मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ३ रा| अध्याय ९ वा स्कंध ३ रा तृतीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा स्कंध ३ रा - अध्याय ९ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ३ रा - अध्याय ९ वा Translation - भाषांतर ३८ब्रह्मा म्हणे ईशा, महत्तपें अद्य । जाहलों कृतार्थ दर्शनें या ॥१॥त्वदज्ञान हाचि दोष या जीवांचा । तुजविण एका नसे कांहीं ॥२॥ज्ञानरुपा, तुज बाधे न अज्ञान । केलेंसी निर्माण तूंचि मज ॥३॥अव्यय शाश्वत अलिप्त त्वद्रूप । भक्तकल्याणार्थ दिससी मज ॥४॥नास्तिकांचे तर्क नरकद्वार तें । दुर्लक्षूनि त्यांतें नमितों तुज ॥५॥वेद हाचि वायु पादपद्मरजें । पुनीत भक्तांतें करी नित्य ॥६॥जोंवरी निर्भय त्वपादचिंतन । न घडे तों जाण भवपीडा ॥७॥वासुदेव म्हणे अल्पलाभास्तव । अंतरे माधव मूढ जना ॥८॥३९त्रिदोष, षड्रिपु, क्षुधापिपासादि । बाधस ती जनांसी अज्ञानानें ॥१॥श्रवणकीर्तनविन्मुख ते घोर । दु:खामाजी थोर पडती नित्य ॥२॥ध्यानींमनींस्वप्नीं द्रव्यचि त्यां दिसे । सुखनिद्रा त्यांतें नसे कदा ॥३॥तथापि न हेतु पूर्ण होती त्यांचे । जवळीच असे नित्य दैव ॥४॥भक्त तुझे नित्य दर्शनें कृतार्थ । निर्दयां अप्राप्य सर्वदा तूं ॥५॥निष्काम त्वदर्थ आचरी जो धर्म । तोचि जनीं धन्य ज्ञानरुप ॥६॥वासुदेव म्हणे अंतकाळीं हरि - । चरित्रचि, तारी श्रवणें भक्तां ॥७॥४०विश्वद्रुममूळ त्वदाश्रित माया । ब्रह्मायादि त्या तया शाखा तीन ॥१॥उपशाखा तयां होती बहुतचि । वंदन तुजसी कालरुपा ॥२॥विन्मुख जे तुज तयां कालबाधा । वर्णवेन तुझा महिमा मज ॥३॥आयुष्य मजसी द्विपरार्ध अब्दें । विश्ववंद्य मातें मानिताती ॥४॥ऐशा मजसीही भय तुझें देवा । अनुग्रह व्हावा सर्वकाळ ॥५॥आत्मानंदमग्ना धर्मरक्षणार्थ । लीलामात्रें नित्य अवतरसी ॥६॥तम, मोह, महामोह, तैं तमिस्त्र । तया अंधतामिस्त्र मायावृत्ति ॥७॥पार तूं तयांच्या परी शेषशायी । वंदन हें घेईं नारायणा ॥८॥वासुदेव म्हणे ब्रह्मा ईश्वरासी । बहुपरी प्रार्थी नम्रभावें ॥९॥४१बह्मा म्हणे देवा, ज्ञानैश्वर्ययोग । घडावा बुद्धीस माझ्या नित्य ॥१॥तेणें सृष्युत्पत्तिसामर्थ्य पावेन । गुणगानीं मन लीन होवो ॥२॥निमित्त मजसी केलेंसी, वेदांचें - । विस्मरण, मातें न होवोचि ॥३॥कृपासागरा, हे कमललोचना । करीं अवलोकना मजकडे ॥४॥मधुर भाषणें बोलें मजप्रति । होतील त्रैलोक्यीं उपकार ॥५॥वासुदेव म्हणे ऐकूनि तो स्तव । बोलला केशव विरंचीतें ॥६॥४२ब्रह्मदेवाप्रति बोले भगवंत । त्यजूनि आळस सृष्टि रचीं ॥१॥सिद्धचि ते परी होई तूं निमित्त । आचरितां तप ध्यानीं येई ॥२॥तपश्चर्या माझी उपजवी भक्ती । जेणें सर्वांभूतीं मीचि दिसें ॥३॥मजमाजी भूतें, अग्नीसम काष्ठीं । पाही तो मजसी तोचि ज्ञाता ॥४॥भूत-भूतकार्याहूनि जीव भिन्न । साक्षात्परब्रह्म कळतां मुक्ति ॥५॥मम आशीर्वादें पुरतील हेतु । भक्तीचि हा केतु साधनांचा ॥६॥देहादिक जीवां प्रिय हे वाटती । आत्मा मी तयांसी प्रियतम ॥७॥वेदस्वरुप तूं सकलांचा आत्मा । पूर्वकल्पज्ञाना स्मरण करीं ॥८॥तेणें तूं सहज निर्मिसील सृष्टि । बोलूनि जगजेठी गुप्त झाले ॥९॥वासुदेव म्हणे ईश्वरीप्रसाद । होतांचि तीं सिद्ध सकल कार्येम ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP