मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
फुगडी गीते

फुगडी गीते

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.लिंबळगांव नगरी भोंवतानं डगरी ।
सोन्याची कुलपं मोत्याची झुलप ।
आम्ही लेकी थोराच्या लिंबाळकराच्या ।

वाकडीतिकडी बाभळ त्याच्यावर बसला होला ।
इकडुन दिला टोला गंगेला गेला ।
गंगेची माणसं मक्याची कणसं ।
आम्ही लेकी थोराच्या वाकरीकराच्या ।

चहाबाई चहा गवती चहा ।
बहिणी- बहिणींचीं फुगडी पहा ।
पहा तर पहा नाहींतर उठुन जा ।
आमच्या फुगडीला जागा द्या ।

माझा मेव्हणा मक्यांत ग मक्यांत ग ।
सोळा कणसं काखेंत ग काखेंत ग ।
म्होरं चाललाय झुकत ग झुकत ग ।
मागनं कुत्रीं भुकत ग भुकत ग ।
माझा मेव्हणा विहिरींत ग विहिरींत ग ।
धोतर फाटलंय टिरींत ग टिरीत ग ।
म्होरं चाललाय झुकत ग झुकत ग !
मागनं कुत्री भुकत ग भुकत ग !
माझा मेव्हणा असातसा असातसा ।
हातांत कुंचा मांग जसा मांग जसा ।
म्होरं चाललाय झुकत ग झुकत ग ।
मागनं कुत्रीं भुकत ग भुकत ग ।

कोथमिरिची काडी लवते कशी ।
दादाला बायको शोभते कशी ।
आम्हाला वहिनी लागते कशी ?

अंगारा म्हणा अंगारा सांधी कुंधी अंगारा ।
दादा गेला चुलीम्होरं वहिनी मारी  गुंगारा ।

फुगडी फुल्लदार भाऊ शिल्लेदार ।
भावाच्या हातीं खोबर्‍याची वाटी ।
फोडून पहाती खापरखोटी ।
मार बर मार ।
दारीं बसलाय हवालदार ।
चोळ्या शिवतोय हिरव्या गार ।
टिपा टाकतोय आणीवार ॥

झग्याची फुगडी झक मारिती ।
शिंप्याची पोरगी हाक मारिती ।
बंध माझा नेणता ।
त्याला शिवला घोनता ।
आसूड केला दुमता ।
आसूड झाला म्हातारा ॥
त्याला दाखवला सातारा ॥

असा भाऊ भोळा बायका केल्या सोळा ।
केल्याती केल्या पळूं पळूं गेल्या ।
पळतां पळतां मोडला कांटा ।
शंभर रुपयाला आला तोटा ।
१०
असा कसा अंगठीवरला ठसा ।
अंगठी गेली मोडून ।
अशी लेक साळ्याची भाकरी खाईना राळ्याची ।
पाणी पिईना शाडूचं काम करीना कवडीचं ।
कांदा खाईना पातीचा नवरा मागते जातीचा ।
फू बाई फू.........
११
आडाव म्हण आडाव ।
माझ्यासंग फुगडी खेळतय म्हातारं गाढव ।
१२
तुमच्या घोड्याचा मोड्ला पाय ।
खुर्चीवर बसुन खोबरं खाय ।
१३
हातांत शेला झळकत गेला ।
हातपायाचीं बोटं ग ।
इडणीकराची स्वारी निघाली ।
तगारीवाणी पोट ग ।
१४
फुगडी फुलती दोघे बोलती ।
चावडीखाली साप गेला चावडी डुलती ।
१५
अडयाल भिंत पडयाल भिंत ।
मधल्या भिंतीला लिंपावं किती?
ठेवलेल्या रांडेला जपावं किती ?
१६
डाळ म्हणा डाळ हरबर्‍याची डाळ ।
ठेवलेल्या रांडेला पुतळ्याची माळ ।
१७
काडी म्हणा काडी गुलाबी काडी ।
ठेवलेल्या रांडेला गुलाबी साडी ।
१८
इसाची चोळी तिसाच्य वेळा ।
खडीच्या लुगडयावर पुतळ्याच्या माळा ।

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP