मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
ब्रम्हांडावरि नित्य नूतन ...

काळाचे लेख - ब्रम्हांडावरि नित्य नूतन ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


ब्रम्हांडावरि नित्य नूतन अशीं चित्रें सुरम्यें किती
पंखांहीं अपुल्या विशाल लिहितो हा काळ दिव्याकृती
संध्या आणि उषा, तसे रविशशी, नक्षत - तारांगण
दिव्यें दाखवितो अनंत असलीं आम्हांस रात्रंदिन १

त्यानें शांति नभीं गभीर लिहिली, आम्हां न ती लाभते;
दिव्य प्रीति तयें जगीं पसरिली, आम्हीं तियेचीं भुतें;
विश्वाच्या हृदयांतल्या निवडुनी स्वर्गीय भावांप्रती
चित्रें रंगविलीं तयें, न कळती हा हंत आम्हांस तीं ! २

‘मातें स्वर्ग दुरावला ’म्हणुनिया चित्तीं बिचारी कुढे
त्रस्ता दीन वसुंधरा बघुनिया व्योमस्थ तेजाकडे;
‘स्वर्गाचें सगळेंच गूढ वसलें काळाचिया लेखनीं’
बोले विशसुनी ‘कधींतरि मला सांगेल कां तें कुणी ?’
काळाचीं जर हीं निगूढ लिखितें आम्हां कळालीं तरी
देवा रे ! वसुधा क्षणांत बनवूं प्रत्यक्ष स्वर्गापरी. ३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP