मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
कां मग खंती - जग सगळें मा...

आत्मविश्वास - कां मग खंती - जग सगळें मा...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


कां मग खंती - जग सगळें माझ्या हातीं.
गिरीवरुनि हा जलौघ सुटला,
तो मग काय कुणाला भ्याला ?
कंपित जाई गिरिशिखराला १

दु:खसंकटांनो या आतां,
भीति स्पर्शुं शकेना चित्ता,
जाइन मी मम शोधुनि पंथा,
ईश्वर त्राता - मग मला कशाची चिंता ? २

वाटाडया भववनीं असे तो.
आप्तमित्र मम बांधवही तो,
आप्तमित्र मम बांधवही तो.
तोच गुरु विज्ञाना देतो,
धनी जगताचा - प्रेमळ तो जनकच माझा. ३

जग होवो मजवर उफराटें.
पसरो मार्गीं अविरल कांटे,
जाइन मी मम इच्छित वाटे.
जगा सुखवाया - घालवीन जन्म न वांया, ४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP