मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते| ११ ते २० घाटावरची लोकगीते गीत पहिले गीत दुसरे गीत तीसरे गीत चवथे गीत पाचवे गीत सहावे गीत सातवे गीत आठवे गीत नववे गीत दहावे गीत अकरावे गीत बारावे गीत तेरावे गीत चौदावे गीत पंधरावे गीत सोळावे गीत सतरावे गीत अठरावे गीत एकोणीसावे गीत वीसावे गीत एकवीसावे गीत बावीसावे गीत तेवीसावे गीत चोवीसावे गीत पंचवीसावे गीत सव्वीसावे गीत सत्तावीसावे गीत अठ्ठावीसावे गीत एकोणतीसावे गीत तीसावे गीत एकतीसावे गीत बत्तीसावे गीत तेहतीसावे गीत चौतीसावे गीत पस्तीसावे गीत छत्तीसावे गीत सदोतीसावे गीत अडोतीसावे गीत एकोणचाळीसावे गीत चाळीसावे गीत एकेचाळीसावे गीत बेचाळीसावे गीत त्रेचाळीसावे गीत चव्वेचाळीसावे गीत पंचेचाळीसावे गीत शेहेचाळीसावे गीत सत्तेचाळीसावे गीत अठ्ठेचाळीसावे खाल्ल्या पटींत । वरल्या प... झटी मारी झटी कंपळ पटी । स... सई सई गोविंदा येतो सई सई... हित बाई इंचु चावला ग बाय ... फुगडी गीते कोंबडा गीत घोड्याचा खेळ एक मुलगी ..... तुला काय प... एक मुलगी ..... तुला काय प... किकीचं पान बाई की की सौदर... दिंडा मोड ग पोरी । दिंडाच... शिमगा गिरणीचें गाणें नाना नानाच्या वरी आले फूल... डोहाळे व पाळणे कृष्णाचा पाळणा नाव घेण्याचे उखाणे सणाचे उखाणे बायांचीं गाणीं शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५३ रुखवत संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ लग्नांतील गाणीं - ११ ते २० हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं Tags : geetlokgeetmarathiगीतमराठीलोकगीत हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं Translation - भाषांतर ११माझ्या मामाची एकासस ग ।मामी करिती उठाबस ग । या बाई गौळणी ग ।आडवा डोंगर कंगोर्याचा ग ।संग नेतें मी गोरा भाऊ ग । या बाई गौळणी ग ॥१२अशी गेला कुण्या गांवा ग याचा घोर नाहीं मला ।त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥हिरवी चोळी उंच मोलाची मला ।हिचा शिवणार येईल कधीं ग माझी मीच अंगीं भरली ग ।ऐक रुख्मिणी तुला सांगतें गांठ सुटेना भिंग बसवली ठसून ।चोळी घ्यावी ग सद्गुरुपासून ग बाई पासून ॥१३आला नागरपंचमीचा सण । झुलझुलण्या का नागरपंचमी कावारुळाला जातो नरनारी आनंदाखालीं नाग पूजिती ॥कोईपे नेसुनी सरसाडी । पोषाख करुनी न्यार न्यारी ।सांगत्या हरणी चल चिमणबागेमधीं जाऊ गडे मैतरणी ॥१४माणिकसाहेब धुंद झाला । वारु सजविला ।झुंझाकड नेला ।रजा दे मला लढाईला । रजा कशी देऊं मी तुम्हांला ?तुमचा बापू मरणीं पावला । तुमच्या मातेला सवाल काय केला ?पुस तिला सांग आम्हाला ॥१५अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।गांवा ग छपरीन् बंगला ।जीव माझा रमला माडीवर बंगला ।दारी पाऊस थुई थुई रमला ग शिरीं रंग भिनला ।याच्या अंबेलीखाली बाज फुलाची शेज ॥१६अशी गेला कोण्या गांवा याचा घोर नाहीं मला ॥गांवा येग घडणी जाग घडणी म्होर डुलत ।मुसुंब्या चोळीवरी चंद्र खुलतो ॥१७माडीवर माडी माडीवर बंगला ।कुण्या नारीन वारुळ पुजला ? भाऊपण्याला अंतर पडला ॥१॥१८हरणी मूल बाई वाण्याची । डोईवर घागर पाण्याची ॥पांच पिंजर्या डोलती । आंतमधीं मैना बोलती ॥१९भांडू नका तंडूं नका तुमची तुम्हांला । पदरीचा पैसा देतें झेंडू फुलाला ।खिडकींतून माडींतून कोण ग बघतो । जीवीचा प्राणसखा चंद्र डोलतो ॥२०आवोजी भीमा आवोजी भीमा पाण्याला चला ।शीतळ माझी गंगा चालली थिट जायाचं दूर ।बारीक शेला वार्यानं गेला ।नदर झाली त्याला पदर घाला पदर घाला । N/A References : N/A Last Updated : January 25, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP