मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
दे दे सोडुनि ही लाज गडे, ...

जादुगारीण - दे दे सोडुनि ही लाज गडे, ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


दे दे सोडुनि ही लाज गडे, चुंबुनि लाडेंकोडें
धर मज कवळोनी करपाशीं, स्निग्ध तुझ्या हृदयाशीं !
मोहनमालेच्या, बालेच्या, गोड कळ्या गालींच्या,
फुलल्या मन्नयनीं, तदगंधें अननुभूत आनंदें.
घेऊनि शिथिलपण, निस्त्राण, होऊनि पंचप्राण.
झिंगुनिया काया, कलली ही, सांवर गे धर हृदयीं !

मधु मंद श्वास, फुंकोनी, मृदुल मधुर अधरांनीं,
झांपड जादूची, मन्नयनीं, जादुगारिणी आणी !
झांकळुनी प्राण, धुंदिगण (?) भरुनि जीव बेभान -
होता मग नयनीं. रमणी. मोहर मूक मुक्यांनीं !

बंदा दास तुझा, हा असला. दगडाचा घडलेला.
पुतळी जादूची, बनतांची, जीवकळा मग त्याची -
सोडुनि मातीला, अवलीला, तुझ्या हृदयज्योतीला,
पाहुनिया गिरक्या, घेइल ती, तुझ्याच भंवतींभंवतीं !

जादूची झोंपू, ही असली, देहमनीं जरि ठसली,
गुंगत परि जीव, नव द्दष्टी, बघतिल अदभुत सृष्टि,
तुझिया श्वासांच्या भंवतालीं मधुर नयनकरजालीं

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP