मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
२१ ते ३०

लग्नांतील गाणीं - २१ ते ३०

हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं


२१
साजण की मतवाली । कुण्या नयनाची सुध गेली ।
शेक सलाल की । बाप दलाल की । गजरा भर मला । गुलाल की ।

२२
गांवाला ग गेला कुण्या याचा घोर नाहीं मला ।
माळीणबाई ग मळ्यांत काय ग ।
झाडावरला राघू तुला बोलला काय ग?
अंजीराचं फुल तुझ्या बागेंत नाय ग ।
झाडावरला राघू तुला बोलला काय ग?
माळी मळ्यांत, देव तळ्यांत , चाफी वनांत मोगरा ।
माळीण गुंफती तुरा राजीगरा काय कोथमिरा ॥

२३
माळ्याच्या मळ्यामधीं शेकाची जाळी ।
शेकाच्या जाळीमधीं राघूचा मेळा ।
राघूच्या मेळ्यामधीं मैनाचा गळा ।
तूं फिर पगडीवाला । पगडीचा मोंगलतारा ।
हालुपिला शिविली चोळी । बनविला डेरा ॥
माळी मळ्यामधीं लिंबू तळ्यामधीं चाफकळ्यामधीं मोगरा
माळीण गुफी तुरा राजगिरा काय कोथमिरा ॥

२४
गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।
इंदापूर शहर दिसत गुलजार ।
बहु किरण येतो फार मुंबईवर ।
मुंबईची उत्परदेवी डोंगरावर ।
दिवाणच्या बया गोरा साहेब ।
साहेबाच्या न बंगल्यापुढं कारंज उडं
बिन बैलाहून गाडी पळ इंग्रजी कळ ।

२५
बिन बैलाची गाडी पळ इंग्रजी कळ ।
पंढरपूर खाली सोलापूर ।
सोलापूरची मुंबादेवी डोंगरावरी  गिरणीची हवा
तिथं नांदत भगवानबुवा ।
सहाजणी सया गोरसमयाअ ।
त्याच्या ग बंगल्यापुढं कारंज उडं ॥

२६
गंगा वो जम्ना जम्नाची बानुबाई बेगडी मैना ।
जम्नाचं पाणी रमणा बेगडी मैना ।
मैनाचि बानुबाई मोती लेईना ।
तुरा गुफीला सात पदरी भाग नगरीं ।
सातारा गडावरी ग रावा तो बोलला ॥

२७
माडीवर माडी माडीवर बंगला । खाली पाऊस थुईथुई रमला ।
शालू भिजला । एका गोठीनं अंतर पडला ।
चिमनाहीं तुजला । नका जाऊं मुंबईला ।
लागलाय पाणी रान दिसतय भेसुरवाणी ।
बडोद्याचा रंग न्यारा सुरतीचा मुक्काम केला ॥

२८
अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।
अग होळी होळी पुणें शहरांत गर्दी झाली राहुटी दिली ।
पुणंघरावर उडतो  रंग । शिरीं मंदील तुरा त्याल शोभतो याला ।

२९
सोड हरीला हरीला । पदर धरीला धरीला धरीला ।
कशाचं शहाणपन ।हात घाली गळ्याच्या सरीला ॥

३०
अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।
त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥
झिर मिर जिर कापुरी हिरा ।
गवळण भली । कृष्णाला झोंप लागली । निघुन चालली ।
हरी मथुरेचा विडा लवंगाचा । चुडा भिंगाचा ।
काय थाट गवळणिचा । पदर जरीचा ग पदर जरीचा ।
दही घ्या दही ह्या दह्याची धार काय ग उभी राधा ।
कृष्ण तोलून पाह्य । म्होर जाय ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP