TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
अव्यक्तांतिल दूरदूरच्या श...

विश्वाचा प्रवास - अव्यक्तांतिल दूरदूरच्या श...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


विश्वाचा प्रवास
अव्यक्तांतिल दूरदूरच्या शांत गुहेंतून
दिव्ययोगिनी रजनी झाली गगनीं अवतीर्ण,
जगदव्यापिनी काव्यकल्पना कविहृदयामधुनी
जेंविं अवतरे शब्दसृष्टिच्या मधु वातावरणीं -
दिशादिशांतुनि तेविं प्रगटली छायारूपानें
गभीर मूर्तीं निशादेविची, कोण न हें जाणे ?
अर्पुनिया हें सुवर्णरंगी सूर्यकमल पायीं
त्या भगवतिची करिते पूजा निसर्गदेवी ही.
लाक्षारस चर्चिला, गुलालहि भरला भांगांत,
रम्य तारकाफुलें उधळलीं स्तुतिगीतें गात.
सप्तलोक दशदिशा अप्सरा सुर वदती सारे
‘उदोउदो’, ब्रम्हांड दुमदुमे त्या जयजयकारें !

अपूर्ण

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:49.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हकीकत

  • स्त्री. १ बातमी ; वृत्तांत वर्णन ; अहवाल . २ घडलेलें वर्तमान ; गोष्ट ; प्रसंग ; वाका . साहेबी हकीकती मनास आणून पाहतां ... - रा १७३८ . [ अर . हकीकत् ‍ ] 
  • ०नामा पु. घडलेल्या गोष्टीचा लेखी वृत्तांत , अहवाल , [ फा .] 
RANDOM WORD

Did you know?

सूतक कोणाचे नसते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.