मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
‘हें फूल या उडत्या स्वर्ग...

फूलपांखरूं फुलवेली - ‘हें फूल या उडत्या स्वर्ग...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


‘हें फूल या उडत्या स्वर्गांतील.
माणिक हें बाइ गडे झुलतें आहे ।
हें तान्हें सृष्टीचें गोजिरवाणें’
कौतुकली मधुबदना हंसली वदली - १

‘स्वच्छंदी फूलपांखरा ! आनंदी
माधविका पाठविते तुज या लोका,
ये, गाई चुम्बनमय गाणीं कांहीं;
खेळ इथें या कोमल कलिकेवरतें;
ही बाला फूलपांखरा ! चुंबि हिला’ २

फुलें नवीं मुग्धलतेवरतीं यावीं,
त्यापरि ती प्रेमलता फुलली चित्तीं,
हाय परी फूलपांखरूं तिचें दुरी !
नातरि तें या सुमनीं स्वर्गचि बघतें ! ३

‘थांब गडे धावुं नको इकडेतिकडे;
कलिका ही मुग्ध हृदय उकली पाहीं.
प्राणच तूं एक तिचा जीवनहेतु !
थांब तरी - कठिणच गे नरजाति खरी !’ ४

फुलवेली क्षण रोषें रंजित झाली,
ते बाण मदनाचे हरिते भान,
रंगहि ते जडतेला जीवन देते,
अरसिक तें फूलपाखरूं परि होतें.
रसिक न का हाय पण तिचा प्राणसखा ! ५

हें सुमन तुजवांचुनि चुंबिल कवण ?
‘सांग तरी’ - गदगदली फुलवेल परी
‘विरहानें शून्य न का गमती भुवनें ?’
हृदयाला पूर पुरा भरुनी आला ! ६

‘या आतां - अन्त किती बघतां नाथा !
मी फूल या निर्जन रानांतील
श्वासानें व्यर्थ आर्द्र करितें भुवनें !’
‘व्यर्थचि कां ?’ ‘कोण ?- बाइ ग प्राणसखा’ ७

सांज खुले दिनरजनीमीलन झालें.
दंवमाला उपमा तरि कसली त्याला ?
टपटपती स्वर्भूच्या हृदयावरती
कूजनही मधुनि मधुनि ऐकूं येई ! ८

सांजचि ती वर्णावी कैशी गीतीं ?
त्या छाया कवि होता अवलोकाया;
कौतुकला शब्द परी न फुटे त्याला !
मूकपणीं अक्षय गुंगे हेंच मनीं
‘गोड भलीं फूलपांखरूं - फुलवेली !’ ९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP