मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
बोल बाई बोल ग । तुझ्या बो...

अंगाई गीत १ - बोल बाई बोल ग । तुझ्या बो...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


बोल बाई बोल ग । तुझ्या बोलाचें काय वानुं मोल ग ।
डोल बाई डोल ग । जाईजुईचीं लाख फुलें तोल ग ।
हांस बाई हांस ग । माझ्या अंगणीं माणिकांची रास ग ।
नीज बाई नीज ग । गाई अंगाई काऊचीऊ तुज ग ।

या बाई या । बकुळिच्या झाडाखालीं फुलें वेंचूं या ।
उन पडलें । पानफुल दिसे कसें गोड्गोडुलें ।
गोडगोडुलें । मोतियाचे दाणे कोणीं खालीं पाडिले ? ।
रान हाललें । पहांटेला शुकदेव गाणें बोलले

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP