TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
नाना उत्सव मन्मना रिझविती...

संक्रांत - नाना उत्सव मन्मना रिझविती...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


संक्रांत
नाना उत्सव मन्मना रिझविती आनंद देती जरी
संक्रांतीसम एकही न करती उत्कंठ मातें परी
नाना संक्रमणें अखंड जगतीं कैशापरी चालती
त्याचें सुंदर चित्र हीच मजला संक्रांत ही दाविती १

अंधारामधुनी प्रकाशकिरणें आलीं पहा धावुनी
पापांचा करुनी विनाश पुरता मांगल्या झालें धणी
दु:खामागुनि ताप साहुनि मिळे हें सौख्य, ही शांतता
ऐसा हा मज बोध नित्य कथिते संक्रांत ही तत्वतां २

कां होऊं हृदयीं निराश मग मी संक्रांत ही पातली
स्वर्गीचीं नव वैभवें वितरण्या या मर्त्य भूमंडळीं
आतां जाइल मावळून सगळा अंधार विश्वांतुनि
सत्याचा जय शेवटीं वदतसे संक्रांत माझ्या मनीं ३

संक्रांती वद काय काय अपुल्या ओटींत तूं आणिलें
मातें दाखव गे कृपा करुनि हीं झालीं भुकेलीं मुलें
कांहीं संक्रमणें अशींच चतुरें, फेकूनि दे भूवरीं
नष्टप्राय समस्त हें तम गडे, स्वीय प्रकाशें करीं ४

शांतीची वसती जगांत करुनी अज्ञान विध्वंसुनी
नाना भेद मतें त्वरें सकल ही घेऊनि जा येथुनि
प्रेमाचें मधुर प्रशांत वसवी साम्राज्य विश्वावर
जेणें स्वर्ग जगांत येइल असें कांहीं तरी तूं कर ५

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:51.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तांबले

  • स्त्रीन . गृहकृत्यांत अनेक प्रकारे उपयोगी असे एक प्रकारचे धातूचे लहान भांडे . [ सं . ताम्र + आलय ; म . तांब + आळे ] 
  • ०ठेवणे ( कर . ) ( ल . ) ( चुलीवर भाताचे तांबले ठेवणे ) भात करणे ; भात शिजण्यास लावणे . सकाळी उठून तांबले ठेवावे . 
RANDOM WORD

Did you know?

What is the Hindu Caste System?
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site