मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
‘गर्द सभोंतीं रान साजणी त...

तूं तर चाफेकळी - ‘गर्द सभोंतीं रान साजणी त...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


‘गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी !
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं ?’

ती वनमाला म्हणे, ‘नृपाळा, हें तर माझें घर;
पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर.

हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा;

घेऊनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे -
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरे,’

‘रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी ! तुला;
तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.

तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;
तव नयनीं या, प्रेमदेवता धार विखारी भरी !

क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळा उडे.

अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी;
भुललें तुजला हृदय साजणीं, ये चल माझ्या घरीं.’

सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोतीं घडे;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.

ती वनबाला म्हणे नृपाळा सुंदर मी हो खरी, -

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP