मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
दिंडा मोड ग पोरी । दिंडाच...

दिंड खेळ - दिंडा मोड ग पोरी । दिंडाच...

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


दिंडा मोड ग पोरी । दिंडाच्या लांब लांब दोरी ।
दिंडाखालीं कोण ग उभं । मी नव्ह भावोजी ।
हातांतल्या बांगड्या काय ग केल्या ।
आली होती तोडवाली तिला मी दिल्या ।
तुझं काय गेलं माझ्या बापानं केलं ।
दिंडा मोड ग पोरी । दिंडाच्या लांब लांब दोरी ।
दिंडाखालीं कोण ग उभं । मी नव्ह भावोजी ।
हातांतल्या पाटल्या काय ग केल्या ।
आली होती वाळवाली तिला मी दिल्या ।
तुझं काय गेलं माझ्या बापानं केलें ।

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP