मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते| गिरणीचें गाणें घाटावरची लोकगीते गीत पहिले गीत दुसरे गीत तीसरे गीत चवथे गीत पाचवे गीत सहावे गीत सातवे गीत आठवे गीत नववे गीत दहावे गीत अकरावे गीत बारावे गीत तेरावे गीत चौदावे गीत पंधरावे गीत सोळावे गीत सतरावे गीत अठरावे गीत एकोणीसावे गीत वीसावे गीत एकवीसावे गीत बावीसावे गीत तेवीसावे गीत चोवीसावे गीत पंचवीसावे गीत सव्वीसावे गीत सत्तावीसावे गीत अठ्ठावीसावे गीत एकोणतीसावे गीत तीसावे गीत एकतीसावे गीत बत्तीसावे गीत तेहतीसावे गीत चौतीसावे गीत पस्तीसावे गीत छत्तीसावे गीत सदोतीसावे गीत अडोतीसावे गीत एकोणचाळीसावे गीत चाळीसावे गीत एकेचाळीसावे गीत बेचाळीसावे गीत त्रेचाळीसावे गीत चव्वेचाळीसावे गीत पंचेचाळीसावे गीत शेहेचाळीसावे गीत सत्तेचाळीसावे गीत अठ्ठेचाळीसावे खाल्ल्या पटींत । वरल्या प... झटी मारी झटी कंपळ पटी । स... सई सई गोविंदा येतो सई सई... हित बाई इंचु चावला ग बाय ... फुगडी गीते कोंबडा गीत घोड्याचा खेळ एक मुलगी ..... तुला काय प... एक मुलगी ..... तुला काय प... किकीचं पान बाई की की सौदर... दिंडा मोड ग पोरी । दिंडाच... शिमगा गिरणीचें गाणें नाना नानाच्या वरी आले फूल... डोहाळे व पाळणे कृष्णाचा पाळणा नाव घेण्याचे उखाणे सणाचे उखाणे बायांचीं गाणीं शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५३ रुखवत संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ गिरणीचें गाणें लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात. Tags : geetlokgeetmarathiगीतमराठीलोकगीत गिरणीचें गाणें Translation - भाषांतर १गिरणीमधें गिरण कुरळ्याची । हवा येते सुपारी बागेची ।नवरा विचारतो बायकोला । सर्व्या लोकाचा पगार झाला ।माझी कामकरणी ग । पगार काय केला ।रहाटाचा तुटला पटा । याची सय नाहीं झाली मला ।त्या नायकिणीनं पगार बंद केला । अशी धावत पळत गेला ।हे काय भवांडया गिरणींत । या वो हाक मारितो नायकीणबाईला ।आहो आहो नायकीणबाई । सर्व्या लोकाचा पगार दिला ।माझ्या बायकोला तुम्ही पगार नाहीं दिला ।अरे अरे मेल्या भडव्या । तूं विचारतो कोणाला । तुझी बायको रे नाहीं आली कामाला ।अशी धावत पळत आला दारी मोडिला येरंड ।आवो आवो राजस्वामी तुम्ही मारताव कशाला ।मी गिरणीमधें नाहीं गेलें कामाला ।ती मोठी चतुर बाई निघूनशानी त्या कोरटाला ।केस लिवला बाई आपल्या नवर्याला ।कोरा कागद काळी शाई पत्र लिवी ।घाई घाई काय बोलणं आहे बोला कीं ।मनमोहनीं तिच आईबाप बोलल ।लेक नाहीं धाडीत नांदायला तूं निघून जा रे आपल्या घराला ।२ जटा धारी गे जोगी आला यश्वदामाई ।करीत शिंकीणात बों बों आवडपतीर ।वाही झुळझुळ खुळखुळ घुबड विशी रे ।पांच वर्षाचं बाळ तान्हं खेळ अंगणांत ।शिरीरंग माझा वेडा बाळ नाहीं दुसरा जोडा ।त्याची संगत तुम्ही सोडा गोकुळच्या नारी ।कोपीत ऊभ्या पोरी हाक मारी चक्रपाणी ।पदराला धरुं नको सोडरे माझ्या बाळा ।३सखु सखु साखर लिंबु । तुझं तोंड कसं ग कोळीणवाणीसखु गेली पाण्याला हिचा मैतर उभा वाटेला ।पानाच्या पटीसाठीं हिनं मेहुण्याला नवरा केला ।तुला करतो चांदीचे गोठ मग लावतो म्होतूर पाट ।रुपये देतो तीनशे साठ ।कोण चालली वाकडी तिकडी ।तिला खायला देते बर्फी तिला खायला ।कोण चालली तिरपी तिरपी ।झपाट्यांत फुफाट्यांत तिचा पाय भरलाचिखलांत तिचा पाय भरला खाक्यात ॥४एक आणा घॆ दोन आणे घे तूं ग काकडी खायाला ।एक आणा घे दोन आणे घे तूं ग पपयी खायाला ।५अशी कर नखरी नार ही धनसंपत्ता हिचं चित्त नाहीं धंद्यावरी ।अशी तवा ठेविला चुलीवरी नी हिंडते शेजारीणीच्या दारीं ।अशी देग शेजारणी दोन तीन तांबे तवा गेला जळुनी ।अशा दोन तीन मिर्च्या लेवुनी घसरा दिला त्या पाट्यावरी ।घेतली चुंबळ घॆतली घागर अशी नार गेली पाण्यावरी ।अशी झटकन सरली पटकन पडली घागर उरावरी ।अशी नवर्याजवळ सांगत आली नथ माझी मोडली गुलाबी चोळी सर्वी फाटली ॥६ हिची बारीक टिकली बारीक टिकली ।नातवासंगे कशी झुकली ।हिचा बाप बोलला पायांत काटा हिच्या रुपला ।हिचा भाऊ बोलला पायांत काटा हिच्या मोडला ।हिची बहिण बोलली आरसा लावून काटा काढला ।हिची आई बोलली टांग्यांत बसून आणा घरला ।७गोमू चल जाऊं ग चौपाटि बंदराला ।तेथं उभा आहे ग यश्वदेवा कान्हा ।त्यानं भुलविल्या गोकुळच्या गौळणी ।कान्हा नको मारुं रे रंगाच्या पिचकार्या ।तेंच्या भिजल्या ग रेशमी लाल साडया ।८गाडी गुलाबी ग गाडी गुलाबी ।दादा सजणा र भाऊ सजणा ।बहिणीच्या नथीसाठीं मोड खजिना । N/A References : N/A Last Updated : January 25, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP