मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
चंद्रकला जलदामधुनी - धांव...

प्रेमाचें अल्लडतेचें चित्र - चंद्रकला जलदामधुनी - धांव...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


चंद्रकला जलदामधुनी - धांवतसे भरभर गगनीं;
स्वच्छ चांदणें क्षण येतें - क्षण सर्वहि अंधुक होतें;
क्षण उल्हासा हो भरती - उदासता तों ये वरतीं.
पाहुनियां चंचलतेतें - आठवलें हृदयीं मातें;
प्रेमाच्या अल्लडतेचे - ते दिन हसण्यारुसण्याचे
चित्तचंद्रिका प्रीति खरी - धांवत होती हृदंतरीं
तारुण्याचें द्दश्य तदा - हंसलें रुसलें कितीकदा
चंद्रकला गगनीं विलसे - जलदांमधुनी धांवतसे;
चित्तचंद्रिका हाय परी - न दिसे मजला हृदंतरी,
म्हणुनि असा पडुनी येथें - शून्य मनानें गगनातें
अवलोकित मी गात असें - जड हृदयाचें गीत असें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP