मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
१ ते १०

लग्नांतील गाणीं - १ ते १०

हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं"गांवाला ग गेला कुण्या । याचा घोर नाहीं मला ।
त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥"
‘ इठ्ठल इटेवरी रुक्मीण रावळांत ।
तिथून कथा होती दोघांचं एक चित्त ॥’


कुण्या गांवाला ग गेला । कुण्या गांवाला ग गेला ।
याचा घोर नाहीं मला । असं गांवाला ग गेला कुण्या ।
काल होता आज गेला ।
माझ्या बंधवानें थाट गुजराथी गेला ॥


बाई गेला कुण्या गांवा । याचा घोर नाहीं मला ।
त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥
माझ्या तमाशावाल्या दादा रात्रीं बाजा कुठं केला ?
माझा बंधुराया माझा सोंगाड्या दृष्टवीला ।
अशी दृष्ट मी काढतें धन्यासंकटकारण ॥


असं गांवाला बाई गेला कोण्या गांवा ग कोण्या ।
याचा घोर ती बाई घोर ती नाहीं मला ॥
बंधु किती ग लांब गेला ।
नाहीं गेलें ग बाई गेलें घालवाया ग वाया ।
अशी जरीचा रुमाल बाई शेला देतें घालवाया ग वाया ।
नाहीं गेलें ग बाई गेलें घालवाया ।
दादा माझा ग बाई लांब गेला ।


अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।
सखा गेला ग माडीवरी कधीं उतरला खाली खाली ।
कवळ्या ग डाळुंबीला टवटवीच आली आली ।


गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।
येतों म्हणूं राहूं नको ग हलकरी खेळ ।
सदा पगडी लाल गळ्यांत मोहनमाळ ।
दर्यापलीकड ग पैसा सुभीदार ॥


गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला कुण्या ।
भिर भिर भिर भिर शेगुजरी ।
खेडकीच्या चाफकळी । कुण्या देशीचा हरी । साळुंकीशेजारी ।
कुण्या देशीचा वाणी । पुणें शहराला जातों ग बाई ।
नाजूक मोती नथीला । बारीक शेला बुतीला ।
माझ्या बाबाबयांनी मला मुर्‍हाळी पाठवीला ।
ये हरी रे मला मुर्‍हाळी पाठविला ॥


चिकणी सुपारी । बंधु व्यापारी । बसला गाडीत ।
माझ्या बधूची दुकानदारी फणसवाडी । काळी चोळी।
काळ्या चोळीवर मोत्याची जाळी ।
मोतीवाल्या बंधूला कन्या झाली । सून म्या केली ॥


विसाची चंची । तिसाचा कात । जायफळ त्यांत । लवंगा सात ।
सुपार्‍या आठ । वेलदोडे त्यांत । रस्त्यानं कोण जात ग पान खात ।
खाद्यांवरी हात । गळ्यामधीं पोत । नाकामधीं नथ ।
सरकारल बोलाविती ग वाड्याच्या आंत ॥

१०
मुखामधीं विडा । हातामधीं तोडा ।
सख्याला विचारिती ग कळशाचा वाडा ।

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP