मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
काव्यरसाच्या गुंगींत कधि...

वनमाला - काव्यरसाच्या गुंगींत कधि...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


काव्यरसाच्या गुंगींत
कधिं न मिळे ती बघण्याला

गेलों एका रानांत,
वनमाला दिसली मजला

ही वनमाला
नको कुणाला
चुंबायाला ?

हास्य तिच्या गालीं चढलें
तेव्हां वच कवि हें बोले. १

कलिका सगळ्या घेऊन,
कुणी ठेविली ही येथें

माळ तयांची गुंफून.
मन्मन वेडें परि होतें !

मुग्धपणाची
जणुं सौख्याची
आनंदाची

गोड गोड ही वनमाला
तीच एकटी प्रेमाला. २

ईशाची दावी लीला
वायु तिजसवें नृत्य करी

देई कविते. स्फूर्तीला
भृंग तियेचा हात घरी.

तुजसह जीवित
जावें वाटत,
आशा दाटत,

प्रेमाची तूं खाण गडे,
गोड गोड  तूं गोड गडे । ३

वनमाला ही पाहून
जन्मभरी गाइन तिजला.

नेत्राचें सार्थक जाण.
कशी स्थिती येवो मजला.

त्या कालाची
त्या प्रेमाची,
त्या भेटीची,

स्मृतिही राहिल वनमाले ।
जीवित शुष्क जरी झालें. ४

जें नाहीं तें दाखविलें,
ठायीं एक्या तूं बससी,

पेमरूप तूं मज केलें !
अणुरेणुमधी मज दिससी;

तरि मी गावें,
तुला हंसावें,
ममत्व न्यावें,

परि नच जगतीं ?
एक भृंग गाइल कीर्ती. ५

बोल एकदां वनमाले !
अमृतबिंदूवर्षाव

ना तरि प्राण लया लया गेले.
कर तूं, दे कवि नवजीव.

बोल हाटले,
गाणें नुरलें,
प्रेमच दिसलें,

म्हणेन प्रेमाची खाण
ना तर जीवच नादान. ६


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP