मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते| ४१ ते ५३ घाटावरची लोकगीते गीत पहिले गीत दुसरे गीत तीसरे गीत चवथे गीत पाचवे गीत सहावे गीत सातवे गीत आठवे गीत नववे गीत दहावे गीत अकरावे गीत बारावे गीत तेरावे गीत चौदावे गीत पंधरावे गीत सोळावे गीत सतरावे गीत अठरावे गीत एकोणीसावे गीत वीसावे गीत एकवीसावे गीत बावीसावे गीत तेवीसावे गीत चोवीसावे गीत पंचवीसावे गीत सव्वीसावे गीत सत्तावीसावे गीत अठ्ठावीसावे गीत एकोणतीसावे गीत तीसावे गीत एकतीसावे गीत बत्तीसावे गीत तेहतीसावे गीत चौतीसावे गीत पस्तीसावे गीत छत्तीसावे गीत सदोतीसावे गीत अडोतीसावे गीत एकोणचाळीसावे गीत चाळीसावे गीत एकेचाळीसावे गीत बेचाळीसावे गीत त्रेचाळीसावे गीत चव्वेचाळीसावे गीत पंचेचाळीसावे गीत शेहेचाळीसावे गीत सत्तेचाळीसावे गीत अठ्ठेचाळीसावे खाल्ल्या पटींत । वरल्या प... झटी मारी झटी कंपळ पटी । स... सई सई गोविंदा येतो सई सई... हित बाई इंचु चावला ग बाय ... फुगडी गीते कोंबडा गीत घोड्याचा खेळ एक मुलगी ..... तुला काय प... एक मुलगी ..... तुला काय प... किकीचं पान बाई की की सौदर... दिंडा मोड ग पोरी । दिंडाच... शिमगा गिरणीचें गाणें नाना नानाच्या वरी आले फूल... डोहाळे व पाळणे कृष्णाचा पाळणा नाव घेण्याचे उखाणे सणाचे उखाणे बायांचीं गाणीं शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५३ रुखवत संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ लग्नांतील गाणीं - ४१ ते ५३ हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं Tags : geetlokgeetmarathiगीतमराठीलोकगीत हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं Translation - भाषांतर ४१मूठ मूठ बुका कीं मूठ मूठ फेका । हरी बाई माझ्या सख्या वरी।गांवाला गेला गांवधरी । माघारी पाहीना घराकडी ।संपत माझी शेला पुरी । रानींवनीं मला लावूं नका ।जिवलग माझा प्राणसखा ।४२सखु सजणी ग रावण घरीं नाहीं सुकली जाई मनमोहना ।राज सगळा ग लंकेला लावी ध्वजा मारवती राजा ॥४३घणु बाई घणु साता पुडियाचा घणु ।मरी आई घरीं सोंवळं । आयबा घेती वाण ।घणु बाई घणु साता पुडियाचा घणु ।बहिरोबा घरीं सोंवळं आयबा घेती वाण ।४४घणु बाई घणु आणती घणु बाई घणु ।पांच सवाष्णींचा घणु आणती घणु बाई घणु ।तेलवण पाडूं तेलवण पाडूं ।मरीआई घरीं ग लगीन आणती घणु ।लक्ष्मीआई घरीं ग लगीन आणती घणु ।गोपीनाथ घरीं ग लगीन आणती घणु ।तेलवण चढूं आधी नवरदेवला मग नवरबाईला ।तेलवण चढूं आधी म्हसूबारायाला मग मांगीरसाहेबाला ।तेलवण चढूं आधीं मांगीरसाहेबाला नवरदेवाला मग नवरीबाईला ।४५गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।चंदाखाली बंदाखाली मखमली डेरा दिला ।रात्रींच्या ग चांदण्याला सखा माझा बंधु गेला । चंदाखालीं बंदाखाली ।गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।माळ्याच्या मळ्यामधीं जाईचं झाड । कळ्याचा भार । तोडिती नार ।गुफिती हार । याची नवती डौलदार । जानीचा भार ।गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।कडकडी कीं धोतरजोडी । काळी पगडी । हाती अंग्ठ्या दंडपेट्या ।खाली काय घसाची भिकबाळी ।गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।हिरवी चोळी मला । टिका बसविल्या त्याला । भिंग बसविलीं ठासून ।चोळी आणली ग सद्गुरुपासून ग हरी बसून ॥४६गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।याच्या मैतरच्या जोडया... चंदाखालीं बंदाखालीं मखमली डेरा दिला ॥नार नकदार कुकुलिली अनिवार चंदाखाली...भरल्या बाजारांत मला हातानं पालविली ।