ॥६॥क्षुधार्त ब्रह्ययासी भक्षूं वधूं ऐसें । यक्ष-राक्षस जे म्हणती तेचि ॥७॥वासुदेव म्हणे अविद्या अंधार । पुढती होती देव प्रकाशानें ॥८॥१०२कटिप्रदेशाच्या अग्रभागांतूनि । दैत्यांप्रति निर्मी पुढती ब्रह्मा ॥१॥कामातुर दैत्य मैथुन ब्रह्मयासी । इच्छिती ब्रह्मा तैं देह त्यागी ॥२॥तेचि सायंकाळदेवता जाहली । ललना भासली दैत्यां संध्या ॥३॥पाहूनि तें ब्रह्मा हांसे तैं गंधर्व । अप्सरासमूह जन्म पावे ॥४॥तदा तोही देह त्यागिला ब्रह्ययानें । आवडे चांदणें गंधर्वातें ॥५॥आलस्य जांभई निद्रा उन्मादेंसी । होई भूतसृष्टि बहुविध ॥६॥पितर किन्नर तत्तद्भावें होती । वासुदेव अंतीं म्हणे मनु ॥७॥१०३पाहूनि मनूसी देव-गंधर्वादि । आनंदित चित्तीं बहुत झाले ॥१॥पुरुषशरीर देई तया ब्रह्मा । आचरिती कर्मा यज्ञादि ते ॥२॥पुढती विरंची ध्यानसमाधीनें । निर्मी ऋषि जेणें सकला हर्ष ॥३॥पूज्य ते सर्वांसी जाण वैराग्यानें । कृतार्थता ज्ञानें पावताती ॥४॥वासुदेव म्हणे ऐसा सृष्टिक्रम । विदुर ऐकून संतोषला ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP