TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
काय करूं विठठला - कथी मज ...

काय करूं ? - काय करूं विठठला - कथी मज ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


काय करूं ?
काय करूं विठठला - कथी मज - काय करूं विठ्ठला !
हा स्वार्थाचा वणवा बघ रे, चोंहिकडे पेटला.
धूम तयाचा मत्सर - कपट - क्रोध जगीं लोटला;
दुर्विचारघूकांचा रव हा सर्व दूर दाटला,
तुज भुलला, अज्ञानतमींहा जनसमूह चालला;
अंधश्रद्धा किती माजली, दंभ किती वाढला.
अभिमानाचें खडग उपसिलें भावभक्तिच्या छला;
जिकडे तिकडे असत्यता ही कुणी स्मरेना तुला.
अंतरंग सोडुनि बहिरंगीं हाजन वेडावला;
तुझीं लेंकरें समान सारीं कळेल तेव्हां मला.
पहा माजली घोर यादवी, वैर किती वाढला;
धर्मदीप हा विझावयासी परमेशा लागला.
नीति दारची शुनी, पुसेना ढुंकुनि कोणी तिला;
समाजबंधन शिथिल जाहलें, कीड लागली मुळां,
कसा धरिल मग राष्ट्रतरू तो मधुर मनोहर फला ?
गतानुगतिकत्वाचा खोडा जडला पायीं पुरा.
जरि आरडतों, गमे परी तो पंथ एक चांगला;
उन्नतिची ती वाढ खुंटली शरणागतवत्सला !
किती पाहसी अंत अजुनिही दाखव पथ चांगला -

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:51.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कडोस्त्री

  • स्त्री. १ कमरेस बांधलेल्या ( लुगडे , धोतर इ० ) वस्त्राचा कमरेजवळ खोवण्यांत येणारा भाग ( यांत पैसा , सुपारी इ०जिन्नस ठेवतात ), ' कडोसरी नसला तरी कनवटीला खास आहे .' - तांबे १४ . २ शरीराची ( उजवी , डावी ) जागा ; कमरेचा भाग . ३ वस्त्राच्या आवळण्यानें काळवंडलेली , वाईट झालेली कमरेची जागा . ( सामान्यत ; चतुर्थ्यत व षष्ठ्यंत स , चा इ०प्रत्यय लागून प्रयोग ). कडोसरीस खोवणें , खुपसणें , कडोसरीचा पैसा . ( स . कटि ; म , कड + सरी ; किंवा कटिवस्त्र .) ( वाप्र .) कडोसरी - सरीस येणें - अगदीं जेरीस येणें . 
RANDOM WORD

Did you know?

How do I contact you?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site