हातानं ग पालविली माझ्या बंधवानं चोळी घ्यायला बोलाविली चंदाखाली ....चंदनाव पाट मी टाकिलें ठायीं ठायीं ।पोथी वाचायला यावं माझी विठाबाई ... बंदाखाली बंदाखाली४७गांवाला ग गेला कुण्या दाजीबा दिरा मोत्याचा तुरा ।शिपी गेल्यात रहिमतपुरा माघारी फिरा ।गांवाला ग गेला कृण्या सातार्या गडावरी । राघोजा दारीं चोचीनं पाणी सारी दारकावरी ।फुल पडलय चंदरपुरीं करिती धावा ।बानुला नेती केव्हां कानड्या देवा ।गांवाला गेला कुण्या सोन सौगडीला ।अजून पाणी येईना नेई नर्मदेला राजा तान्हा जरा ॥४८अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।त्याच्या संगतीला देव मारवती गेला ।दाजीबा दिरा बाजारीं चला । लागली तहान खंदावा झिरा ।ऐन वनामधीं माळयाचा मळा । जाईचं झाड कळयाचा भार ।तोडीती नार गुफिती हार । सुरत अनिवार चंद्राची कोर । सईबाई जानीचा भर ।हरी उभाच उभा वाटेवरी कसा जाऊं देईना हरी ॥४९अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।त्याच्या संगतीला देव मारवती गेला ।चला जाऊं आळंदी गांव पाहूं दवणा वाहूं ।दवण्याची काय हवा शंभुदेवा । शंभूच्या शिखरावर बोल रावा ।वामनाची द्रुपदा जितली त्यांनी पांडवांनी यम्ना जम्ना जम्नाचं लाल पाणी किल्यामधीं हरहर बोला ।गंगेला पूर आला पाह्या गेला सांगते सांगड्याला पेटी घाला प्राण गेला ।५०गांवाला ग गेला कुण्या गांवाला गेला ।घडी घाल घडी घालावी सोयर्यादादा चुडं लाल ।तुझ्या चुडयाची काय र हवा शंभूदेवा ।शंभूच्या शिखरावरीं नामनामी ।द्रुपदा जितली त्यांनी पांड्वांनीं ।नीट बसावं सारंगपाणी सोनार घडूघडी ।५१अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥साजणी साजणी चिंतामणी । हिरव्या बनातीचीं मी यजमानिणीराजाचा सुटला घोडा दरव्याला पडला वेढा ।यमुना का जमुना मधें टाकिला डोल ।पाणी हलना कां खिलना हरणी चाल चाल ।नवरत्नाचा हार त्याला मोती चार - चार ।आमुचा मुलुख वाण्याचा आमची बामणी बोली ।हाती सोन्याची झारी पाणी पाजवा नारी ॥५२इटल इटेवरी रुख्मीण रावळांत ।तिथून कथा होती दोघांचं एक चित्त, कडकडीत दडदडीत । वीज लावली शहापुरीं । शहापुरीं जम्नांगिरी ।गाया चारितो । आला ग आला ग बाई गगनीं गर्जत ।खिडकींतून माडीतून । कोण ग बघतो । लटका माझा सावकार चंद्र डुलतो ।भांडू नका तंडूं नका तुमची तुम्हांला । पदरचा पैसा देतें झेंडू फुलाला ॥एक पैसा दोन पैसा केसरी गुलाब ।असा दर्या खोल याचं पाणी किती गोड ।सभेला पाणी गेलं राजांनी नवल केलं ॥५३गांवाला ग गेला कुण्या हलहलकडी कावडिया चाल ।चमकती गळ्या दुलडी विजपरी लाल । गोडे चुनडी दंड किती बोल नापका फूल झपका । जांबजाभळी विचार करीती । नारंगीची करुं लग्नअंजीर नवरा वर पाहिला । वनस्पतीला या घेओनी वड म्हणे आम्ही मोठमोठाल्या आम्हाला नाहीं आली चिठी ।नको ग जाऊस रामफळी उगच होशील खटी ।हात हात दाढी लांब लांब मिशा ।मनीं बांधून कंबर । मांडव्यांत येऊन बसलं हळुंहळूं तें उंबर ।पन्नास आंबा म्हण नांदुकी । शिरस बसले सभेसी ।भरुनी लेखणी लिहुनी पत्र पाठवा वनस्पतीला ।अंजीराची लग्न काढिली जल्दी या तुम्ही लग्नाला ।केकतड म्हणे जाग रांडानो मनी सोडिल्या लाजा ।मी आलें असतें पण पति धाडना माझा ।एकळ टाकळ भांडत होती संवदड समजावी प्रीतीनें ।बोर कुरवली आली धावुनी कवठ बसली न्हायाला ।नागील म्हणे जाग रांडांनो तुम्हांला पुसतय कोण ।मांडवाच्या दारी आहे भाऊ माझा मान ।पेरु गुलाबी येईल मुर्हाळी मग मी जाईन ।गुल तुर्यानं तुरा गुफीला कण्हेर बेटा भिकारी ।गुलतुर्यानं तुरा गुफीला झेंडूचं फुल बराबरी । N/A References : N/A Last Updated : January 25, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP