मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ३० वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ३० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ३० वा Translation - भाषांतर १७२माते, वायूमाजी राहूनि सर्वदा । प्रभाव वायूचा न कळे मेघां ॥१॥कालचक्रीं तेंवी असूनियां जीव । कालाचा प्रभाव जाणती ना ॥२॥गृह, दारा, धन जोडितां सुखार्थ । काळ करी नष्ट इच्छामात्रें ॥३॥शाश्वत तें सर्व मानूनियां जीव । करी हाय हाय शोकमग्न ॥४॥जन्मूनि विष्ठेंत विष्ठाचि भक्षितां । कंटाळा देहाचा न येई त्या ॥५॥मायामोहमग्न करी बहु पापें । पुत्र कलत्रांचें सौख्य मानी ॥६॥दु:खनिमग्नहि दु:खप्रतिकार । न करी साचार सौख्यभ्रमें ॥७॥परिवारास्तव सोशी बहु कष्ट । अधोगती मात्र वांटा त्याचा ॥८॥वासुदेव म्हणे लोभमूळ यत्न । फंसतांही जाण करी नर ॥९॥१७३द्रव्यार्थ पुढती अपहारबुद्धि । मंदभाग्यें होती व्यर्थ यत्न ॥१॥कुंटुंबपोषण न घडेचि अंतीं । होई गृहामाजी तिरस्कार ॥२॥इतुकेंही होतां नुपजे वैराग्य । पावे अनारोग्य वार्धक्यांत ॥३॥श्वानासम धनी होई तुकडयाचा । अपमान ऐसा पदोपदीं ॥४॥इतुकेंही होतां नुपजे वैराग्य । पुढती त्रिदोष करिती जोर ॥५॥अंतीं आप्त गोत बैसोनि भोंवतीं । दु:खें संबोधिती दादा भाऊ ॥६॥वासुदेव म्हणे असमर्थ रोगी । बोलणेंही अंतीं अशक्य त्या ॥७॥१७४ऐसा असंयमी कुटुंबाचा दास । होतसे बेशुद्ध अंतीं मंद ॥१॥आप्तरुदनीं तो सोडीतसे प्राण । यमदूतां पाहून यम पावे ॥२॥तेणें मलमूत्रोत्सर्ग करी वेगें । ओढिती तयातें यमदूत ॥३॥यातना शरीरीं, घालूनियां कंठीं - पाश, आंवळिती बलात्कारें ॥४॥मार्गी जातां शिक्षा भय त्या दाविती । तेणें भयें त्यासी कंप सुटे ॥५॥तोडिती तयाचें मांस मार्गी श्वान । तेणें पापकर्म आठवे त्या ॥६॥वासुदेव म्हणे यमयातना त्या । सोसतील कैशा जीवाप्रति ॥७॥१७५अनवाणी तप्त सिकता लंघणें । क्षुधा, तृषा, तेणें क्षुब्ध होती ॥१॥परी अन्नोदक न मिळे तयांसी । कोरडे ओढिती यमदूत ॥२॥एकेक पाऊल टाकी महाकष्टें । पडे अंग त्याचें धरणीवरी ॥३॥ओढिती तयासी तैसाचि नव्वद - । योजनें सहस्त्र अधिक मार्ग ॥४॥तीन मुहूर्ती तो लंघिताती मार्ग । दोन मुहूर्तांत अति पापें ॥५॥दुग्धकाष्ठें अंग भाजिती पुढती । त्याचेंचि कोंबिती मुखीं मांस ॥६॥वासुदेव म्हणे स्वयेंचि आपुलें । तोडूनियां खावें लागे अंग ॥७॥१७६श्वान गिधाडेंही भक्षिताती मांस । करिताती दंश सर्प विंचु ॥१॥छेदिती शस्त्रानें तुडविती गज । तेंवी कडेलोट करिती त्याचा ॥२॥बुडवूनि तया ठेविताती पंकीं । कर्मासम गति पुढती देती ॥३॥तामिस्त्र तैं अंधतामिस्त्र रौरव । याच लोंकी सर्व म्हणती कोणी ॥४॥कृमि कीटकादि योनी त्या प्रत्यक्ष । ऐसा परलोक भोगी जीव ॥५॥हिंसा, द्रोह, तेंवी कुटुंबपोषण । एथेंचि तें जाण पापसंगें ॥६॥अंधतामिस्त्र तो उच्च पाप्याप्रति । अंतीं सूकरादि योनिलाभ ॥७॥पापक्षयें होई नरदेहप्राप्ति । जेथ सत्कर्माची संधि लाभे ॥८॥वासुदेव म्हणे देह, दारा, धन । राही एथ, कर्म पुढती येई ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP