मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
फिकट निळीनें रंगविलेला का...

मेघांचा कापूस - फिकट निळीनें रंगविलेला का...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


फिकट निळीनें रंगविलेला कापुस मेघांचा,
वरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा;
त्यांतहि हंसली मंदपणेंती चंद्रकला राणी;
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचें पाणी. १

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधुन जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाला;
चौंबाजूला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीनें साज घेतला पाऊसकाळींचा. २

यशास्विनी सौभाग्यदेवता माता जगताची;
घोर घनघटा भूलिंगाला प्रक्षाळुनि गेल्या -
त्या अंबेची घटस्थापना आज बसायाची.

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP