मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
मन्मना जगाचा पंथ तुझा नच ...

पंथ - मन्मना जगाचा पंथ तुझा नच ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


मन्मना जगाचा पंथ तुझा नच कांहीं;
तव पंथ दुजा, हा सोड वेगळा होई.
हें विश्व बुडे त्यासंगें कां बुडतोस ?
कां बळें जाऊनी गांठावें वणव्यास ?
दे दु:खसुखाचें जाळें - फेंकुनी
मायेची दुर्धर बेडी - तोडुनी
या सर्व जगाच्या संकटास हो धीट;
मग शोध आपुल्याआपण पुथ (तो) नीट.
==
प्रेमाला जेथें बंध कशाचा नाहीं.
दिव्यता पसरली दिशा व्यापिल्या दाही;
आत्मानुभवाच्या रम्य वाटिका येथें,
पुष्पांचा परिमल भरला सर्व दिशांतें;
शांतिची साऊली जेथें - नांदली
निर्झरिणी आत्मसुखाची - ज्या स्थळीं
घे मंजुळ गाणें जिथें आत्मविश्वास
मम हृदया ! जाणें तुला त्याच पंथास

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP